शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सार्वत्रिक निषेध हवा

By admin | Updated: October 28, 2014 00:59 IST

नथुराम गोडशाने म. गांधींचा खून करण्याऐवजी पं. नेहरूंचा खून केला असता, तर अधिक बरे झाले असते’ हे वाक्य रा.स्व. संघाच्या केरळ शाखेच्या मुखपत्रत ज्या कोणी लिहिले,

नथुराम गोडशाने म. गांधींचा खून करण्याऐवजी पं. नेहरूंचा खून केला असता, तर अधिक बरे झाले असते’ हे वाक्य रा.स्व. संघाच्या केरळ शाखेच्या मुखपत्रत ज्या कोणी लिहिले, तो इसम परंपरागत खुनी मानसिकतेत वाढलेला किंवा सडक्या मेंदूचा असला पाहिजे. ज्या संपादकाने आणि त्याच्या सहकारी चमूने पाहून अथवा न पाहता त्याचे लिखाण आपल्या पत्रत प्रकाशित होऊ दिले त्यांच्या मानसिकतेचा ताबाही अल् कायदा किंवा तालिबान्यांच्या स्वदेशी आवृत्त्यांनी घेतला असला पाहिजे. ही माणसे स्वत:ला संघाची म्हणवीत असतील तर संघानेही त्या मजकुरापासून आम्ही दूर आहोत एवढेच सांगणो पुरेसे नाही. या लिखाणाचा व त्यामागील मानसिकतेचा खणखणीत निषेधच केला पाहिजे. गांधीजींच्या खुनाने जगात, देशात व विशेषत: हिंदू समाजात घडविलेला उत्पात सा:यांच्या परिचयाचा आहे. त्याने संघाचे काम 5क् वर्षानी मागे नेले, हे विधान खुद्द गोळवलकरांनीच उच्चरले आहे. सरदार पटेलांसारख्या देशाच्या उपपंतप्रधानाला त्यासाठी संघावर बंदी घालणो भाग पडले. सा:या महाराष्ट्रात जुनीच असलेली ब्राrाण व ब्राrाणोतरातील तेढ त्यातून तीव्र झाली आणि तिने शेकडो घरांची राखरांगोळी केली. मात्र तेवढय़ावरही ती खुनी मानसिकता संपली वा शमली नाही असेच आता संघाच्या केरळी आवृत्तीने देशाला दाखवून दिले आहे. पं. नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेते होते. त्या लढय़ात आपल्या तारुण्याची 12 वर्षे त्यांनी तुरुंगात घालविली होती. स्वत:च्या संपत्तीचा व पारंपरिक मालमत्तेचा त्याग केला होता. देशातील तरुणाईचे ते सर्वात लाडके नेते होते. स्वातंत्र्यलढय़ाच्या या तरुण सेनापतीकडे पुढे देशाचे पंतप्रधानपद आले तेव्हा त्यांनी त्याच्या औद्योगिक, आर्थिक, कृषीविषयक, संवैधानिक व अणुविज्ञानविषयक संरचनेचा पाया घातला. ज्या देशात सुतळीचा तोडा वा साधी टाचणी होत नव्हती त्यात त्यांच्या काळात रेल्वेची मोठाली इंजिने तयार होताना दिसली. भाक्रा-नांगल व हिराकूडसारखी धरणो उभारली गेलेली पाहता आली. त्यांनी उभ्या केलेल्या भाभा अणुशक्ती केंद्राने आताचा भारताचा अंतराळविजय शक्य केला व देशाला अण्वधारी राष्ट्रांच्या मालिकेत मानाचे स्थान मिळवून दिले. देशातले दुष्काळ संपले आणि त्यात संसदीय लोकशाही रुजविण्याचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत झाले. जगातील सर्वाधिक देशांना आपल्या ‘स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा’ अवलंब करायला लावून नेहरू जगाचे नेते झाले. सगळी अरब व मुस्लिम राष्ट्रे भारताविरुद्ध कधीही एकत्र येणार नाहीत, अशा दूरगामी परराष्ट्रीय धोरणाची आखणीही त्यांनीच केली. भारताच्या या भाग्यविधात्याचा खून व्हायला हवा होता, असे जो कोणी म्हणत असेल त्याला नेहरू समजले नाहीत, इतिहास कळत नाही आणि हा देशही समजायचा राहिला आहे असेच म्हटले पाहिजे. अशी माणसे ज्या संघटना आपल्या पदरी बाळगतात आणि त्यांच्या विषारी फुत्कारांना व्यासपीठे मिळवून देतात त्यांची संभावना कशी करायची असते? सा:या जगातच आता धार्मिक कट्टरपंथीयांचे पीक माजले आहे. ते मध्य आशियात आहे, अरब राष्ट्रांत आहे, कॅनडा आणि स्पेनसारख्या देशांत आहे आणि भारतातही ते उभे झाले आहे. धर्माधता हा विकार माणसाला सा:या सत्य घटनांचा विसर पाडायला लावणारा किंवा त्यांच्या विकृत प्रतिमा दाखवणारा आहे. केरळातील संघाची संघटना अशा विकाराच्या आहारी गेली असल्यानेच तिने अशा विखारी वृत्तीला वाचा दिली असणार. याच काळात श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकाने ‘हिंदू व्हॉईस’ या अंकाला दिलेल्या मुलाखतीत ‘नथुरामसोबत मी असतो तर गांधींसारखेच मी नेहरूंनाही संपविले असते’ असे म्हटले आहे. या हिंदू व्हॉईसलाही संघाचा आशीर्वाद आहे हे येथे नोंदविले पाहिजे. गांधीजींच्या खुनानंतर 8 फेब्रुवारी 1948 या दिवशी श्यामाप्रसाद मुखज्रीना लिहिलेल्या पत्रत सरदार पटेलांनी ‘तुमच्या संघटनेतील महंत दिग्विजयनाथ व देशपांडे हे दोघे नेहरूंना फासावर चढवा असे सांगत हिंडतात,’ असे परखड शब्दांत बजावले आहे, हे येथे उल्लेखनीय ठरावे. (या दिग्विजयनाथानेच गोडसेला पिस्तूल पुरविले होते हे वाचकांनी आठवावे)  अगदी अलीकडे आता शंभरीत असलेल्या बलराज मधोक या जनसंघाच्या पूर्वाध्यक्षांनी ‘या सगळ्या खुनाची चटक लागलेल्या संघटना आहेत’ असे जे आपल्या पुस्तकात लिहिले तेही याच मनोवृत्तीचा पुरावा ठरावा. त्यामुळे केरळच्या संघाच्या मुखपत्रने जे लिहिले तो साधा विकारी ढेकर नसून ती एक मुरलेली मनोवृत्ती आहे, हे आपल्या लक्षात यावे. अशी वृत्ती मुसलमानांच्या कडव्या संघटनांत दिसली तर तिचा निषेध सहज होतो. केरळातील या नव्या विषवृत्तीचाही निषेध तसाच व सार्वत्रिक स्वरूपात झाला पाहिजे. थुराम गोडशाने म. गांधींचा खून करण्याऐवजी पं. नेहरूंचा खून केला असता, तर अधिक बरे झाले असते’ हे वाक्य रा.स्व. संघाच्या केरळ शाखेच्या मुखपत्रत ज्या कोणी लिहिले, तो इसम परंपरागत खुनी मानसिकतेत वाढलेला किंवा सडक्या मेंदूचा असला पाहिजे. ज्या संपादकाने आणि त्याच्या सहकारी चमूने पाहून अथवा न पाहता त्याचे लिखाण आपल्या पत्रत प्रकाशित होऊ दिले त्यांच्या मानसिकतेचा ताबाही अल् कायदा किंवा तालिबान्यांच्या स्वदेशी आवृत्त्यांनी घेतला असला पाहिजे. ही माणसे स्वत:ला संघाची म्हणवीत असतील तर संघानेही त्या मजकुरापासून आम्ही दूर आहोत एवढेच सांगणो पुरेसे नाही. या लिखाणाचा व त्यामागील मानसिकतेचा खणखणीत निषेधच केला पाहिजे. गांधीजींच्या खुनाने जगात, देशात व विशेषत: हिंदू समाजात घडविलेला उत्पात सा:यांच्या परिचयाचा आहे. त्याने संघाचे काम 5क् वर्षानी मागे नेले, हे विधान खुद्द गोळवलकरांनीच उच्चरले आहे. सरदार पटेलांसारख्या देशाच्या उपपंतप्रधानाला त्यासाठी संघावर बंदी घालणो भाग पडले. सा:या महाराष्ट्रात जुनीच असलेली ब्राrाण व ब्राrाणोतरातील तेढ त्यातून तीव्र झाली आणि तिने शेकडो घरांची राखरांगोळी केली. मात्र तेवढय़ावरही ती खुनी मानसिकता संपली वा शमली नाही असेच आता संघाच्या केरळी आवृत्तीने देशाला दाखवून दिले आहे. पं. नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेते होते. त्या लढय़ात आपल्या तारुण्याची 12 वर्षे त्यांनी तुरुंगात घालविली होती. स्वत:च्या संपत्तीचा व पारंपरिक मालमत्तेचा त्याग केला होता. देशातील तरुणाईचे ते सर्वात लाडके नेते होते. स्वातंत्र्यलढय़ाच्या या तरुण सेनापतीकडे पुढे देशाचे पंतप्रधानपद आले तेव्हा त्यांनी त्याच्या औद्योगिक, आर्थिक, कृषीविषयक, संवैधानिक व अणुविज्ञानविषयक संरचनेचा पाया घातला. ज्या देशात सुतळीचा तोडा वा साधी टाचणी होत नव्हती त्यात त्यांच्या काळात रेल्वेची मोठाली इंजिने तयार होताना दिसली. भाक्रा-नांगल व हिराकूडसारखी धरणो उभारली गेलेली पाहता आली. त्यांनी उभ्या केलेल्या भाभा अणुशक्ती केंद्राने आताचा भारताचा अंतराळविजय शक्य केला व देशाला अण्वधारी राष्ट्रांच्या मालिकेत मानाचे स्थान मिळवून दिले. देशातले दुष्काळ संपले आणि त्यात संसदीय लोकशाही रुजविण्याचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत झाले. जगातील सर्वाधिक देशांना आपल्या ‘स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा’ अवलंब करायला लावून नेहरू जगाचे नेते झाले. सगळी अरब व मुस्लिम राष्ट्रे भारताविरुद्ध कधीही एकत्र येणार नाहीत, अशा दूरगामी परराष्ट्रीय धोरणाची आखणीही त्यांनीच केली. भारताच्या या भाग्यविधात्याचा खून व्हायला हवा होता, असे जो कोणी म्हणत असेल त्याला नेहरू समजले नाहीत, इतिहास कळत नाही आणि हा देशही समजायचा राहिला आहे असेच म्हटले पाहिजे. अशी माणसे ज्या संघटना आपल्या पदरी बाळगतात आणि त्यांच्या विषारी फुत्कारांना व्यासपीठे मिळवून देतात त्यांची संभावना कशी करायची असते? सा:या जगातच आता धार्मिक कट्टरपंथीयांचे पीक माजले आहे. ते मध्य आशियात आहे, अरब राष्ट्रांत आहे, कॅनडा आणि स्पेनसारख्या देशांत आहे आणि भारतातही ते उभे झाले आहे. धर्माधता हा विकार माणसाला सा:या सत्य घटनांचा विसर पाडायला लावणारा किंवा त्यांच्या विकृत प्रतिमा दाखवणारा आहे. केरळातील संघाची संघटना अशा विकाराच्या आहारी गेली असल्यानेच तिने अशा विखारी वृत्तीला वाचा दिली असणार. याच काळात श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकाने ‘हिंदू व्हॉईस’ या अंकाला दिलेल्या मुलाखतीत ‘नथुरामसोबत मी असतो तर गांधींसारखेच मी नेहरूंनाही संपविले असते’ असे म्हटले आहे. या हिंदू व्हॉईसलाही संघाचा आशीर्वाद आहे हे येथे नोंदविले पाहिजे. गांधीजींच्या खुनानंतर 8 फेब्रुवारी 1948 या दिवशी श्यामाप्रसाद मुखज्रीना लिहिलेल्या पत्रत सरदार पटेलांनी ‘तुमच्या संघटनेतील महंत दिग्विजयनाथ व देशपांडे हे दोघे नेहरूंना फासावर चढवा असे सांगत हिंडतात,’ असे परखड शब्दांत बजावले आहे, हे येथे उल्लेखनीय ठरावे. (या दिग्विजयनाथानेच गोडसेला पिस्तूल पुरविले होते हे वाचकांनी आठवावे)  अगदी अलीकडे आता शंभरीत असलेल्या बलराज मधोक या जनसंघाच्या पूर्वाध्यक्षांनी ‘या सगळ्या खुनाची चटक लागलेल्या संघटना आहेत’ असे जे आपल्या पुस्तकात लिहिले तेही याच मनोवृत्तीचा पुरावा ठरावा. त्यामुळे केरळच्या संघाच्या मुखपत्रने जे लिहिले तो साधा विकारी ढेकर नसून ती एक मुरलेली मनोवृत्ती आहे, हे आपल्या लक्षात यावे. अशी वृत्ती मुसलमानांच्या कडव्या संघटनांत दिसली तर तिचा निषेध सहज होतो. केरळातील या नव्या विषवृत्तीचाही निषेध तसाच व सार्वत्रिक स्वरूपात झाला पाहिजे.