शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

फोक्सवॅगनची कहाणी : ग्राहकस्थिती दिनवाणी!

By admin | Updated: September 28, 2015 22:00 IST

अवघ्या आठवडाभरात मोटार निर्मिती क्षेत्रातील ‘फोक्सवॅगन’ या जगातील एका बलवान कंपनीची प्रतिष्ठा पार रसातळाला गेली.

विजय दर्डा , (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)अवघ्या आठवडाभरात मोटार निर्मिती क्षेत्रातील ‘फोक्सवॅगन’ या जगातील एका बलवान कंपनीची प्रतिष्ठा पार रसातळाला गेली. अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या आशीर्वादाने १९३७ सालापासून मोटार निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या जर्मन कंपनीचे अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्य, तत्परता व जनसामान्यांसाठी मोटार तयार करण्याचे त्यांचे कसब आता पूर्णपणे संशयाने वेढले गेले आहे. २००८ पासून कंपनीने ईए-१८९ डिझेल इंजिनचा वापर करुन निर्मिलेली आॅडी ए-३, जेटा, बिटल, गोल्फ आणि पसॅट आदि मॉडेल्सची एक कोटीहून अधिक वाहने बाजारात आणली. पण, या सर्व वाहनांमधून प्रदूषणकारी वायूचे उत्सर्जन लपविले जाईल अशी यंत्रणा बसविली गेली. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी अशी काही रचना केली गेली की, जेव्हा प्रदूषणकारी वायुचे उत्सर्जन तपासले जाईल तेव्हा उत्सर्जनाची पातळी बरोबर किमान आवश्यकतेइतकीच भरेल. सदर यंत्रणा पुन्हा वाहनाच्या स्टिअरींगमध्ये बसविली गेली. सामान्यत: ही यंत्रणा डॅशबोर्डवर असते व जेव्हा उत्सर्जन धोक्याच्या पातळीच्या वरती असते, तेव्हा तिथे लाल दिवा लागतो. १९१४ साली जाहीर झालेल्या जगातल्या सर्व क्षेत्रातील बड्या पाचशे कंपन्यांमध्ये फोक्सवॅगनचा नववा क्रमांक लावला गेला होता. दरवर्षी सुमारे एक कोटी वाहनांची या कंपनीची निर्मितीक्षमता आहे. डिझेल इंजिनातून होणारे उत्सर्जन किमान पातळीवर दाखवून कंपनी ग्राहकांना डिझेल इंजिनकडे आकृष्ट करून घेत होती. सदर वाहनांमधून नायट्रोजन आॅक्साईड या प्रदूषणकारी वायुचे उत्सर्जन होते, ज्यामुळे दम्याचा विकार बळावला जातो. आपण काहीही केले, तरी ते खपवून घेतले जाईल हा कंपनीचा अहंभाव आणि उद्दामपणा ही खरी यातील गंभीर बाब आहे. प्रदूषणाच्या रक्षणासाठी आम्ही किती दक्ष आहोत, असे केवळ ही कंपनी सांगत राहिली. परंतु तांत्रिक गडबड करून तिने ग्राहकांची फसवणूक केली. अमेरिकेतील प्रदूषण नियंत्रण संस्थेला गेल्या ३ सप्टेंबर रोजीच कंपनीची लबाडी लक्षात आली होती. परंतु तिचा बभ्रा १८ सप्टेंबरला झाला. इतकेच नव्हे तर इतके होऊनही फक्त पाच लाख वाहनांमध्येच सदोष यंत्रणा बसविली गेल्याचा दावा कंपनी करीत राहिली. पण आता तिचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे. अर्थात हा विषय केवळ एका मोटार निर्मिती उद्योगाबाबत नाही. जर्मनीमधील संपूर्ण आॅटो विभागापुढे आता एक आव्हान उभे राहिले आहे. ग्रीसमधील आर्थिक आव्हानापेक्षा ते कितीतरी पटीने मोठे आहे. आपली प्रतिष्ठा आणि प्रतिमा गमावून फोक्सवॅगनला १८ बिलीयन डॉलर्स इतका दंड भरावा लागेल. शिवाय कोर्ट कचऱ्यांना सामोरे जावे लागेल ते वेगळेच. कंपनीने सदोष मोटारी दुरुस्त करण्यासाठी जी सात बिलियन डॉलर्सची तरतूद केली आहे, ती फारच किरकोळ आहे. प्रत्यक्षात प्रत्येक वाहनाचा दोष दूर करायचा तर सातशे डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. पण तसे झाले तरी आता कंपनीच्या प्रत्येक वाहनाची पूर्ण तपासणी केली जाईल व कंपनीला प्रत्येक वाहनामागे ३७.५ हजार डॉलर्सचा दंड भरावा लागेल. परंतु याहूनही सर्वात मोठी हानी होईल कंपनीच्या प्रतिष्ठेची. यापुढे फोक्सवॅगनवर कोण आणि कसा विश्वास ठेवील? नवीन वाहनांच्या विक्रीचा तर प्रश्नच नाही, पण या कंपनीची जुनी वाहने तरी आता कोण विकत घेईल? आणि ज्यांनी याआधीच फोक्सवॅगची वाहने खरेदी केली आहे, त्यांचे काय होणार? कारण ही वाहने मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित करीतच राहणार. त्यावर उपाय काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन विन्टरकोड यांची हकालपट्टी व त्यांच्या जागी मथाईस मुलर यांची नियुक्ती करून कंपनीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कंपनीतील काही मोजक्या लोकांनी ही गडबड केली, असे सांगत काही कामगारांना कंपनीने बडतर्फही केले आहे. पण त्यामुळे कंपनीची घसरलेली प्रत सावरली जाईल असे अजिबातच नाही. फोक्सवॅगनच्या या प्रकरणातून आता सर्वच बड्या व्यावसायिकांनी धडा शिकण्याची गरज आहे. सात वर्षांपासून फोक्सवॅगनमध्ये अव्याहत हा उद्योग सुरू होता व लोकांची तसेच सरकारची फसवणूक केली जात होती. पण म्हणतात ना, तुम्ही सर्वकाळ सर्वांना मुर्खात काढू शकत नाही! महाराष्ट्रात चाकण येथे फोक्सवॅगनचा छोटासा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषणकारी वाहनांची निर्मिती होत होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. कंपनीने इतरत्र तयार केलेली प्रदूषणकारी वाहने भारतीय बाजारात आणली होती वा नाही, हेही अजून गुलदस्त्यात आहे. पण तसे असले तरी आता भारतीय रस्त्यावर धावणाऱ्या फोक्सवॅगनच्या सर्व वाहनांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाईल हे उघड आहे. भारतात आलीशान मोटारी खरेदी करणारे जे ग्राहक आहेत, त्यांच्याकडून संबंधित कंपन्या गुणवत्ता व सेवा यासाठी किती भरमसाठ रक्कम आकारत असतात याची पूर्ण कल्पना असली तरी शेवटी त्यांना उत्पादकाच्या दयेवरच अवलंबून राहावे लागते. कारण ‘घ्यायचे तर घ्या, नाहीतर घेऊ नका’ अशा वृत्तीने बडे निर्माते वागत असतात. परदेशात ज्या प्रमाणात ग्राहक जागृती झाली आहे, तेवढ्या प्रमाणात आणि तितकी जागृती अजून भारतात झालेली नाही. परिणामी जोवर वाहनांमधील दोष तपासी यंत्रणेला आढळत नाही, तोपर्यंत ग्राहकांना त्याचा काही पत्ताच लागत नाही. फोक्सवगॅनच्या प्रकरणामुळे आपल्याला नक्कीच जागे केले आहे. व्यापारासाठी आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीची उत्पादने भारतात मागवत असलो तरी त्यांच्या उत्पादकांच्या दयेवर आपण बाजारपेठ मोकळी सोडू शकत नाही. १९५० साली हीच फोक्सवॅगन कंपनी आपल्या मोटारविषयी जाहिरात करीत असताना म्हणत असे की, ‘इंथन संपले तुम्ही सहजगत्या ही मोटार ढकलून नेऊ शकता’ पण वास्तवात एखाद्या ग्राहकाच्या मनातील विश्वासाचे इंथन संपले तर त्यावर काहीही उपाय योजला जाऊ शकत नाही!जाता जाता....नागपुरातील प्रख्यात विधिज्ञ शशांक मनोहर आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचीे सूत्रे आपल्या ताब्यात घेणार हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. निष्ठा, सचोटी आणि बाणेदारपणा या गुणत्रयीच्या आधारे त्यांनी यापूर्वी स्वत:ला कुशल क्रिकेट प्रशासक म्हणून सिद्ध केले आहे. विशेषत: बेटींग आणि मॅच फिक्सींग अशा प्रकारांमध्ये नियामक मंडळाची पत आणि प्रतिमा ढासळलेली असताना मनोहर यांची नियुक्ती होणे हा एक अत्यंत योग्य निर्णय म्हणावा लागेल. मनोहर यांच्याबाबतीत सगळ्यात महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे, ते उक्तीने नव्हे तर कृतीने बोलत असतात.