शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

अस्वस्थ सरकारी वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:54 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलेल्या टीकेमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलेल्या टीकेमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरली. आजवर ज्यांना आपण ‘आपला मानुस’ समजत होतो; त्यांनीच सरकारची लक्तरं अशी वेशीवर टांगणे रुचत नाही. आम्हाला जर त्यांच्या भाषणाचा मसुदा आगाऊ समजला असता तर, संमेलनाचे अनुदान दुप्पट करून, या आश्वासनावर त्यांच्या भाषणातील ‘आजचे अस्वस्थ वर्तमान’ आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हे मुद्देच वगळून टाकण्यास आम्ही साहित्य महामंडळास भाग पाडले असते. महामंडळाचे अध्यक्ष वैदर्भीय असताना त्यांनीही आम्हांस असे गाफील ठेवावे? यात नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असले पाहिजे. देशमुखांच्या ‘पाणी! पाणी!!’ या कथेवर तात्काळ बंदी आणली पाहिजे. गुजरातच्या भूमीतून आपल्या सरकारवर अशी जाहीरपणे आगडपाखड करणे, हे बापूंना (आसाराम नव्हे!) तरी आवडले असते का? सरकारी पैशाने संमेलनाचा मांडव टाकायचा आणि वरून शासनावरच टीका करायची? छे!छे! हा तर सरळ-सरळ सरकारद्रोहच आहे. त्यामुळे तातडीने हक्कभंग ठराव आणला पाहिजे. त्यासाठी बांधकाम मंत्र्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. कुठल्याही ‘साहित्या’वर डांबर कसे ओतावे, हे त्यांच्याखेरीज इतरांना जमणारे नाही. शिवाय, त्यांना मराठी, हिंदी, गुजराती व कानडीत उत्तम गाता येतं, त्यामुळे एकाअर्थी ते बहुभाषिक साहित्यिकच! त्यामुळे सीएमनी तातडीने सा.बां.मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि एकनाथ खडसे, नारायण राणे या ‘अस्वस्थांचा’ समावेश असलेली एक मसुदा समिती गठित केली. समिती सदस्यांनी रात्र-रात्र जागून हक्कभंग ठरावाचा मसुदा तयार केला. त्यातील काही ‘विनोदी’ भाग वगळून सांस्कृतिकमंत्र्यांनी तो मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे सादर केला..................माननीय अध्यक्ष,(अ.भा.म.सा.सं, बडोदा-गुजरात)आम्ही येथे नम्रपणे नोंदवू इच्छितो की, आपण दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी केलेल्या अध्यक्षीय भाषणाने आजवरच्या रुढी-परंपरेचा संकेतभंग, अतिथींचा मुखभंग, आयोजकांचा मानभंग आणि सरकारचा हक्कभंग झाला आहे! सध्याच्या राजकीय व्यवस्थेमुळे आजचे वर्तमान अस्वस्थ बनले आहे; हा आपला आरोप निखालस खोटा, पूर्णत: निराधार आणि सरकारी पक्षावर अन्याय करणारा आहे. वस्तुत: अस्वस्थ वर्तमानास सरकार नव्हे, तर साहित्यिक, चित्रकार, पत्रकार, कलाकार अशी समस्त मंडळीच जबाबदार आहे. आजवरच्या साहित्यात आम्हा राजकारण्यांना खलनायक ठरवून आमची प्रतिमा मलिन करण्यात आली. कथा, कांदबºया, चित्रपट आणि वृत्तपत्रीय लिखाणात राजकीय मंडळींच्या सद्गुणांची साधी दखलही घेण्यात आली नाही. एकाही चित्रपटात आम्हांस नायक न बनवून आमचे कर्तृत्व दुर्लक्षित ठेवले गेले. सरकारी अनुदान, पुरस्कार घेऊन आमच्याबद्दलच असे अनुदार उद्गार काढणे हा अवमान असून ही सभा आपणांवर हक्कभंग आणत आहे!ता.क.- साहित्य संमेलनाचे अनुदान दुप्पट करण्याची घोषणा मागे घेण्यात येत आहे!!- नंदकिशोर पाटील

(nandu.patil@lokmat.com)  

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन