शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाबाबत खंबीर भूमिका हवी

By admin | Updated: October 29, 2014 23:41 IST

गेल्या 45 वर्षात काळ्या पैशावर अंकुश लावण्याचे काम जर केले असते, तर भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती सातपटीने श्रीमंत झाली असती.

गेल्या 45 वर्षात काळ्या पैशावर अंकुश लावण्याचे काम जर केले असते, तर भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती सातपटीने श्रीमंत झाली असती.  देशातील  प्रत्येक  व्यक्तीचे उत्पन्न 15क्क् डॉलर्सवरून 1क्5क्क् डॉलर्सर्पयत पोचले असते. त्यामुळे सध्या देशात जो गरिबीचा विद्रूप चेहरा पाहायला मिळतो, तो पाहायला मिळाला नसता. मध्यम उत्पन्न असणा:यांची सर्वाधिक संख्या असलेले राष्ट्र अशी भारताची ओळख झाली असती. आज वस्तुस्थिती अगदी उलट आहे. एका गरीब व्यक्तीच्या विकासासाठी जो पैसा खर्च होऊ शकला असता, तो पैसा विदेशी बँकेत गुप्तरीतीने जमा होत असतो. असेही म्हटले जाते की, काळ्या पैशाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यात आले असते तर विकासाचा दर पाच टक्क्याने जास्त राहिला असता.
सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जेम्स कॉरिडॉर यांच्या मते 1955-56 साली भारतातील काळ्या पैशाचे प्रमाण
4 ते 5 टक्के इतके मर्यादित होते. 197क् साली स्थापन करण्यात आलेल्या वांछू समितीच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण सात टक्के इतके वाढले होते. हे प्रमाण दर वर्षी वाढतच गेले. 198क्-81 साली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक फायनान्स या संस्थेने एक आर्थिक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार काळ्या पैशाच्या निर्मितीचे प्रमाण 18 ते 2क् टक्के इतके वाढले होते. आता तर काळ्या पैशाचे प्रमाणो 6क् टक्के इतके वाढले आहे, असे या विषयाचे अभ्यासक 
प्रा. अरुणकुमार यांचे म्हणणो आहे. देशातील काळ्या पैशात होणारी ही वाढ चिंताजनक आहे, असेच म्हणावे लागेल. भारतात हा काळा पैसा आर्थिक व्यवहारात खेळत असतो. त्यापैकी फक्त 1क् टक्के एवढी रक्कम विदेशी बँकांतून ठेवण्यात येत असते आणि तरीही ही रक्कम बारा अब्ज डॉलर्स एवढी असावी असा अंदाज आहे. विदेशी बँकांतील खातेदारांची आणि त्यांनी जमा केलेल्या रकमेची यादी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवली असून, ती बरीच बोलकी राहील असा अंदाज आहे.
विदेशात लपवून ठेवलेल्या काळ्या पैशाला भारतात आणण्याच्या कामाविषयी मोदी सरकारकडून ज्या त:हेने टाळाटाळ करण्यात येत आहे, त्यामुळे सरकारच्या हेतूंविषयी शंका वाटू लागली आहे. त्याचा ताप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोसावा लागणार आहे. काळ्या पैशाबाबत वित्तमंत्री अरुण जेटली यांची भूमिकाही संशयास्पद वाटू लागली आहे. स्विस  सरकारसोबत भारताचा जो करार झाला आहे, त्या कराराचा हवाला देत जेटली यांनी पूर्वीच्या संपुआ सरकारला आरोपीच्या पिंज:यात उभे केले आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने जी यादी सादर केली आहे, त्या यादीतील 17 लोकांविरुद्ध अगोदरच कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. उर्वरित लोकांविरुद्ध कारवाई सुरू करून लोकांच्या मनातील संशय दूर करणो अर्थमंत्री अरुण जेटली यांना सहज शक्य आहे. अशी कारवाई सुरू झाल्यावर त्यांची नावे जाहीर करण्याला कोणतीही अडचण येणार नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे जे उमेदवार  निवडून आले आहेत, ते मोदींच्या नावावर निवडून आले आहेत. मोदींना पंतप्रधान करण्याच्या इच्छेतूनच लोकांनी भाजपाच्या तिकिटावर उभ्या केलेल्या जास्तीत जास्त लोकांना निवडून आणून भाजपाला  एकहाती सत्ता सोपविली. त्यामुळे निवडणुकीत दिलेली वचने पूर्ण करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींवर येऊन पडते. त्या वचनांपैकी एक परदेशातील काळा पैसा भारतात परत आणणो हे आहे. तो पैसा देशात परत कसा आणणार आणि परत आणल्यावर तो देशाच्या विकासासाठी कसा वापरणार, हेही स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. देशात पायाभूत सोयींचा विकास झाला तरच रोजगारात वाढ होणार आहे. तेव्हा खरा प्रश्न काळा पैसा निर्माण होणो कशा पद्धतीने थांबविणार हा आहे. त्यासाठी करवसुलीचे काम सक्तीने व्हायला हवे आणि कर चुकवेगिरी करणा:यांच्या विरोधात कडक कारवाई होण्याची गरज आहे.
सर्वोच्च न्यायालयात केंद्राने जे शपथपत्र सादर केले आहे, त्यात दुहेरी करवसुली करण्याबाबत आपले हात बांधलेले आहेत, असा अभिप्राय नोंदविला आहे. सरकारच्या या त:हेच्या निवेदनामुळे काळा पैसा उघड करण्याच्या प्रयत्नांमध्ये बाधा येण्याची शक्यता अधिक आहे. सरकार स्वत: परदेशी बँकांत पैसे जमा करणा:यांची नावे उघड करण्यास असमर्थ ठरत आहे. अशा स्थितीत ही नावे उघड करण्याबाबत सरकारला बँकांवर दबाव टाकणो शक्य होणार नाही आणि बँकादेखील अशा दबावाला जुमानणार नाही. ‘तुम्ही जर आपल्या देशात ही नावे उघड करू शकणार नसाल तर आम्ही ती नावे सांगण्याचा तुमचा अट्टहास कशासाठी’ असा प्रश्न या बँका सरकारला विचारू शकतात.
लोकांना आता परिवर्तन हवे आहे. देशाचे भवितव्य बदलून टाकील अशा नेत्याचा शोध घेण्याचे काम लोकांनी चालवले होते. नरेंद्र मोदींच्या रूपाने असा नेता देशाला सापडला आहे. रस्त्यावर चहाची टपरी चालविणा:या चायवाल्यापासून अंबानींर्पयत आणि सरकारी कार्यालयात काम करणा:या कर्मचा:यापासून तर बुद्धिजीवी वर्गार्पयत प्रत्येकाला नरेंद्र मोदींविषयी विश्वास वाटतो आहे. ब:याच वर्षानंतर राष्ट्राला असा नेता लाभला आहे. अन्यथा आतार्पयत कोणीही सत्ताधीश असू दे, ‘आम्हाला काय त्याचे,’ अशी बेपर्वा वृत्ती लोक सरकारविषयी बाळगू लागले होते. एखादी व्यक्ती सा:या समाजाला विकासाच्या अत्युच्च शिखरावर नेऊ शकते, याची अनेक उदाहरणो जगाच्या इतिहासात सापडतात. सम्राट अशोक, अकबर बादशहा, माओत्से तुंग, लेनिन  यांसारखी काही नावे उदाहरणादाखल देता येतील. या व्यक्तींनी स्वत:ची वेगळी पद्धत विकसित करून राष्ट्राला उंच स्थानार्पयत पोचवले. मोदींकडून तशाच परिवर्तनाची लोक अपेक्षा बाळगून आहेत; पण त्यासाठी मोदी जो उत्साह प्रत्येक बाबतीत दाखवीत आहेत, तसाच उत्साह प्रत्येकाला दाखवावा लागेल. तरच त्यांना अपेक्षित असलेल्या राष्ट्राची उभारणी करणो त्यांना शक्य होईल. त्यासाठी नरेंद्र मोदींना पुरेसा वेळ द्यावा लागेल.
मोदींवर किती मर्यादेर्पयत विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. पण त्यांनी आपल्या भूमिकांवर ठाम राहणो सोडून दिले तर त्यांच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो. तसे होऊ नये अशी अपेक्षा करणो एवढेच आपल्या हाती असते.
 
एच.के. सिंह
ज्येष्ठ पत्रकार