शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

गांधी-आंबेडकरांचे विचार परस्परपूरक

By admin | Updated: October 29, 2014 01:28 IST

नेहरू आणि पटेल यांनी खांद्याला खांदा लावून काम केले हे वास्तव असले, तरी आजच्या राजकारणाने या दोघांना राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून कसे रंगवले याविषयी मी मागील स्तंभात लिहिले होते.

नेहरू आणि पटेल यांनी खांद्याला खांदा लावून काम केले हे वास्तव असले, तरी आजच्या राजकारणाने या दोघांना राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून कसे रंगवले याविषयी मी मागील स्तंभात लिहिले होते. आज मी, गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर या  भारतीय महान पुरुषांच्या जोडीविषयी लिहिणार आहे. या दोघांची दूरदृष्टी वेगवेगळी होती, की परस्परपूरक होती? 
पटेल आणि नेहरू एकाच राजकीय पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये सहकारी होते. गांधी-आंबेडकरांविषयी तसे म्हणता येणार नाही. हे दोघे कधीही एकाच पक्षात नव्हते. सन 192क्च्या मध्यामध्ये विदेशातील अभ्यास आटोपून आंबेडकर परतले तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे गांधींकडे आली होती. गांधीजी तेव्हा ‘महात्मा’ होते. सारे त्यांचा आदर करीत. आदरभावाने त्यांच्याकडे पाहत. आंबेडकरांनी स्वत:चा वेगळा राजकीय मार्ग निवडला. गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात हा मार्ग होता. 193क् आणि 4क् या दोन दशकांमध्ये  आंबेडकरांनी गांधींवर कडाडून टीका केली. ‘हरिजन उत्थाना’कडे पाहण्याचा गांधींचा दृष्टिकोन उपकार केल्यासारखे वाटणारा आहे असे त्यांना वाटे.  अस्पृश्यतेचा डाग काढून हिंदू धर्माचे शुद्धीकरण करण्याची गांधींची इच्छा होती. पण आंबेडकरांना हिंदुवादच मान्य नव्हता. समान नागरिक बनण्यासाठी  दलितांनी धर्मातर करावे असे त्याना वाटे.      
आंबेडकर आणि गांधी त्यांच्या आयुष्यकाळात नक्कीच राजकीय विरोधक होते. त्यांच्या मृत्यूला आता 6क् वर्षे झाली. एवढा काळ लोटल्यानंतर आजही आपण त्यांना त्याच रूपातच पाहणो  आवश्यक नाही, पण तरीही तसेच पाहिले जाते.  अरुण शौरी यांनी ‘फाल्स गॉड’ म्हणून आंबडेकरांवर पुस्तक लिहिले. आपल्या पुस्तकात आंबेडकरांवर त्यांनी दोन आरोप केले आहेत. त्यांनी ब्रिटिशांची बाजू घेतली, हा पहिला आरोप. ‘चले जाव’ चळवळीच्या काळात ते व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत होते. गांधींशी ते वाद घालत, कधीमधी अपशब्दही वापरत, हा दुसरा आरोप. अरुंधती रॉय या डाव्या विचारसरणीच्या. अलीकडे ‘फाल्स महात्मा’ नावाने त्यांचे एक पुस्तक आले आहे. गांधी हे जातिव्यवस्थेचे पुराणमतवादी संरक्षक होते असा रॉय यांनी दावा केला आहे. 
अरुण शौरी आणि अरुंधती रॉय इतिहासाकडे नायक आणि खलनायकाच्या भूमिकेतून बघतात. पण इतिहासकाराने घटनांमधील सूक्ष्म गोष्टींकडेही लक्ष पुरवायला हवे आणि त्यांच्या छटा समजून घ्यायला हव्यात. शौरींना आव्हान देत कुणीतरी विचारले पाहिजे, की आंबेडकर ब्रिटिशांच्या बाजूने का उभे राहिले? आंबेडकर तसे उभे राहिले कारण काँग्रेसवर ब्राrाणांचे वर्चस्व होते. ब्राrाणांनी  दलितांवर जुलूम केले आणि स्वतंत्र भारतात ते सत्तेवर आले तर पुन्हा जुलूम करू शकतात, त्या कारणाने आंबेडकर तसे वागले. जोतिबा फुले आणि पंजाबातील आदी-धर्म चळवळीचे नेते मंगू राम यासारख्या समाजसुधारकांनीही हाच विचार केला.  काँग्रेसच्या तुलनेत शासक हे कमी दुष्ट आहेत असे त्यांना वाटे. 
अरुंधती रॉय यांनी गांधीजींच्याच निवडक पण संदर्भहिन वाक्यांचा वापर करून त्यांचे चित्र ह्यसंथ गतीने चालणारे प्रतिगामी नेते अशी त्यांची प्रतिमा रंगवली आहे. डेनिस डाल्टन, मार्क लिंडले आणि अनिल नौरिया या अभ्यासकांनी गांधी हे जातवादाचे कट्टर टीकाकार झाले होते असे दाखवून दिले आहे.  सुरुवातीला त्यांनी अस्पृश्यतेवर टीका केली. तसे करताना त्यांनी इतरांना जातवादी राजकारण करू दिले. आपल्या चळवळीतून त्यांनी सर्व जातींनी एकमेकांत मिसळावे, इतकेच नव्हे तर एकत्र भोजनही करावे याचा पुरस्कार केला. त्यानंतर त्यांनी आपल्या आश्रमात आपण फक्त दलित आणि सवर्ण यांच्यातील विवाहाला आशीर्वाद देऊ असे सांगितले. या त:हेने त्यांनी जातिव्यवस्थेच्या मुळालाच हात घातला. गांधींची अस्पृश्यता निमरूलनाची चळवळ डाव्या पक्षांना भ्याडपणाची वाटण्याची शक्यता आहे. पण त्या काळात ती अत्यंत धाडसाची होती. त्यांनी हिंदू कर्मठपणाच्या मुळालाच हात घातला. संस्कृत ठाऊक नसलेल्या बनिया व्यक्तीने हिंदू धर्मग्रंथांतील अस्पृश्यता मान्य करणा:या विचारांना आव्हान दिल्याने शंकराचार्य त्यांच्यावर संतापले होते. वसाहतवादी अधिका:यांकडे त्यांनी याचिका दाखल करून महात्मा गांधींना हिंदू समाजातून बहिष्कृत करण्यात यावे अशी मागणी केली होती. 1933-34 मध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यताविरोधी मोर्चा नेला तेव्हा हिंदू महासभेच्या कार्यकत्र्यानी त्यांना काळे ङोंडे दाखवले तसेच त्यांच्या अंगावर विष्ठा फेकली. जून 1934 मध्ये पुणो शहरात त्यांची हत्या करण्याचाही प्रय} झाला. गांधींची ही चळवळ त्यांच्या स्वत:च्या पक्षातच फारशी लोकप्रिय नव्हती. महात्मा गांधींनी स्वराज्य मिळवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे आणि सामाजिक सुधारणांचा विषय बाजूला ठेवावा असे  पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल आणि अन्य नेत्यांना वाटत होते. त्यांचा विरोध असतानाही महात्मा गांधींनी नेहरू आणि पटेल यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घेण्यात यावे असे सुचवले होते. स्वातंत्र्य मिळाले आहे ते काँग्रेसला नसून राष्ट्राला मिळाले आहे असे गांधींचे मत होते. त्यामुळे राष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात पक्षभेद बाजूला ठेवून सर्व गुणवंतांचा समावेश करण्यात यावा असे ते म्हणाले होते. त्यांच्यामुळे डॉ. आंबेडकर हे कायदामंत्री होऊ शकले.   
गांधी व आंबेडकर यांच्या संबंधांचे मूल्यमापन करण्यासाठी डी.आर. नागराज यांचे ‘द फ्लेमिंग फीट’ हे पुस्तक वाचायला हवे. नागराज आपल्या पुस्तकात लिहितात, ‘‘आजच्या दृष्टिकोनातून या दोघांचे मूल्यमापन करण्याची नितांत गरज आहे.’’ त्यांचे हे म्हणणो बरोबर आहे. वरून तसेच खालून जेव्हा दबाव येतो तेव्हाच सामाजिक सुधारणा घडून येत असतात. फेड्रिक डग्लस यांच्यासारख्या  टीकाकारांच्या मतांना प्रतिसाद दिला नसता तर अब्राहम लिंकनना गुलामगिरी नष्ट करता आली नसती. मार्टिन ल्यूथर किंग आणि त्यांच्या चळवळीतील नैतिक शक्ती मान्य केली नसती तर  लिंडन जॉन्सन यांना मानवी अधिकारांचा समावेश कायद्यात करणो शक्य झाले नसते.  
गांधी आणि आंबडेकर हे आयुष्यभर परस्परांचे विरोधक राहिले. पण इतिहासाच्या भूमिकेतून पाहता  त्यांनी सामाजिक संस्थांमधील किळसवाण्या गोष्टी  दूर करण्यासाठी परस्परपूरक अशी भूमिका बजावल्याचे दिसते. अस्पश्यतेला आव्हान देण्याचे काम उच्च जातीत जन्मलेल्या महात्मा गांधींइतके अन्य कुणी केलेले नाही. तर दलित समाजातून पुढे आलेले डॉ. आंबेडकर हे खरोखरच महान नेते होते. कायद्याने अस्पृश्यता जरी संपवली असली तरी दलितांना भेदभावपूर्ण वागणूक देण्याचे काम देशाच्या अनेक भागात सुरू असल्याचे पाहायला मिळते. अस्पृश्यता पूर्णपणो नष्ट करण्यासाठी डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनाच समोर न्यावे लागेल.  
 
रामचंद्र गुहा
विचारवंत व इतिहासकार