शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:25 IST

एवढ्या अत्याचारी घटनांचा रोष केवढा मोठा असेल याची कल्पना कुणालाही करता यावी.

उत्तर प्रदेशातील बदायूं या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या वस्त्रांना भगवा रंग फासण्याचा झालेला प्रयत्न सांकेतिक म्हणूनच पाहिला पाहिजे. भाजप व संघ परिवार यांच्या आगामी वाटचालीची दिशा दर्शविणारे हे चिन्ह आहे. २०१६ या एकाच वर्षात उत्तर प्रदेशात दलितांवरील अत्याचाराच्या १०४२० तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यातील १५८२ आरोपींना शिक्षा झाली. राजस्थानात अशा ६२२९ तक्रारीत ६८० जण पकडले गेले. बिहारात तक्रारी ५७२६ तर आरोपींची नोंद २०९, मध्य प्रदेशात ६७४५ तक्रारी तर नोंदी १५६९, आंध्र प्रदेशात तक्रारी २७४० तर आरोपींची नोंद अवघी ३३, ओरिसात तक्रारी २४७७ तर नोंदी ५२, कर्नाटकात तक्रारी २२३७ व नोंदी २२, महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना २२३७ तर नोंदी १२७. ही आकडेवारी दलित तरुणांचा आताचा संतप्त उद्रेक स्पष्ट करायला पुरेशी आहे. या गुन्ह्यात शिक्षा झालेल्यांची संख्या केवळ ९ टक्के तर मोकळे राहिलेल्यांची संख्या ९१ टक्के आहे. एका रोहित वेमुलाच्या आत्महत्येने देश हादरला हे आठवले की, एवढ्या अत्याचारी घटनांचा रोष केवढा मोठा असेल याची कल्पना कुणालाही करता यावी. यातील काही तक्रारी खोट्या वा सूडभावनेतून नोंदविल्या गेल्या असणे अस्वाभाविक नाही. मात्र अत्याचारांची ही संख्याच त्याच्या देशव्यापी विक्राळ स्वरूपाचे चित्र डोळ्यासमोर उभे करते.त्यातून देशातील दलितांच्या मतांची टक्केवारी मोठी आहे आणि तिचे महत्त्व दलितांच्या नेत्यांना पुरेसे कळले नसले तरी दलितांमधील सुशिक्षित तरुणांना ते चांगले समजले आहे. हिमाचल प्रदेशात दलितांची संख्या २६.२ टक्के, पंजाबात ३१.९ टक्के, हरियाणात २०.२, उत्तराखंडात १८.८, उत्तर प्रदेशात २०.७, राजस्थानात १७.८, दिल्लीत १६.८, बिहारात १५.९, मध्य प्रदेशात १५.६, महाराष्ट्रात ११.८, छत्तीसगडमध्ये १२.८, बंगालात २३.५, त्रिपुरात १७.८, ओरिसात १७.१, कर्नाटकात १७.१ तर तामिळनाडूमध्ये ती २० टक्के असल्याचे २०११ च्या जनगणनेत आढळले आहे. ही संख्या, तिच्यातील तरुणाईचे साक्षरतेचे प्रमाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या साऱ्यांना दिलेली ‘शिका, संघटित व्हा आणि लढा’ ही प्रेरणा या गोष्टींचा विचार जे पुढारी पक्षीय दृष्टिकोनातून करतात त्यांना ही सारी माणसे, त्यांच्या समाजावर एकाच वर्षात झालेले एवढे अत्याचार विसरून आपल्या सोबत येतील असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे किंवा ते त्यांचे मतलबी शहाणपण आहे. हा समाज संतप्त होण्याआधी आपला रोष सुप्तावस्थेत मनात ठेवत होता तोवर त्याच्यावर खडे टाकून त्याच्या जागरणाची परीक्षा पाहणारे महाभाग या तल्लख बुद्धीच्या शहाण्यांमधूनच पुढे आले. मग संघाची माणसे म्हणू लागली, आता जातीय आरक्षण जाऊन ते आर्थिक आधारावर दिले जावे. सरसंघचालक ते विभागप्रमुख आणि प्रांतसंचालक ते प्रवक्ते असे सारेच हे बोलताना दिसले. त्यांचे पाहून इतरांनीही त्या समाजाला तसे डिवचण्याचे प्रयत्न करून पाहिले. त्यात शरद पवारांपासून स्वत:ला बहुजनांचे पुढारी म्हणविणाºया अनेकांचा समावेश होता. रोहितच्या आत्महत्येनंतरही ही चर्चा थांबली नाही. मात्र राजस्थान व गुजरातमध्ये दलित तरुणांना ज्या क्रूरपणे मारहाण केली जाताना देशाने पाहिली त्यावेळी दलितांएवढाच स्वातंत्र्य व समतेच्या बाजूने उभा राहणारा सवर्णांचा वर्गही संतप्त झाला. याच काळात दलितांची व समतेची बाजू घेणाºया विचारवंतांच्या, पत्रकारांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही हत्या होताना दिसल्या. त्यांचे मारेकरी कधी पकडले गेले नाहीत आणि देशातली सत्ताधारी सरकारेही त्याबाबत कधी दु:ख व्यक्त करताना दिसली नाहीत.दलितांना किंवा एखाद्या संतप्त वर्गाला शांत करायचे तर त्याचे पुढारी आपलेसे करणे, त्यांना निवडणुकात तिकिटा देणे, निम्न स्वरूपाची पदे देणे वा मंत्रिमंडळात सामील करणे असे आडाखे राजकारणातले धुरंधर आखत असतात. यातून ज्यांनी खासगी लाभ मिळविले ती माणसेही समाजाला चांगली ठाऊक असतात. राजकारणात सत्तारूढ आणि विरोधक असे दोन गट असतात. विरोधकांना नामोहरम करायला एक तर त्यांचा पराभव करावा लागतो किंवा त्यांची माणसे पळवावी (वा प्रसंगी विकत घ्यावी लागतात) त्याहून मोठा प्रकार त्यांना आदरणीय असणाºया वर्तमानातील व इतिहासातील महापुरुषांना कवटाळण्याचा असतो. आजच्या भगव्या सत्तारूढांनी काँग्रेस पक्षाचे स्वातंत्र्य लढ्यातील किती नेते असे कवेत घेतले याची यादी साºयांना ठाऊक आहे. त्यांनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमध्ये बनवून गुजरातच्या समुद्र किनाºयावर उभा करण्याचा घाट घातला. सुभाषबाबू डाव्या विचारांचे होते तरी त्यांना तो परिवार आपल्यात सामील करू लागला. भगतसिंग तर कम्युनिस्टांमधील क्रोपोटकिन या विचारवंताचे अनुयायी होते. तरीही ते संघाला आपले वाटू लागले. हुतात्मा राजगुरू यालाही त्यांनी आता भगवी वस्त्रे चढविली आहेत. स्वामी विवेकानंद हे विचाराने समाजवादी आणि ब्राह्मणवादावर कायम टीका करणारे. पण ते आता यांचे देव झाले आहेत. गांधी व नेहरू यांना ज्यांच्यामुळे नावे ठेवता येतील ते सारेच आता यांना आपले वाटू लागले आहेत. ही मजल थेट पाकिस्तानातील जीनांच्या मदारीला वंदन करून त्यांना सेक्युलॅरिझमचे सर्टिफिकेट देण्यापर्यंत गेलेली आपण पाहिली. आता त्यांचा डोळा बाबासाहेबांवर आहे. त्यांच्या पुतळ्याचे भगवेकरण करण्याचा त्यांचा प्रयत्नही त्यातला आहे. तो फसला असला तरी पहिला आहे हे महत्त्वाचे.आताचा दलितांचा संताप आजवरच्या या फसवणुकीएवढाच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील महत्त्वाची कलमे गाळण्याच्या निकालावरचा आहे. गुन्ह्यांची संख्या, त्यांची न्यायप्रविष्ट होण्याची आकडेवारी आणि तीत शिक्षा झालेल्यांची नगण्य संख्या या सगळ्या बाबी लक्षात घेणाºयांना या निकालाने दलितांना आज असलेले अपुरे संरक्षणही काढून घेतले जात असल्याचे जाणवले आहे. त्यावरची नाराजी दलित नेत्यांनी, विरोधी पक्षांनी, माध्यमांनी आणि पत्रकारांसह सत्तारूढ पक्षातील दलित खासदारांनीही बोलून दाखविली आहे. हा संतप्त गदारोळ व त्याला दलितांएवढाच जनसामान्यांचा मिळणारा पाठिंबा पाहून सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती आता केली आहे.हा देश अनेक जाती-धर्मांचा, श्रद्धांचा, विचारांचा व रंगांचाही आहे. त्याची शेते हिरवी तर जंगले देखण्या रंगांची आहेत. त्यात फुलणारी फुलेही तरतºहेच्या रंगछटांची व देखण्या आकारांची आहेत. त्याचे आकाश कधी नीळेभोर तर कधी तांबडे लाल होणारे आहे. रात्रीच्या वेळी तर त्यात लक्षावधी ताºयांची लखलखणारी वस्तीच राहायला येणारी आहे. हे सारे मिटवून त्याला एकच एक भगवा रंग फासण्याचा आज होत असलेला प्रयत्न त्यात एकात्मता तर आणणार नाहीच शिवाय त्या रंगाआड तो येथील अन्याय व विषमता दडविण्याचाच प्रयत्न करील. आपले दोष पाहता येणे हाच ते दूर करण्याचा सर्वात मोठा उपाय आहे व तो साºयांनी लक्षात घ्यायचा आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर