शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:35 IST

मुंबईच्या ऐतिहासिक गवालीया टँक म्हणजे आजच्या आॅगस्ट क्रांती मैदानात ९ आॅगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव, छोडो भारत’ ठराव झाला.

- उल्हास पवारमुंबईच्या ऐतिहासिक गवालीया टँक म्हणजे आजच्या आॅगस्ट क्रांती मैदानात ९ आॅगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव, छोडो भारत’ ठराव झाला आणि संपूर्ण भारत देश इंग्रजी सत्तेविरुद्ध पेटून उठला. या घटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली. एक सामान्य अशक्त प्रकृतीचा, परंतु सशक्त मनाचे महात्मा गांधी ‘करो या मरो’चा नारा देतात आणि लक्षावधी लोक कशाची तमा न बाळगता, सत्याग्रहात सक्रिय सामील होतात, ही जगातील अभूतपूर्व घटना.या आंदोलनात ४0 लाखांपेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली. शेवटी जागा पुरल्या नाहीत, म्हणून अटक करणे ब्रिटिशांनी थांबविले. ती त्यांची अवस्था झाली. इंग्रज हादरून गेले आणि स्वराज्याची पहाट जवळ आली. इतिहासाची ही पाने चाळताना मन आणि ऊरही भरून येतो. अक्षरश: हजारो माणसांचे बलिदान झाले. असंख्य लोक भूमिगत झाले. गावागावांत क्रांतीची मशाल फिरू लागली. इन्कलाब जिंदाबाद, आझाद हिंद जिंदाबाद, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, भारत माता की जय या घोषणांनी भारत दुमदुमून गेला. हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, दलित आदी सर्व जातींचे धर्माचे आपली सर्व मतभेद विसरून, एका तिरंगा झेंडा खाली एका दिलाने उभे राहिले आणि सत्याग्रहाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने कुठलीही हिंसक घटना न होता झालेले जगातील एकमेव आंदोलन केले गेले.अर्थात, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली १८८५ पासून देशातील अभूतपूर्व ऐक्याचे दर्शन अनेक घटनांमधून भारताने पाहिले आहे. विशेषत: लोकमान्य टिळक, डॉ. गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, फिरोजशा मेहता, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि १९१५ला राष्ट्रपिता महात्मा गांधी आफ्रिकेतून आले आणि स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ अधिक प्रभावी होत गेली. पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. त्या संघर्षातील टप्पा म्हणजे ९ आॅगस्ट १९४२ अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात झालेला ‘चले जाव’ प्रस्ताव. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता, अधिवेशनाच्या पूर्व तयारीला सेवाग्राम वर्धा या ठिकाणी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत या ठरावाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी म. गांधींनी मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद या तिघांवर जबाबदारी सोपविली. तिघांनाही आपापल्या परीने प्रस्ताव तयार केले. वर्किंग कमिटीत सादर केले. विशेष म्हणजे, या तिघांनी आपल्यापेक्षा दुसºयाने प्रस्ताव किती चांगला आहे ते सांगितले आणि तिघांच्याही प्रस्तावातून मुद्दे एकत्र करून, ८ आॅगस्ट १९४२ गवाली टँकवर मध्यरात्री १२ वाजल्यानंतर हा प्रस्ताव प्रचंड जयघोषामध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. रात्री १२ नंतर बराच वेळ चर्चा झाली. त्यामुळे ९ आॅगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.लोकशाही, अहिंसा आणि सत्याग्रह या तीन शब्दांचा क्रियाशील अर्थ सर्व दुनियेने पाहिला. त्यागाची परिसीमा म्हणजे काय, याचे दर्शन जगाला झाले. त्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करीत असताना, त्या क्रांती मैदानाच्या भूमीला वंदन करीत असताना, आज आम्ही कुठे आहोत? लोकशाही, समता, बंधू भाव, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, ऐक्य, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व या शब्दांचे अर्थ, आशय याची बूज राखली जाते का? कायदा व सुव्यवस्था आबाधित आहे काय? या शंका मनाला वेदना देतात. या हुतात्म्यांना वंदन करताना आमची मान लाजेने झुकावी, अशा अनेक दुर्दैवी घटना देशात घडत आहेत. आपण शपथ घेतली पाहिजे की, ज्या स्वातंत्र्यासाठी, ज्या स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी आपण त्याग केला, त्या मूल्यांसाठी आम्ही कटिबद्ध राहू. देशातील असे एकही गाव शिल्लक नव्हते, जिथे हे आंदोलन पोहोचले नाही. असा हा ऐतिहासिक क्रांती दिन. (लेखक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.)