शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

कोंडवाडा संपण्याची चिन्हे: काळजी घ्या, बाहेर पडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 21:07 IST

आज आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस. गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे बंद दारांमागे कोंडल्या गेलेल्या व्यवसायाची चाकं पुन्हा सुरू होत असताना जगात काय चित्र आहे?

- वीणा पाटील, व्यवस्थापकीय संचालक, वीणा वर्ल्डविमान कंपन्या, हॉटेल्स आणि पर्यटक हे पर्यटन क्षेत्रातील तीन महत्त्वाचे घटक. या तीन घटकांमुळेच कोरोनापूर्व काळात पर्यटन  ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची इंडस्ट्री होती. कोट्यवधी लोकांचं जगणं या क्षेत्रावर अवलंबून होतं, पण कोरोेनामुळे २०२०मध्ये पर्यटन क्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला आणि सारं काही उलटंपालटं झालं. या क्षेत्राची इतकी दयनीय अवस्था झाली, की ते पु्न्हा उभं राहणार की नाही, अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. या उद्योगाशी जोडलेल्या सगळ्यांची स्थिती अतिशय भयावह झाली.सुरुवातीला पहिले तीन महिने अनेकांना या संकटाची दाहकता कळली नाही. काही दिवसांतच हे सारं काही संपेल, असं समजून हा काळ त्यांनी आनंदात, सुटी समजून काढला, पण  तीव्रता वाढायला लागली तसं गांभीर्य कळायला लागलं. या क्षेत्रातल्या अनेकांनी आपला व्यवसायच बदलला. अर्थार्जनासाठी हातपाय हलवणं भाग होतंही... मला मात्र आशा होती, हा स्थित्यंतराचा काळ आहे! चित्र बदलेल. ज्या वेगानं ही इंडस्ट्री खाली जाते आहे, त्याच्या दुप्पट वेगानं वर येईल आणि आवरणं कठीण होईल, याचा मला भरवसा वाटत होता. सध्या आम्ही तोच अनुभव घेतो आहोत.

गेल्यावर्षी कोरोनाचा पहिला उद्रेक कमी झाल्यानंतर,  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आठ-दहा महिन्यांनी लोक घराबाहेर पडले.  स्वत:च्या वाहनानं किंवा मिळेल ते वाहन घेऊन आवडेल, परवडेल त्याठिकाणी गेले. त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा आशेचा पहिला किरण दिसला. दुसरा आशेचा किरण दिसला तो फेब्रुवारी-मार्चमध्ये. माझ्या ३५ वर्षांच्या कालखंडात जेवढे पर्यटक आम्ही काश्मीर, कुलू-मनाली, केरळला पाठवले नाहीत, तेवढे केवळ या दोन महिन्यांत पाठवले. एखाद्या बंदिगृहातून लोकं झुंडीनं बाहेर यावेत, तसं चित्र दिसत होतं.त्यानंतर पुन्हा  कोरोनाची लाट आली आणि एप्रिल-मे-जूनमध्ये इंडस्ट्री पुन्हा ठप्प झाली. त्यावेळी सगळ्यांनी पुन्हा उमेद सोडली. या लाटा सतत सुरु रहिल्या तर काय, या निराशेनं  ग्रासलं.  आम्ही शांत राहिलो, दुसरा इलाजही नव्हता. नव्या योजना आखायला सुरुवात केली.त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा लोक बाहेर पडले. यावेळी परदेश प्रवास बंदच असल्यानं आम्ही अनेकांना भारतांतर्गत पर्यटनाला पाठवलं. पर्यटकांनी याही काळात ‘न भूतो, न भविष्यती’ अशी गर्दी केली. पर्यटक स्वत:हूनच परस्परांना सांगत राहिले. ‘जा, बाहेर पडा, काही भीती नाही!...’ त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली. या वर्षात दोनदा आम्ही असा अनुभव घेतला. पहिल्यांदा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये.आता जग उघडायला लागलंय. भारतीय पर्यटकांच्या स्वागतासाठी पहिल्यांदा दरवाजे उघडले ते स्वीत्झर्लंडनं!  कोरोनामुळे इतर देश भारतीय पर्यटकांना आपल्या देशात येऊ देण्यास नाखुश असताना स्वीत्झर्लंडनं मात्र भारतीय पर्यटकांचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. त्यानंतर आईसलॅण्ड, रशियासारख्या इतर देशांनीही भारतीयांसाठी दारं उघडली. तिथेही आता नोव्हेंबरमध्ये टूर्स जाताहेत. तिथे ‘नॉर्दर्न लाईट’ म्हणजेच ‘ऑरोरा बोरिएलिस’ हा निसर्गाचा अलौकिक चमत्कार पाहायला मिळतो.पृथ्वीवरचा अवकाशातील सर्वांत मोठा नैसर्गिक लाइट शो, असंही त्याला म्हटलं जातं. उत्तर ध्रुवाच्या अवकाशात या काळात दिसणारे अलौकिक रंग पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. मुख्यत्वे फिनलंड, कॅनडा, अलास्का, ग्रीनलॅण्ड, आईसलॅण्ड किंवा रशिया इथून निसर्गाचं हे मनोहारी दृष्य दिसू शकतं. यंदा आईसलॅण्ड आणि रशिया येथे मोठ्या प्रमाणात  ग्रुप टुर्स चालल्या आहेत. दुबई एक्स्पोसाठीही पर्यटक  उत्सुक आहेत.एक गोष्ट मात्र कटाक्षानं पाळली गेली पाहिजे. सरकारनं पर्यटन खुलं करण्याचे संकेत दिल्यानंतरच प्रवासाचे बेत आखावेत. नियमांचा आदर राखावा. यात पर्यटन कंपन्या आणि पर्यटकांनीही कुचराई करता कामा नये. आम्हीही तेच केलं. यंदा लेह-लडाखलाही खूप पर्यटक आम्ही पाठवले. त्यामुळे विमान कंपन्या तर खूष झाल्याच, पण तिथल्या लोकांचाही ‘सिझन’ चांगला गेला.सुदैवानं अलीकडे चांगल्या बातम्या येताहेत. अनेक देश पर्यटकांचं स्वागत करताहेत. पर्यटन पुन्हा सुरू झालंय. देवस्थानं, शाळा सुरू करण्याचं सरकारनं जाहीर केलंय. कोरोनाची तिसरी लाटही कमी क्षमतेची असेल, असं म्हटलं जातंय. एक पर्यटक किमान आठ हातांना काम देतो, असं म्हटलं जातं. वाहतूक आणि हॉटेलिंग व्यवसायातले लोक सुमारे वर्षभरापासून हातावर हात ठेवून बसून आहेत. ते लवकर मार्गी लागायला हवं. एक गोष्ट मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. पर्यटन क्षेत्र आता थांबणार नाही, ते पुढे पुढेच जात राहील. कारण माणसाची मूळ प्रेरणाच ‘भटक्या’ची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन