शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

YouTube: यू-ट्यूब बंद करा आणि आता झोपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 05:36 IST

YouTube: लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे यूट्युब बघत असतात. यू-ट्यूबची गंमत अशी आहे की एकदा तुम्ही व्हिडिओज् बघायला सुरुवात केली की ज्या विषयाला धरून तुम्ही व्हिडिओज् बघत असता त्याविषयीचे रेकमेंडेशन्स यू-ट्यूब स्वत:च द्यायला लागतं आणि बघणाऱ्याचा अधिकच वेळ यू-ट्यूबवर जायला लागतो.

- मुक्ता चैतन्य समाज माध्यमाच्या अभ्यासकmuktaachaitanya@gmail.com

लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे यूट्युब बघत असतात. यू-ट्यूबची गंमत अशी आहे की एकदा तुम्ही व्हिडिओज् बघायला सुरुवात केली की ज्या विषयाला धरून तुम्ही व्हिडिओज् बघत असता त्याविषयीचे रेकमेंडेशन्स यू-ट्यूब स्वत:च द्यायला लागतं आणि बघणाऱ्याचा अधिकच वेळ यू-ट्यूबवर जायला लागतो. कितीही वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आले तरीही यूट्युबची जागा सहजासहजी कुणालाही घेता येण्यासारखी नाही. माणसं एकदा यूट्युबवर आली की त्यांचा डिजिटल वेळ आणि स्क्रीन टाइम वाढतो याची यूट्युबलाही कल्पना आहेच. म्हणूनच, त्यांनी काही फीचर्स सेटिंगमध्ये दिलेली आहेत. जी वापरून आपण आपला यूट्युबवरचा डिजिटल टाइम कमी करू शकतो. किंवा किती वेळ यूट्युबसाठी द्यायचा हे ठरवू शकतो. रिमाईंड मी टू टेक अ ब्रेक!यूट्युबच्या तुमच्या प्रोफाईलवर जा. सेटिंगमध्ये ‘रिमाईंड मी टू टेक अ ब्रेक’ असा पर्याय असतो. तो ऑन करायचा. त्यानंतर यूट्युब विचारतं, किती वेळानंतर ब्रेक घ्यायचा रिमाइंडर द्यायचा आहे? आपण आपली वेळ ठरवून तिथे सेट करायची. म्हणजे समजा अर्ध्या तासाने तुम्हाला यूट्युबने रिमाईंडर द्यावा अशी अपेक्षा असेल तर ३० मिनिटे असा कालावधी सेट करायचा. यूट्युब ३० मिनिटांनी तुम्हाला ब्रेक घ्यायची आठवण करून देईल. रिमाईंड मी व्हेन इट्स बेड टाइम! अनेकदा सोशल मीडियावर, यूट्युबवर गेल्यानंतर वेळेचं भान राहत नाही. आपण किती वेळ काय बघतोय, दिवस आहे की रात्र, झोपेची वेळ झाली आहे का याचीही आठवण होत नाही इतके आपण यूट्युबवर रंगून जातो. म्हणूनच यूट्युबच्या सेटिंगमध्ये ‘रिमाईंड मी व्हेन इट्स बेड टाइम’ हे फीचर आहे. हे फीचर ऑन केल्यावर तुम्हाला किती वाजता झोपायची आठवण करून द्यायची आहे ती वेळ तुम्ही सेट करायची. त्या वेळी यूट्युब तुम्हाला सांगतं, ‘इट्स बेड टाइम!’ म्हणजे आता झोपायची वेळ झाली आहे.रिस्ट्रिक्टेड मोड तुमचा फोन मुलांच्याही हातात असेल तर हे फीचर ऑन करा. यूट्युबवरही मोठ्या प्रमाणावर ॲडल्ट कन्टेन्ट असतो. हा मोड ऑन केल्यावर हा कन्टेन्ट तुमच्या फीड्समध्ये येत नाही. मुलांनी सर्च केला तरी दिसत नाही. शिवाय यूट्युबच्या सेटिंगमध्ये पेरेंटल कंट्रोल हा ऑप्शनही आहेच.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञान