शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

Coronavirus: लस घेतली, तरीही मास्क हेच खरे शस्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 00:11 IST

भारतातील फक्त ४४ टक्के लोक योग्य प्रकारे मास्क घालतात. मास्कचे कापड कसे आहे, तो कसा घातला आहे, यावर मास्कची परिणामकारकता ठरते!

- डॉ. समीरण पांडा

गेल्या वर्षभरामध्ये प्रामुख्याने चर्चिला गेलेला विषय म्हणजे फेस मास्क. कोविड-१९ बाधित रुग्णाच्या बोलण्याने, खोकण्याने व शिंकण्याने  सूक्ष्म जिवाणूंनी भरलेल्या थुंकीचे थेंब, अतिसूक्ष्म एरोसोल हवेत पसरतात. मास्क घातल्याने या रोगाने बाधित होण्याचा धोका कमी होतो. अगदी  प्लेगच्या (१९१०-१९११) महामारीतही मास्कचा वापर केला गेला. या महामारीला नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेने हा हवेतून पसरणारा न्यूमोनिक प्लेग असल्याची जाणीव ठेवून नागरिकांना मास्क वापरण्यास प्रोत्साहित केल्याची नोंद आहे.

काही वर्षांनंतर पाश्चिमात्य देशात फ्लूच्या महामारीत अनेक-पदरी  मास्कचा वापर या रोगापासून बचावासाठी केला गेला. परंतु दुय्यम दर्जाचे कापड तसेच नागरिकांनी दिलेल्या अल्पप्रतिसादामुळे याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. शंभर वर्षांनंतर, आपण वैद्यकीय क्षेत्रात अधिक प्रगत झालो आहोत, तरीदेखील मास्क हा अशा प्रकारच्या रोगांपासून बचावासाठीचा वापरल्या जाणाऱ्या उपायांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये नोवेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या सार्स, मर्स आणि कोविड-१९ सारख्या रोगांचा समावेश आहे.

कोविड-१९ महामारीच्या सुरुवातीला या रोगाच्या प्रादुर्भावाबाबत स्पष्टता नव्हती. तरीदेखील पूर्व-आशियाई देश तैवान, हाँगकाँग व साऊथ कोरियाने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापराचे निर्देश दिले. अनेक वर्षांपूर्वी आलेल्या महामारीच्या पूर्वानुभवातून हे केले गेले होते. याउलट, पाश्चिमात्य देशांमध्ये मास्क वापरासंबंधी आदेश काढण्यात झालेल्या दिरंगाईमुळे मोठ्या प्रमाणात  प्रादुर्भाव पसरला. जर १४ मार्च २०२०च्या आधी मास्क वापरण्याची सक्ती केली गेली असती तर कदाचित पन्नासेक हजार लोकांचे जीव मेअखेरीस वाचले असते असे अमेरिकेतील एका अभ्यासात दिसून आले आहे. 

भारतामध्ये ३० जानेवारी, २०२० रोजी कोविड-१९चा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांची तपासणी, देशांतर्गत प्रवासावर आणलेली बंधने तसेच २४ मार्चपासून केलेल्या लॉकडाऊनने कोविड-१९चा वेग कमी करण्यास मदत झाली. यानंतर मास्कचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केलेला सेरॉलॉजिकल सर्व्हे यादृष्टीने महत्त्वाचा ठरतो. मे-जून २०२०२मध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये ०.७ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंड (अँटिबॉडीज) आढळून आले, तर सप्टेंबरमधील सर्व्हेत हा आकडा ७ टक्के एवढा होता. पुन्हा जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा २५ टक्केच्या घरात असल्याचे समजून येते. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या फक्त एकचतुर्थांश लोकांमध्ये प्रतिपिंड तयार झाले आहेत. याचा अर्थ असा की, आपण या रोगासाठीच्या समूह प्रतिकारशक्ती (हर्ड-इम्युनिटी) पासून खूप लांब आहोत व आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे.

अनावधानाने कोणाच्या संपर्कात आल्यास मास्कचा वापर केल्याने या रोगाच्या प्रादुर्भावापासून आपल्याला वाचता येते. हवेत पसरणाऱ्या थुंकीला थांबवण्याचे काम या मास्कद्वारे होते. बाजारात तीन प्रकारचे मास्क आहेत. कापडी मास्क, मेडिकल मास्क आणि रेस्पिरेटरी मास्क (एन-९५, एन-९९). सार्वजनिक वापरासाठी कापडी मास्कचा वापर, तर हायरिस्क ठिकाणी काम करणाऱ्यांनी मेडिकल किंवा रेस्पिरेटरी मास्कचा वापर करावा अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.

कापडी मास्कमुळे तोंडाद्वारे बाहेर पडणारे छोटे-मोठे कण (थुंकी) रोखण्यास मदत होते. एकापेक्षा जास्त पदर असलेले कापडी मास्क वापरल्यास ऐरोसोल कणांना रोखण्याची क्षमता ५०-७० टक्क्यांपर्यंत वाढते. कापडी मास्कमध्ये वापरलेले कापड, वीण व त्याच्या फिटिंगवर त्याची परिणामकारकता ठरते.  कापडाला किमान तीन पदर असल्यास उपयुक्त ठरते. कॉटन सिल्क, कॉटन शिफॉनसारखे कापड अधिक चांगले फिल्टर मानले जाते. बाहेरचा पदर हायड्रोफोबिक (पाणीयुक्त कण थांबवणारा) हवा, त्याचे मटेरियल कॉटन-पोलिस्टर किंवा पोलिस्टर असावे. मधला पदर नॉनवोव्हन पोलीप्रॉपिलीन, तर आतील पदर हॅड्रोफिलिक (पाणीयुक्त कण शोषणारा) असायला हवा जेणेकरून तोंडा व नाकावाटे येणारे थुंकीयुक्त कण शोषून घेऊ शकेल. 

मेडिकल मास्क नॉनवोव्हन मटेरिअलने बनलेले असतात.  कापडी व मेडिकल मास्कपेक्षा विनाफट असलेले एन-९५ व एन-९९ रेस्पिरेटरी मास्क अधिक परिणामकारक ठरतात. कापडी मास्क वापरानंतर रोज साबण वापरून गरम पाण्याने धुणे महत्त्वाचे. मेडिकल मास्कचा वापर एकदाच करता येतो, तर रेस्पिरेटरी मास्कचा तुटवडा भासल्यास ते रि-प्रोसेस करून वापरता येऊ शकतात. मास्कच्या वापरानंतर काळजीपूर्वक त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. 

भारतातील फक्त ४४ टक्के लोक योग्य प्रकारे मास्क घालतात, असे नुकतेच एका सर्व्हेमध्ये  आढळून आले. श्वास घेण्यास त्रास होऊ नये तसेच कानाला व इतरत्र इजा पोहचू नये यासाठी योग्य प्रकारच्या मास्कचा वापर करण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे. व्यायाम करताना योग्य प्रकारचा मास्क वापरल्यास रोगाच्या प्रादुर्भावाचा धोका टाळता येऊ शकतो, योग्य मास्क वापरल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अजिबात कमी होत नाही. दोन वर्षाहून लहान बाळांना, सेरिब्रल पालसी हा रोग असणाऱ्या व्यक्तींना व स्वतःहून मास्क काढू शकत नाहीत अशा दिव्यांगांना मास्कचा वापर करू देऊ नये.

शारीरिक अंतर ठेवणे जिथे अवघड वाटते तिथे स्वस्त आणि सोपा पर्याय असलेल्या या मास्कचा वापर केला जाऊ शकतो. ट्रेन, लोकल व बसचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी हा सोपा उपाय आहे. मास्कच्या वापरासोबतच आता लसीकरण करणेदेखील गरजेचे बनले आहे. लसीकरणाची मोहीम जरी वेग घेत असली तरी आपल्यामध्ये हर्ड-इम्युनिटी तयार होण्यास अजून बराच अवधी आहे.  लसीकरणानंतर आपल्याला होणारा धोका कमी होणार आहे, परंतु लसीकरण केलेल्या व्यक्तींपासूनसुद्धा दुसऱ्या व्यक्तीला प्रादुर्भाव शक्य आहे !... म्हणूनच मास्कला पर्याय नाही!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस