शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सेवेचे अद्वितीय माध्यम ‘टाइम बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:17 IST

स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना शाळेच्या जवळच मी एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण क्रिस्टिना ६७ वर्षांची वृद्धा होती, जी एका माध्यमिक शाळेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेली होती.

स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना शाळेच्या जवळच मी एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण क्रिस्टिना ६७ वर्षांची वृद्धा होती, जी एका माध्यमिक शाळेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेली होती. स्वित्झर्लंडमध्ये पेन्शन तशी चांगली मिळते आणि लोकांना आपल्या उर्वरित आयुष्यात खाण्यापिण्याची चिंता करण्याची अजिबात गरज पडत नाही. त्यामुळे तिने एका ८७ वर्षांच्या वृद्धाची देखभाल करण्याचे ‘काम’ आधीच शोधून ठेवणे आश्चर्यचकित करणारे होते. ‘तुम्ही पैशासाठी काम करीत आहात काय,’ असा प्रश्न मी तिला विचारला. तिचे उत्तरही तेवढेच चकित करणारे होते. ‘मी पैशासाठी काम करीत नाही. तर टाइम बँकेत आपला वेळ जमा करीत आहे, जेणेकरून म्हातारपणात चालणे-फिरणे कठीण होईल तेव्हा या वेळेचा मी उपयोग करू शकेल.’मी पहिल्यांदाच ‘टाइम बँक’ ही संकल्पना ऐकली होती, त्यामुळे माझ्या मनात त्याविषयीची जिज्ञासा निर्माण झाली. मी माझ्या घरमालकिणीला त्याविषयी सविस्तर माहिती विचारली. ‘टाइम बँक’ मुख्यत्वे एक वृद्धावस्था पेन्शन कार्यक्रम आहे. सामाजिक सुरक्षेच्या उद्देशाने स्विस संघीय मंत्रालयाने हा कार्यक्रम विकसित केला आहे. लोक आपल्या युवावस्थेतच वयोवृद्धांची सेवा करण्यासाठी आपला वेळ जमा करू शकतात आणि म्हातारपण आल्यावर, आजारी पडल्यावर किंवा देखभाल करण्याची गरज पडल्यावर ही जमा केलेली वेळ काढू शकतात.अर्जदार निरोगी, वाक्पटू आणि करुणावान असायला पाहिजे. दररोज गरजवंतांची सेवा करून त्याला आपला वेळ जमा करता येऊ शकेल. त्याच्या सेवेचे तास सामाजिक सुरक्षा प्रणालीच्या व्यक्तिगत खात्यात जमा केले जातात. क्रिस्टिना आठवड्यातून दोनदा दोन-दोन तासांकरिता काम करायला जात असे आणि वृद्धांना शॉपिंग करणे, खोलीची साफसफाई करणे, सनबाथसाठी त्यांना बाहेर जाण्यास मदत करण्यासोबतच त्यांच्याशी ती गप्पागोष्टीही करीत असे. कराराप्रमाणे त्यांची एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर ‘टाइम बँके’ने त्यांच्या सेवेच्या तासांची मोजणी करून एक ‘टाइम बँक कार्ड’ जारी केले होते. त्यांना जेव्हाकेव्हा आपली देखभाल करण्याची गरज पडली तेव्हा त्या टाइम बँकेमधून आपली वेळ आणि त्यावरील व्याज काढू शकत होत्या. माहितीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर टाइम बँक रुग्णालय अथवा घरी देखभाल करण्यासाठी स्वयंसेवकाला पाठविण्याचे काम करते.एके दिवशी मी शाळेत असताना माझ्या घरमालकिणीचा मला फोन आला. खिडकी स्वच्छ करताना स्टूलवरून पडल्याचे त्यांनी मला सांगितले. मी तात्काळ रजा काढली आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले. घरमालकिणीच्या गुडघ्याला जखम झाली होती आणि त्यांना काही दिवसांसाठी विश्रांतीची गरज होती. त्यांची देखभाल करण्यासाठी मी जेव्हा रजेचा अर्ज लिहायला घेतला तेव्हा घरमालकीण मला म्हणाल्या, ‘माझी काळजी करू नका.’ वस्तुत: त्यांनी टाइम बँकेकडे आधीच विड्रॉल रिक्वेस्ट पाठवून दिलेली होती आणि दोन तासांच्या आत टाइम बँकेने त्यांची देखभाल करण्यासाठी एक पुरुष परिचारक पाठविला होता. हा परिचारक दररोज त्यांची देखभाल करायचा. त्यांच्याशी गप्पागोष्टी करायचा आणि त्यांना रुचकर जेवणही तयार करून द्यायचा.या शुुश्रुषेमुळे घरमालकीण लवकरच बरी झाली आणि ती पुन्हा आपल्या ‘कामा’वर जाऊ लागली. चालताफिरता येते तोपर्यंत आपण टाइम बँकेत आपली वेळ जमा करीत राहणार, जेणेकरून गरज पडल्यावर कुठलीही अडचण येणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते.आज स्वित्झर्लंडमध्ये म्हातारपणाच्या ‘काठी’साठी ‘टाईम बँके’त आपली वेळ जमा करणे एक सर्वसामान्य बाब बनलेली आहे. यामुळे देशाच्या पेन्शन खर्चाचीच बचत होत नाही तर अनेक सामाजिक समस्यांचेही निराकरण होते. अनेक स्विस नागरिक अशाप्रकारे वृद्धावस्था पेन्शनचे समर्थक बनलेले आहेत. निम्म्याहून अधिक युवक अशाप्रकारच्या वृद्धावस्था देखभाल सेवेत आपला सहभाग देण्यास इच्छुक असल्याचे स्विस पेन्शन संघटनेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातू दिसून आले आहे. ‘टाइम बँक’ पेन्शनचे समर्थन करण्यात स्विस सरकारचा हातखंडा आहे.(सोशल मीडियावरून साभार)