शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

‘ट्रम्प’तात्या अन् ‘किम’काका!

By सचिन जवळकोटे | Published: June 14, 2018 12:14 AM

‘ट्रम्पतात्यां’ची अस्सल मराठी गावरान भाषा गल्लीतल्या बंड्याला खूप आवडायची. त्यासाठी तो रोजच ‘यू-ट्यूब’ पालथं घालायचा. आजही घरी टीव्हीसमोर बसला असता त्याला बातम्यांमध्ये ‘ट्रम्पतात्या’ दिसले. त्यांच्यासोबत ‘किमकाका’ही होते. दोघांचं बराचवेळ चाललेलं ‘शेकहँड’ बघून बंड्याचे डोळे शिणले. हळूच मिटू लागले. तरीही कसंबसं तो त्यांचा संवाद ऐकू लागला.

‘ट्रम्पतात्यां’ची अस्सल मराठी गावरान भाषा गल्लीतल्या बंड्याला खूप आवडायची. त्यासाठी तो रोजच ‘यू-ट्यूब’ पालथं घालायचा. आजही घरी टीव्हीसमोर बसला असता त्याला बातम्यांमध्ये ‘ट्रम्पतात्या’ दिसले. त्यांच्यासोबत ‘किमकाका’ही होते. दोघांचं बराचवेळ चाललेलं ‘शेकहँड’ बघून बंड्याचे डोळे शिणले. हळूच मिटू लागले. तरीही कसंबसं तो त्यांचा संवाद ऐकू लागला.ट्रम्पतात्या : किम... काय म्हणतेय तब्येत? वजन-बिजन घटलं की नाही ?किमकाका : घटायला ती काय नरेंद्रभार्इंची लोकप्रियता आहे की काय? पण तुम्ही सिंगापुरात का कडमडलात? तुमच्यामुळं मलाही इथं धडपडत यावं लागलं.ट्रम्पतात्या : (पिवळे धम्मक दात दाखवत) झेड्पी-पंचायत समितीची मेंबर मंडळी खास अभ्यासासाठी इथंच तडमडत असतील तर मग मी काय घोडं मारलंय?किमकाका : (चेहरा वाकडा तिकडा करतं) पण तुम्ही मारामारीची भाषा सोडून द्या रावऽऽ तिकडं इंडियातले विरोधक बघा. साप, विंचू, पाल अन् खेकडेही एकत्र आलेत. नांग्या टाकून शेपटी घोळवत बसलेत.ट्रम्पतात्या : धीस ईज नॉट युवर जॉब काकाऽऽ मराठी माणसं तुम्हाला ‘काका’ म्हणतात, याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत अनाहूत सल्ला देण्याचा मक्ता नाही मिळालेला.किमकाका : (चिंताग्रस्त चेहऱ्यानं) हे लक्षात आलंय म्हणूनच काल बीडमध्ये ‘काळजात धस्स’ झालं ना? आता जगाला फुकटचे सल्ले द्यायचं बंद करून आत्मचिंतन सुरू झालंय बारामतीत.ट्रम्पतात्या : ‘नव्या रक्ताला वाव द्या,’ असा घरगुती सल्ला म्हणूनच काकांनी दिला असावा. आता बारामतीत धाकट्या दादांची पुढची पिढी राजकारणात उतरणार म्हणा की.किमकाका : तिकडं ‘मातोश्री’वरही ‘धाकटे राजे’ कसं अमितभार्इंना लवून नमस्कार करण्याची डिप्लोमॅटीक खेळी करत होते, तसंच ना? मानलं बुवा ‘उद्धों’ना.ट्रम्पतात्या : व्हॉट ईज धीस; आपण इथं खºया खुºया बॉम्बची चर्चा करायला आलोय. फुसक्या नळ्यांची नव्हे..किमकाका : (लगेच विषय बदलत) देवेंद्रपंत फॉरेनला गेल्यापासून चंदुदादांचं ंवजन वाढलंय म्हणे. मात्र, सुभाषबापूंच्या वाड्यावर नुसता धूर सुटलाय. ‘नागपूरचा वारसदार कोल्हापूर.. मग काय करेल रे सोलापूर?’ असा मॅसेजही तिकडं फिरतोय.ट्रम्पतात्या : आॅँ? सांगलीतल्या मॅटर्निटी आंब्यापेक्षाही जास्त व्हायरल झालाय की काय? मराठी मुलखात असूनही राहुलबाबा काहीच बोलले नाहीत की या विषयावर.किमकाका : आता नवीन खटल्यात पुन्हा हेलपाटे मारायला नको, असा सल्ला दिला असावा अशोकराव नांदेडकरांनी...ट्रम्पतात्या : आपण मुद्यावर येऊ. यापुढं तुम्ही रॉकेट सोडायची भाषा करायची नाही अन् मीही बॉम्ब टाकण्याची करणार नाही.किमकाका : (काळजीनं) मग दिवसभर आपण दोघांनी करायचं तरी काय?ट्रम्पतात्या : (खोचकपणे) मॉलचा मेसेज फॉरवर्ड करत बसायचा. दहा मेसेज पाठवा. अठराशे रुपये डिस्काऊंट मिळवा.(एवढ्यात बंड्याला मित्र जागं करतोे.)मित्र : टीव्ही चालू ठेवून डाराडूर झोपतोस काय ? ऊठ. सिंगापूरच्या ट्रीपसाठी माझ्या मॉम-पॉपनं परवानगी दिलीय. तूपण चल.. ट्रीपच्या नावाखाली मस्तपैकी ‘बँकाँक अन् पटाया एन्जॉय’ करून येऊ. 

टॅग्स :Kim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उन