शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

विदर्भाचा ‘विजय’ कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:25 IST

तब्बल ६० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी करंडकावर आपले नाव कोरत विदर्भ संघाने इतिहास रचला आणि ‘सोशल मीडिया’वर एक नवी चर्चा सुरू झाली. हा विजय वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे एक पाऊल ठरेल, असा विश्वास विदर्भवाद्यांना वाटू लागला आहे.

तब्बल ६० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी करंडकावर आपले नाव कोरत विदर्भ संघाने इतिहास रचला आणि ‘सोशल मीडिया’वर एक नवी चर्चा सुरू झाली. हा विजय वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे एक पाऊल ठरेल, असा विश्वास विदर्भवाद्यांना वाटू लागला आहे. मात्र केवळ विश्वास वाटणे आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. केवळ ‘सोशल मीडिया’वर वेगळ्या विदर्भाचे समर्थन करत आंदोलनाची भाषा करणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार ठरतो. विदर्भाच्या क्रिकेट संघाने मिळविलेला विजय हा सांघिक प्रयत्नांचा आहे. त्यामागे कठोर परिश्रम व अनेक वर्षांची तपस्या आहे. या स्पर्धेत तर कामगिरीतील सातत्यामुळेच यशाचा टप्पा गाठता आला. वेगळ्या विदर्भ राज्यासाठीचे आंदोलनदेखील तसे जुनेच आहे. मात्र वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे आंदोलनदेखील बदलत गेले. कधीकाळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी विदर्भाच्या आंदोलनाला नेतृत्व दिले. मात्र काळाच्या ओघात आंदोलनातील सातत्य हरवत गेले. मधली काही वर्षे तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अक्षरश: थंडबस्त्यात पडला होता. नाही म्हणायला प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही हौशी कार्यकर्ते ‘जय विदर्भ’ म्हणत पत्रकबाजी करायचे. मागील लोकसभा निवडणुकांनंतर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा खºया अर्थाने परत चर्चेत आला. मात्र अ‍ॅड.श्रीहरी अणे वगळता या आंदोलनाला सक्षम नेतृत्व लाभू शकले नाही. नाही म्हटले तरी आता आ.आशिष देशमुख या आंदोलनाला राजकीय नेतृत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नेतृत्वामागे जनतेचे समर्थन असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जनतेच्या भरवशावरच लोकशाहीत विजय मिळविणे शक्य आहे. विदर्भाच्या क्रिकेट संघाच्या मागे जनतेचे आशीर्वाद होते, भावना जुळल्या होत्या. या खेळाडूंनी जनतेमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला होता. या संघाकडून विदर्भवाद्यांनीदेखील शिकवण घेण्याची आवश्यकता आहे. केवळ गप्पा हाकून किंवा वर्तमानपत्रांमध्ये छायाचित्र छापून विजय मिळू शकत नाही. विजय मिळविण्यासाठी तप लागते, घाम गाळावा लागतो. विदर्भवाद्यांनी ‘एअर कन्डिशन्ड’ आंदोलनाची तºहा सोडून जनतेमध्ये जाऊन वेगळ््या विदर्भासाठी समर्थन जुटविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यात नियोजन आणि सातत्य अपेक्षित आहे. जर कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे घाम गाळला तरच जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल व वेगळ्या विदर्भ राज्याची स्वप्नपूर्ती होऊ शकेल. जर असे झाले तर एक दिवस विदर्भ राज्याची चमू रणजी करंडक उंचावेल आणि तो सर्वार्थाने दुग्धशर्करा योग ठरेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या