शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

लखलखणाऱ्या काजव्यांनी बहरलेली झाडं आणि उन्मत्त पर्यटक

By अझहर शेख | Updated: June 12, 2024 09:17 IST

Nature: जिवंत चमचमते काजवे मुठीत पकडून बाटलीत भरून घरी आणण्याचा मूर्खपणा करणाऱ्या बेबंद, बेजबाबदार पर्यटकांचे कान कोणी तरी धरलेच पाहिजेत!

- अझहर शेख(वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, नाशिक) 

ग्रीष्म ऋतू संपायला आला की, वरुणराजाच्या जलाभिषेकाची चाहूल पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेला लागण्यास सुरुवात होते. या पर्वतरांगांच्या कुशीत बहरलेल्या देशी प्रजातीच्या झाडांवर कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भंडारदरा वनपरिक्षेत्रात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून काजव्यांचा लयबद्ध लखलखाट सुरू होतो. काजव्यांच्या या अद्‌भुत दुनियेची मोहिनी प्रत्येकाला पडते अन् मग पर्यटकांचे लोंढे वीकेंडला अभयारण्याकडे येऊ लागतात. 

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा वनपरिक्षेत्र  निसर्गाने मुक्तहस्ताने भरभरून दान दिलेला हा भाग पश्चिम घाटात समाविष्ट होतो. या परिसरात दाट वृक्षराजी आजही अस्तित्वात आहे. जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य भंडारदरा व राजूर अशा दोन वनपरिक्षेत्रांत विस्तारलेले आहे. अभयारण्यात वसलेल्या आदिवासी गावातील लोकांचा मुख्य आधार भातशेती. तो फक्त पावसाळ्यातील चार महिन्यांपुरता. एरवी आठ महिने या भागातील लोक पर्यटनावरच उपजीविका करतात. या अभयारण्य क्षेत्रात प्रत्येक गावामध्ये ग्राम  विकास समिती गठित करण्यात आली आहे. उन्हाळ्यात मंदावलेले पर्यटन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा बहरण्यास सुरुवात होते. पहिले निमित्त असते, ते काजवा महोत्सवाचे.

काजवे बघण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक अभयारण्याला भेट देतात. वन्यजीव विभागाकडून  मुतखेल व शेंडी या नाक्यांवर वाहनांची तपासणी होते. अभयारण्यातील सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना देऊन सशुल्क प्रवेश दिला जातो. रात्री साडेनऊ वाजेनंतर पर्यटकांना अभयारण्यामध्ये प्रवेश बंद केला जातो.  वनाधिकारी, कर्मचारी आत गेलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात करतात. अरुंद रस्ता, आजूबाजूला घनदाट वृक्षराजी, रातकिड्यांचा किर्रर्र आवाज अन् दाट अंधार अशा वातावरणात काजव्यांची चमचम आल्हाददायक आणि नेत्रसुखद असते.   

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल झाले अन् पर्यटक मोठ्या संख्येने ‘लॉकडाऊन’चा शीण घालविण्यासाठी घराबाहेर पडू लागले, तेव्हापासून काजवा महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्येसुद्धा दरवर्षी वाढ होत आहे. पर्यटकांमुळे  स्थानिकांच्या पदरात दोन पैसे जरूर पडतात. कॅम्पिंगची सोय, अस्सल घरगुती ग्रामीण चवीचे भोजन,  रानमेवा विक्री अशा अनेक माध्यमांतून अभयारण्यातील गावांमध्ये लोक व्यवसाय करतात. 

वन-वन्यजीव विभागाने मागील तीन वर्षांपासून काजवा महोत्सवाला नियम व निर्बंधांच्या चौकटीत बसविण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, मात्र काही पर्यटक रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत गैरवर्तन करताना नजरेस पडतात. या बेबंद गर्दीमुळे काजव्यांचा विणीचा हंगाम धोक्यात सापडतो की काय, अशी भीती आता जाणकार पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.  वनरक्षक व जागोजागी तैनात असलेल्या वनसेवकांच्या नजरेत धूळफेक करून काही मद्यधुंद पर्यटक शांतपणे काजवे न बघता उन्मादाने वागतात. काही  हौशी पर्यटकांना, तर काजवे चमचमत असतात, त्या झाडांजवळच जायचे असते. जिवंत चमचमते काजवे मुठीत पकडून बाटलीत भरून घरी आणण्याचा मूर्खपणाही करायचा असतो. या उन्मादाच्या भरात खाली जमिनीवर असणारे मादी काजवे पायदळी तुडवले जातात, याचे भान कुणालाच नसते, कारण मादी काजवे चमकत नाहीत. चमकतो तो नर.   पर्यटकांना आवर घालणे मुश्कील होत असल्यामुळे हा काजवा महोत्सव बंद करण्याचा आग्रह पर्यावरणनिसर्ग अभ्यासकांकडून होऊ लागला आहे. त्याबाबत वन्यजीव विभागावर दरवर्षी दबावही असतो. हे आयोजन बंद केले, तर स्थानिकांच्या कमाईच्या संधी हिरावल्या जातात आणि सुरू ठेवले, तर बेजबाबदार पर्यटकांचे कान कोण धरणार हा प्रश्न! स्थानिक गावकऱ्यांच्या साथीने निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न करत असताना, वन्यजीव विभागापुढेही मर्यादा असतात. निसर्गात येताना पर्यटकांनी स्वयंशिस्त लावून बेभान वर्तन टाळले, तरच पुढे जाऊन डोळ्यांपुढे काजवे चमकण्याची वेळ येणार नाही! ज्याच्या चमचमाटासाठी वाट वाकडी करून जंगलात जायचे, तो काजवाच या अभयारण्यातून लुप्त झाला, तर मग काय करणार...?

टॅग्स :Natureनिसर्गenvironmentपर्यावरणtourismपर्यटनNashikनाशिक