शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

US Election 2020:  महासत्तेचा महाकाैल; १२० वर्षांमधील सर्वाधिक ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 06:05 IST

US Election 2020: आधीच्या कलचाचण्यांमध्ये ही निवडणूक जितकी बायडेन यांच्या बाजूने झुकलेली दिसत होती तशी प्रत्यक्षात एकतर्फी झाली नाही. अनेक राज्यांमधील मताधिक्य खूपच कमी आहे.

जागतिक महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन विजयाच्या समीप असले तरी अंतिमत: जगाचे बिग बाॅस म्हणून कोण बाजी मारणार, हे स्पष्ट व्हायला आणखी काही दिवस लागतील. शेवटच्या पाच-सहा राज्यांमधील मतमोजणी पूर्ण झाली तरी विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा एकूण पवित्रा पाहता कोर्टकज्जेही होतील. त्या त्यांच्या भूमिकेमुळे आताच काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत, तर मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करीत ट्रम्पसमर्थकही आक्रमक झाले आहेत. हे गुऱ्हाळ आणखी काही दिवस सुरूच राहील. 

आधीच्या कलचाचण्यांमध्ये ही निवडणूक जितकी बायडेन यांच्या बाजूने झुकलेली दिसत होती तशी प्रत्यक्षात एकतर्फी झाली नाही. अनेक राज्यांमधील मताधिक्य खूपच कमी आहे. सन १९०० नंतरचे, १२० वर्षांमधील सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले आणि इतिहासातील सर्वाधिक सात कोटींहून अधिक मते बायडेन यांना मिळाली. पण, अमेरिकेत केवळ एकूण मतांवर अध्यक्ष निवडला जात नाही. गेल्यावेळी हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा ट्रम्प यांना तीस लाख मते कमी मिळाली होती. वरवर थेट निवडणूक भासत असली तरी इलेक्ट्रोरल काॅलेजेसची पद्धत असून, राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात इलेक्ट्रोरल मते निश्चित आहेत. तरीही, हा काैल डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देणारा आहे. अमेरिकेत एका व्यक्तीला दोन वेळाच अध्यक्ष बनता येते आणि १९९२ पासूनचे दुसरी टर्म न मिळालेले ट्रम्प हे पहिले नेते बनतील, अशी शक्यता आहे. असे का घडले हा जगाच्या कुतूहलाचा, चिंतेचा व चिंतनाचाही विषय आहे.  

अधिकृतपणे विजयी होण्यापूर्वीच ज्यो बायडेन यांनी व्हाइट हाउसमधील पहिल्या दिवशी तापमान वाढीविषयक पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा निर्णय बदलला जाईल, असे सांगितले. हा करार किंवा विदेशी नागरिकांना प्रवेशाविषयीचे व्हिसा धोरण, अमेरिकेच्या सीमा अन्य देशांसाठी बंद करण्याचा व सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय, कोविड-१९ विषाणू संसर्गावेळीच जागतिक आरोग्य संघटनेच्या अडवणुकीचे पाऊल, अशा ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांचा फेरविचार होऊ शकतो. त्याचे कारण, ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेची मुक्त समाजाची, उदारमतवादी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची प्रतिमा काळवंडली. ट्रम्प यांचे एकूण वागणे लिंगभेदी मानसिकतेचे होते. त्यामुळे रिपब्लिकनांना मिळणारे महिलांचे मतदान आणखी कमी झाले. अमेरिकेचा अध्यक्ष हा जगाचा अनभिषिक्त नेता असतो. बाजूने असो की विरोधात, अन्य सगळ्या आर्थिक, सामरिक महासत्तांचा कारभार अमेरिकेच्या धोरणांवर ठरतो.

शीतयुद्धाचा शेवट व रशियाच्या विघटनांनतर तर ही बाब अधिक ठळक बनली. या पृष्ठभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूणच कारभारात गांभीर्याचा अभाव राहिला. त्यांच्या निर्णयांवर लहरीपणा, एककल्लीपणा, किंबहुना विक्षिप्तपणाची टीका झाली. कोरोना संसर्गाचा सामना करताना त्यांनी दाखविलेल्या बेफिकिरीमुळे अमेरिका इतकी प्रगत असूनही जगात सर्वाधिक रुग्ण तिथे आढळले. विषाणू टोचून घेण्याच्या त्यांच्या वक्तव्याचे तर जगभर हसे झाले. मुळात अमेरिका ही नुसती अमेरिका नाहीच मुळी. अगदीच अपवाद वगळता जगातल्या बहुतेक सगळ्या देशांमधील मुले अमेरिकेत जाण्याची स्वप्ने मुठीत घेऊनच जन्माला येतात, आयुष्यभर त्या स्वप्नांचा पाठलाग करीत राहतात. अमेरिकेची बलाढ्य अर्थव्यवस्था अशा स्वप्नाळू लोकांच्या परिश्रमांवरच उभी आहे.

अशावेळी अमेरिका फर्स्टसारख्या संकुचित घोषणा ट्रम्प यांच्या अंगलट आल्या नसत्या तरच नवल. ते केवळ बाहेरच्या माणसांबद्दलच आकसाने वागले असे नाही. वर्णद्वेषाचा दीर्घकालीन व रक्तरंजित इतिहास असलेल्या कृष्णवर्णीयांबद्दलही ते असेच वागल्याचा, त्यांच्या कार्यकाळात वर्णवादी मानसिकतेला खतपाणी मिळाल्याचा आरोप झाला. एक्झिट पोलचे विश्लेषण सांगते, की सर्वाधिक ३५ टक्के मतदारांनी अर्थव्यवस्थेच्या, त्या खालोखाल २० टक्क्यांनी वंशभेदाच्या, १७ टक्क्यांनी कोरोना विषाणू महामारीचा सामना करताना ट्रम्प यांनी दाखविलेल्या बेफिकिरीच्या मुद्द्यावर मतदान केले. थोडक्यात ट्रम्प यांच्या चार वर्षांतल्या चुका सुजाण अमेरिकन मतदारांनी सुधारल्या आहेत. बायडेन असो की ट्रम्प, सद‌्भाव, साैहार्द्र व धार्मिक सहजीवनाला काैल देणाऱ्या या जनभावनेची व्हाइट हाउसला नक्कीच दखल घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन