शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मतदारांना गृहित धरणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:02 IST

सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.संकटमोचक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गिरीश महाजन यांना आता भाजपच्या खान्देशातील अपयशाचे धनी समजले जाणे अगदी स्वाभाविक आहे. नगर, नाशिक, जळगाव आणि धुळे महपालिका ताब्यात घेण्याचे यश जसे सर्वस्वी त्यांचे होते, तसे विधानसभा निवडणुकीत खान्देशचे निर्णय हे त्यांच्या कलानेच पक्षश्रेष्ठींनी घेतले होते. उत्तर महाराष्टÑातील ४७ पैकी ३५ जागा निवडून येतील, हा अंदाज त्यांचा आत्मविश्वास दर्शविणारा होता. आता असे का घडले नाही, याचेही उत्तर त्यांनी मतदारांना द्यायला हवे.महाजन असो की, राज्यातील भाजपचे नेतृत्व असो, लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्टÑ ही आपली जहागिरी आहे, आपण म्हणू तसेच घडेल, अशा पध्दतीच्या मानसिकतेने काम आणि विचार करु लागले होते. क्रिकेटच्या मैदानावर जसे एखादा कप्तान फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीचा विचार करुन क्षेत्ररचना करतो, अगदी त्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींनी या निवडणुकीत केला. आमचे उमेदवार आम्हीच ठरवू आणि तुमचे उमेदवारदेखील पळवून नेऊ, असा हेका ठेवल्याने नव्या दमाचे, उमेदीचे उमेदवार विरोधकांनी उभे केले आणि भाजपच्या पैलवानांना भूईसपाट व्हावे लागले. सन्माननीय अपवाद वगळता इतरांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाटेतही काटे रचण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला. ‘आयारामां’ना महत्त्व देण्याचा प्रयत्नात निष्ठावंतांवर अन्याय झाला, पण सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नेते आणि पक्षाविषयी वेगळी धारणा तयार झाली.एकनाथराव खडसे, अनिल गोटे, उदेसिंग पाडवी या विद्यमान आमदारांविषयी पक्षाने कठोर भूमिका घेतली. परिणामी शहादा वगळता भाजपने दोन हक्काच्या जागा गमावल्या. मंजुळा गावीत, डॉ.जितेंद्र ठाकूर, नागेश पाडवी हे पक्षाच्या पडत्या काळात निवडणुका लढवत होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेक पर्याय तयार झाल्यावर निष्ठावंतांना डावलण्यात आले. गावीत तरीही निवडून आल्या, पण ठाकूर आणि पाडवी यांचे अपयश आणि अन्याय सामान्य कार्यकर्त्यांना वेदना देणाऱ्या ठरल्या.माझे ते माझे आणि तुझे तेही माझे ही भाजपची हाव पक्षाला खड्डयात घालणारी आहे. ही चूक भाजपने लवकर सुधारायला हवी. अन्यथा हा मुद्दा युतीमधील तणावात भर घालू शकतो. प्रभाकर सोनवणे, अमोल शिंदे, चंद्रशेखर अत्तरदे, राजवर्धन कदमबांडे, गोविंद शिरोळे यांना निवडणुकीत भाजपने केलेली मदत सेना उमेदवारांना अडचणीची ठरली. एवढे करुनही सेनेचे चार आमदार निवडून आले. हिलाल माळी आणि आमशा पाडवी हे दोन्ही कडवे शिवसैनिक पराभूत झाले. सेना हा त्रास विसरेल, असे मानण्याचे काही कारण नाही. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता चंद्रकांत सोनवणे हे आमदार आता भाजपला मतदारसंघात वरचढ राहतील.भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा त्रास झाल्याने दोनदा आमदारकी हुकलेल्या अमळनेरच्या अनिल भाईदास पाटील यांना राष्टÑवादीकडून आमदारकी मिळाली. ‘भूमिपूत्र’ या मुद्यावरुन भाजपच्या काही मंडळींनी उघड तर काहींनी छुपी मदत केली. रावेरात अनिल चौधरींना छुपी मदत, खडसे यांच्या तिकीट कापण्याचा प्रकार याचा फटका हरिभाऊ जावळे यांना बसला. संयमित प्रचार करणाºया शिरीष चौधरींना पुन्हा एकदा विधानसभेचे दार उघडले.मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील यांना गेल्यावेळेप्रमाणे ज्ञात-अज्ञात व्यक्ती, पक्षांकडून मदत झाली आणि त्यांनी खडसे यांच्या साम्राज्याला यंदा यशस्वी धडक दिली. गेल्यावेळी शिवसेना पक्षाची उमेदवारी असतानाही अपयश मिळाले, यंदा अपक्ष उमेदवारी त्यांना सोयीची आणि फायद्याची ठरली. मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्याचा काही भाग असा मतदारसंघ असलेले खडसे यांचे प्राबल्य पाटील यांनी संपविले. विधिमंडळात केवळ खडसेच नाही तर त्यांचे वारसदारदेखील पोहोचले नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.मतदारांना कोणीही गृहित धरु नये, हा संदेश या निवडणुकीने सगळ्यांनाच दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव