शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

व्यवसाय व राजकारणात धक्कातंत्राचा वापर हेच नवे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:47 IST

व्यवसायात तसेच राजकारणातसुद्धा यशस्वी होण्यासाठी सतत नवीन डावपेच वापरण्यात येत असतात. तोच तोपणा बाजूला सारून धक्कातंत्राचा वापर करणे सुरू झाले आहे. व्यवसाय आणि राजकारण यांच्यात याबाबतीत साम्य आहे. यशस्वी प्रचार मोहीम राबविण्यासाठी जोएम ब्रॉडशा या राजकीय विचारवंताने एकेकाळी जे चार सिद्धान्त प्रस्थापित केले होते, ते आता कालबाह्य झाले आहेत.

- डॉ. एस.एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीईएडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरूव्यवसायात तसेच राजकारणातसुद्धा यशस्वी होण्यासाठी सतत नवीन डावपेच वापरण्यात येत असतात. तोच तोपणा बाजूला सारून धक्कातंत्राचा वापर करणे सुरू झाले आहे. व्यवसाय आणि राजकारण यांच्यात याबाबतीत साम्य आहे. यशस्वी प्रचार मोहीम राबविण्यासाठी जोएम ब्रॉडशा या राजकीय विचारवंताने एकेकाळी जे चार सिद्धान्त प्रस्थापित केले होते, ते आता कालबाह्य झाले आहेत.नव्या उपक्रमातून विकास साधण्यासाठी धक्कातंत्राचा उपयोग हे आता प्रभावी माध्यम ठरले आहे, असे हार्वर्ड बिझिनेस रेव्ह्यू या नियतकालिकाने दोन वर्षापूर्वी स्पष्ट केले होते. डिलाईट युनिव्हर्सिटी प्रेसचा धक्कातंत्रविषयक अहवाल हा त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. लहान कंपन्यांच्या मालकांनी या अहवालांना मार्गदर्शक म्हणून स्वीकारले आहे. इन्टेल, सदर्न न्यू हँपशायर विद्यापीठ आणि सेल्सफोर्स डॉट काम यांनीही यशस्वी होण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.ज्या कंपन्यांना बँका आणि पतसंस्था यांचेकडून पारंपरिक कर्ज मिळत नाही, त्यांना कर्ज देण्याचे काम एम.सी.सी. (मर्चंट कॅश अँड कॅपिटल) ही संस्था करीत असते. या संस्थेने कर्ज देताना लागणारी व्यक्तिगत हमी बाजूला सारून कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. जे कर्ज मिळायला पूर्वी कित्येक दिवसच नव्हे तर कित्येक महिने लागत ते कर्ज या संस्थेतर्फे तीन दिवसात मिळू लागले. त्यामुळे या संस्थेने प्रस्थापित संस्था आणि परंपरांना हादरे दिले आहेत. ती संस्था नव्या परंपरा निर्माण करीत आहे. त्यामुळे पूर्वी यशस्वी ठरलेल्या कंपन्या गडबडल्या आहेत. याच धक्कातंत्राचा वापर करण्याचे काम आता अलीकडच्या राजकारणाने सुरू केले आहे.अव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेची हॉर्वर्ड बिझिनेस रेव्ह्यूू या नियतकालिकाने व्याख्या केली आहे. कमी साधने असलेली एखादी कंपनी एखाद्या प्रस्थापित कंपनीला आव्हान देत स्वत:च्या उत्पादनात आणि सेवेतसुद्धा सुधारणा घडवून आणते, तेव्हा ती प्रस्थापित व्यवस्थेला झुगारूनच देत असते.आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या घटकांवर ती लक्ष केंद्रित करते. तसेच कमी किमतीत अधिक उपयुक्त वस्तूंचा पुरवठा करते, त्या वस्तूच्या मागणीत वाढ करते. त्यामुळे प्रस्थापित उद्योगांनाही त्याच मार्गाचा अवलंब करणे भाग पडते. राजकारणातसुद्धा हे तंत्र उपयोगी पडू शकते व ते प्रस्थापित पक्षांना धक्के देऊ शकते.या सिद्धांताचा उपयोग करून प्रस्थापित पक्षाला आव्हान देणाºया एका पक्षाने तंत्रज्ञांच्या मदतीने तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने उपयोग करून, आपल्या सेवाकार्यात वाढ करून प्रस्थापितांना खूपच मागे ढकलले आहे. त्यामुळे प्रस्थापितांना त्यांचेशी स्पर्धा करणे शक्य होत नाही. त्यासाठी त्यांना नवीन धक्कातंत्राचा शोध घ्यावा लागतो आणि त्याचा वापर करावा लागतो. तेव्हा कुठे त्यांना यश दिसू लागते.व्यवसायाच्या क्षेत्रात उबेरने केलेल्या प्रगतीचे उदाहरण या संदर्भात देता येईल. राजकीय क्षेत्रात देखील प्रस्थापित पक्ष आणि त्याला आव्हान देणारा पक्ष असे उदाहरण उपलब्ध आहे. आव्हान देणाºया पक्षाने धक्कातंत्राचा जो वापर केला तोच आता प्रस्थापित पक्षाला देखील करावा लागणार आहे. धक्कातंत्रात काळ्या पैशाचे कंबरडे मोडणारी नोटबंदी किंवा संपूर्ण देशभर लागू झालेला वस्तू व सेवा कर किंवा डिजिटल अर्थकारणाचा उपयोग किंवा तिहेरी तलाक रद्द करण्याचे विधेयक यांचा समावेश करता येईल. सेवांसाठी ‘आधार’ जोडल्यामुळे निर्माण होणाºया शक्यता अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत. सेवांना आधार जोडल्याने एकतर पूर्वी कधी झाली नाही याप्रकारे माणसे जोडली जातील किंवा मानवी जीवन दुरुस्त होण्यापलीकडे उद्ध्वस्त होईल!देशाच्या वैचारिक धारणेत बदल घडवून आणणारे नवे धक्कातंत्र वापरले तर त्याच्या अंमलबजावणीसाठी नवे डावपेच वापरावे लागतात. मूल्य व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणारे धक्कातंत्र नेहमीच वापरता येत नाही. उलट त्यात मिळालेल्या अनुभवातून बदल न केल्यास ते अपयशी ठरण्याचाही धोका संभवतो. मग त्या पद्धतीच्या उपयोगितेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते.कधी कधी सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचे पालन न करणेही आवश्यक असते. धक्कातंत्रामुळे पक्षाचा किती फायदा होईल याचा अंदाज बांधून त्यादृष्टीने धक्कातंत्राचा वापर करून पक्षाला त्या उंचीपर्यंत नेले जाऊ शकते. बुलेट ट्रेन, सागरी विमान सेवा, सागरी वाहतूक या नवीन कल्पना असून त्यांचे लोकांना आकर्षण वाटत असते. गुजरातच्या निवडणुकांनी या धक्कातंत्राची उपयोगिता दाखवून दिली आहे. त्या निवडणुकीत सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते उतरले होते. एखाद्या राज्याची निवडणूक एवढ्या गांभीर्याने घेतली गेल्याचे दुसरे उदाहरण आढळणार नाही.धक्कातंत्रासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. कधी ते टष्ट्वीट असते किंवा एखाद्या प्रचारधर्माची सुरुवात असते. त्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावीत असते. परंपरांना आव्हान देणाºयांनी दोन वर्षांपूर्वी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आजही तो विविध प्रकारे करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा वापर केला जातो. त्यासाठी विविध प्रकारची माहिती गोळा करून ती कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकांपर्यंत पोचविली जाते. त्याचा प्रथम उपयोग करणारा पहिल्या क्रमांकावर राहतो तर नंतर उपयोग करणाºयाला दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागते. लोकमानस जाणून घेण्याचा सध्याचा काळ आहे. सतत स्पर्धा सुरू असते. ती कधी थांबत नाही. धक्कातंत्राचा वापर केल्यावर त्याची साहजिकच प्रतिक्रिया उमटते. राजकारणात धूर्तपणा आवश्यक असतो. आले अंगावर घेतले शिंगावर हा राजकारणात तरी गुण समजला जातो.सध्या डिजिटलचे धक्कातंत्र वापरणे सुरू आहे. हा वापर राजकीय नेत्यांकडून केला जात आहे हेही तसे धक्कादायकच म्हटले पाहिजे! 

टॅग्स :GovernmentसरकारGSTजीएसटीNote Banनोटाबंदी