शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

लढवय्याची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:09 IST

अप्पर महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या पोलीस दलच नव्हे, तर राज्यातील समस्त जनतेसाठी धक्कादायक व चटका लावणारी बाब ठरली आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट तपास पथकांपैकी एक असलेल्या महाराष्टÑ दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख व अप्पर महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या पोलीस दलच नव्हे, तर राज्यातील समस्त जनतेसाठी धक्कादायक व चटका लावणारी बाब ठरली आहे. कर्तबगार व धडाडीचा आयपीएस अधिकारी असा लौकिक असलेल्या या अधिकाऱ्याच्या तीन दशकांच्या कारकिर्दीचा शेवट अशा दुर्दैवी पद्धतीने व्हावा, ही शोकांतिका म्हणावी लागेल. एखाद्या चित्रपटातील नायक व त्यातील पोलीस अधिकाºयाच्या प्रतिमेला साजेशी भरभक्कम शरीरयष्टी असलेल्या हिमांशू रॉय यांनी महाराष्टÑ पोलीस दलातील विविध जबाबदाºया समर्थपणे सांभाळताना अनेक कठीण व गुंतागुंतीचे गुन्हे, घटनांची यशस्वीपणे उकल केली होती. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून बळावलेल्या हाडाच्या कर्करोगाला वेसण घालणे जमले नाही. खरेतर, जिगरबाज वृत्तीमुळे ते या आजारावरही मात करतील, अशीच पोलीस वर्तूळ व त्यांच्या परिचितांना खात्री होती. मात्र त्यातून निर्माण झालेल्या वैफल्यग्रस्ततेवर मात करण्यात हा झुंजार अधिकारी अपयशी ठरला. १९८८च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असलेल्या हिमांशू रॉय यांनी अनेक ‘हायप्रोफाइल’ गुन्ह्यांची उकल केली. नाशिकमध्ये असताना त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आरोपही झाले. मात्र त्यांनी त्याचा आपल्या कामावर परिणाम होऊ दिला नाही. परिणामी, अनेक महत्त्वपूर्ण पोस्टिंग त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करीत टीकाकारांची तोंडे बंद केली. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना गुन्हेगारी टोळ्यांवर त्यांनी वचक बसविला होता. त्याचबरोबर आयपीएलमधील मॅचफिक्सिंग, पत्रकार जे. डे हत्याकांड प्रकरणाचा तपासही कौशल्याने केला. अनेक प्रकारचा दबाव असतानाही त्यांनी कुशलतेने त्याचा तपास केला. त्यांच्यामुळे सध्या परदेशात फरारी असलेल्या ललित मोदीचे काळे कारनामे चव्हाट्यावर आले. त्याशिवाय २६/११च्या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्या खटल्याच्या सुनावणीवेळी तपास अधिकाºयांना केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले होते. एटीएसचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक अतिरेक्यांना जेरबंद करीत कट उघडकीस आणले होते. खात्यातील सहकाºयांबरोबरच कॉन्स्टेबल वर्ग आणि सामान्य जनतेशी आपुलकीने वागत त्यांच्या तक्रारी, प्रश्न सोडविण्यासाठी ते वरिष्ठ पद बाजूला ठेवून कायम पुढाकार घेत असत. महाराष्टÑ पोलीस दलातील खराखुरा दबंग व जिंदादिल अधिकारी म्हणून हिमांशू रॉय यांचे नाव कायमच घेतले जाईल. त्यांच्या धक्कादायक निधनाने कर्तव्यकठोर आदर्श अधिकाºयाला मुकल्याची जाणीव होत आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले नसते तर त्यांची आणखी तेजस्वी कारकिर्द पाहावयास मिळाली असती अशी आशावादी भावनाही तमाम अधिकाºयांच्या मनाला स्पर्शून गेली हेही तितकेच सत्य आहे.

टॅग्स :Himanshu Royहिमांशू रॉय