शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहारी...विगन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:05 IST

Food News: आजच्या घडीला मात्र शाकाहार हा मोठा प्रकार झालाय आणि त्यातही विगन, म्हणजे फक्त भाज्या-फळे खाणारे नाहीत तर प्राणिजन्य पदार्थ, दूध, दही, मध हेही न खाणारे आहेत. पण गंमत याची वाटते की अनेकांना पदार्थांचे रुपडे पालटून टाकायची हौस असते.

- शुभा प्रभू-साटमआदिमानवाचा मेंदू विकसित होऊन तो प्रगत मानव होण्याआधी शाकाहारी नव्हता. त्याने अपघाताने आगीत भाजलेले अन्न खाल्ले आणि अन्न शिजवणे म्हणजे स्वयंपाक सुरू झाला. त्याआधी मानवजात जराही शाकाहारी नव्हती. आजच्या घडीला मात्र शाकाहार हा मोठा प्रकार झालाय आणि त्यातही विगन, म्हणजे फक्त भाज्या-फळे खाणारे नाहीत तर प्राणिजन्य पदार्थ, दूध, दही, मध हेही न खाणारे आहेत. पण गंमत याची वाटते की अनेकांना पदार्थांचे रुपडे पालटून टाकायची हौस असते.

आता सुशी घ्या. ती कशी करतात हे जगज्ञात आहेच, पण डोक्यालिटीने त्याचे पूर्ण शाकाहारी व्हर्जन आणले आहे. अन्य आहारात जे जे आहे त्याचे जवळपास पूर्ण शाकाहारी रूप आपल्याला मिळते. मोठ्ठे उदाहरण, मॅकडोनाल्ड. त्यांच्या बर्गरमध्ये काय असते ते जगजाहीर. पण भारतातील शाकाहारी लोकांच्या भावना सांभाळायच्या म्हणून या अमेरिकी व्यापाऱ्याने बटाटा टिक्की, पनीर मसाला अशा चवीचे बर्गर आणले. व्हेज मांचुरियन, पनीर चिली, व्हेज फ्राइड राइस माहीत नाही असा कोणी भारतीय शाकाहारी खवय्या नसेल. तुमची अमुक बिर्याणी, आमची व्हेज, पनीर टिक्का, व्हेज बटर बिर्याणी. तुमचे अमुक कबाब तर आमचे ब्रोकोली/ फ्लॉवर/मशरूम/ पनीर टिक्का, रेशमी.कबाब. तुमचे हॉट सौर सूप आमचे शिमला कॉर्न हॉट ॲन्ड सौर सूप. तुमची फ्रँकी आमची चीज पनीर फ्रँकी आणि सर्वांत मोठ्ठा घोळ म्हणजे पनीर भुर्जी. 

मला इथे एक प्रश्न पडतो की मूळ पदार्थ काय चवीचा आहे हे शाकाहारी कसे ओळखतात? की कोणा माहितगाराची मदत घेतात? कारण बिर्याणीत किंवा बटर मसाल्यात मूळ पदार्थ/ घटक असतो त्याची चव ही त्या डीशला खुलवते. एक बावळट प्रकार म्हणजे कोफ्ता करी. मूळ कोफ्ता करी कशाची असते हे ठाऊक असेलच. दुधी भोपळ्याचे कोफ्ता करतात राजेहो...का पण?

या  सर्व पदार्थांचे शाकाहारी व्हर्जन तडाखेबंद खपते... आणि या शाकाहारी पंथातील कट्टर प्रवाह म्हणजे विगन. दूध, दुग्धजन्य पदार्थ, त्यांना बिलकुल चालत नाहीत. म्हणजे केक करतोय तर त्यात बटर नाही तर बदाम क्रीम घालणार किंवा कोकोनट क्रीम, मिल्कशेक आहे तर त्यात ओट्स/ बदाम दूध, चहात पण हेच. फरक इतका की त्या बदाम दुधाच्या खर्चात चार महिन्यांच्या दुधाचे बिल निघेल. मुद्दा काय की मूळ पदार्थाचे शाकाहारी/ विगन रूप आणण्यामागे हेतू काय? आपली ठराविक आहारनिष्ठा अबाधित ठेवून वेगळी चव घेण्याची ऊर्मी? की हम भी कुछ कम नहीं हे दाखवायची खुमखुमी? 

टॅग्स :foodअन्न