शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पराधीन आहे जगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 03:18 IST

लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते.

लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे.वडिलांच्या मृत्यूची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद! पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. तुम्हीच परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा.. मला त्यांची संपत्तीही नको...’ या आशयाचा मेल पाठवून अमेरिकेत राहणारा केल्विन जन्मदात्या पित्यालाच नाकारतो तेव्हा रक्ताची नाती घट्ट असल्याची म्हण धादांत खोटी ठरते. परवा मुंबईत फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो या वृद्धाचा एकांतवासात मृत्यू झाला. ज्या मुलाला जन्म दिला, शिकविले, त्याच्यासाठी अनेक रात्र जागून काढल्या त्याच मुलाने आपल्या अंत्यसंस्काराचा विधी एवढ्या निष्ठूरपणे नाकारावा, ही बाब या गंभीर घटनेमुळे सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. विशेषत: माता-पिता आणि मुलांसाठी. मुलाला उच्च शिक्षण दिले. तो परदेशात गेला तेथेच स्थायिक झाला आणि जन्मदाता पित्याला विसरला. आईला मात्र त्याने अमेरिकेत बोलावून घेतले. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून एकांतवासाच्या काळोखात जीवन कंठत असलेल्या फ्रान्सिस यांनी कुटुंबाच्या विरहात जगाचा निरोप घेतला. समाजमन सुन्न करणाºया या घटनेचे विविध पैलू असू शकतात. कुटुंबातील कलह हेदेखील एक कारण असू शकते. परंतु कितीही मतभेद असले तरी कुणी जन्मदात्यांना अडगळीत टाकावे का, हा प्रश्न प्रत्येक मुलाने स्वत:ला विचारायला हवा. पुत्र प्राप्तीसाठी देवाला साकडे घालणारे, तो जन्मताच आनंदोत्सव साजरा करणारे, त्याच्या शिक्षणासाठी धडपड करणारे, प्रसंगी घर गहाण ठेवून त्याला परदेशात पाठविणारे आई-वडील जेव्हा एकांतवास भोगतात तेव्हा आपण केलेला त्याग व्यर्थ गेल्याची भावना त्यांच्या मनात घर करते; पण ते काही बोलत नाही. कुणाकडे तक्रारही करीत नाही. मुलगा, सून कशी आहे, विचारल्यावर त्यांच्याबद्दल चांगलेच सांगणाºया या जन्मदात्यांवर अखेर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते.म्हातारपणात आपला सांभाळ करण्याची अपेक्षा करणाºया अनेकांच्या वाट्याला एकांतवासाचे चटके येतात. बोलता, बोलता एक मित्र म्हणाला, मी पन्नाशी गाठली असली तरी आजही म्हाताºया बापाचा धाक वाटतो. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत होत नाही. अशीही मुलं आहेत समाजात ज्यांना आपल्या जन्मदात्याची कायम आदरयुक्त भीती असते. ती असायला हवी. कारण हीच आदरयुक्त भीती भावी पिढी घडविते. परंतु हल्ली याचे प्रमाण अत्यल्प आहे.लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे. एकंदरीत सर्वांना अस्वस्थ करणारा हा विषय सामाजिक प्रश्नाची व्याप्ती वाढविणारा आहे. शत्रुच्याही अंत्ययात्रेला जाण्याची आपली संस्कृती आहे. मात्र मुंबईतील घटनेने ‘पराधीन आहे जगती...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.