शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

आजचा अग्रलेख- ट्रम्प आणखी मोकाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:54 IST

Donald Trump:

हुकूमशहांची भाषा जगभर एकसारखी असते. देशाला पारतंत्र्यात लोटतानाच ते स्वातंत्र्याचे नवनवे उत्सव साजरे करत असतात. लोकांना आर्थिक खाईत ढकलून राष्ट्रवादाची उन्मादी घोषणा करताना दिसतात. असाच ‘मुक्तिदिन’ ट्रम्प यांनी २ एप्रिलला जाहीर करून अवघ्या जगाला ‘एप्रिल फूल’ बनवले होते. टेरिफ अर्थात आयातकराचे प्रस्थापित संकेत त्यांनी झुगारले. त्याचा फायदा अमेरिकेला होणार आहे, असेही त्यांनी आपल्या नागरिकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र त्यामुळे अवघे जग भयंकराच्या दरवाजात  उभे राहिले. तरीही ट्रम्प यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. ज्या जोडीने जगाला अशा गर्तेत ढकलले, ती फुटलेली जोडीही पुन्हा एकत्र आली आहे! डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क कडाकडा भांडले आणि अचानक थंडावले. आपण दोघेही काचेच्या घरात राहतो, हे त्यांना बहुधा कळून चुकले असावे. तसेही ते मित्र झाले, याचे मुख्य कारण दोहोंचे हितसंबंध समान. आपण एकमेकांना पूरक आहोत, हे भान. शिवाय, समान शील व्यसनेषु सख्यम्! त्यामुळे हे मैत्र वाढत गेले.

दोघांची व्यसने जेवढी सारखी, तेवढाच दोघांमधील विखारही सारखा आणि महत्त्वाकांक्षाही उद्दाम. त्यामुळे भांडण झाले खरे, पण हितसंबंधांनी त्यांना पुन्हा जमिनीवर आणले. ट्रम्प यांच्याविषयी आपण जरा जास्तीच बोललो, असा साक्षात्कार झाल्यावर मस्क यांनी आपली विधाने मागे घेतली. तर, ट्रम्पही त्यांना न शोभणाऱ्या समंजसपणे मस्क यांच्याविषयी बोलू लागले. आपल्या दोघांच्या भांडणाने आपण दोघेही संपू आणि त्याचा लाभ भलतेच घेतील, असे तर या दोघांना वाटलेच.  शिवाय, रिपब्लिकन पक्षानेही त्यात उडी घेतली. मस्क पूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाचेही देणगीदार होते. त्यामुळे ते तिकडे गेले अथवा वेगळ्या राजकीय पर्यायाची चाचपणी करू लागले, तर त्यामुळे मोठे नुकसान होईल, हे पक्षाला कळून चुकले. कारणे काहीही असोत, पण अखेर ट्रम्प आणि मस्क यांच्यात सध्यातरी युद्धबंदी झालेली दिसते. अर्थात, त्यांनी एकमेकांच्या विरोधात जी काही गरळ ओकली आहे, ती जग विसरणार नाही. ते दोघेही विसरणार नाहीत. तेवढे ते क्षमाशील वगैरे नाहीत. मात्र, सध्याची वेळ त्यासाठी अनुकूल नाही. अचूक टायमिंगची वाट बघत असणारे हे दोन शक्तिशाली व्यापारी जगाचे नक्की काय करतील, हे येणाऱ्या काळात समजेलच!

मात्र, ट्रम्प सध्या एकूणच खूश आहेत. मस्कना मस्का लावण्यात त्यांना यश आलेय आणि दुसरीकडे न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. ट्रम्प यांच्या वादग्रस्त ‘टेरिफ’ धोरणाला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या ‘ग्लोबल टेरिफ’ धोरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. ट्रम्प त्यामुळे खूश असले तरी जग मात्र मोठ्या संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त होत आहे. ट्रम्प यांना न्यायालयानेही ‘अभय’ दिल्यामुळे ते आता आणखी मोकाट सुटतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी दोन एप्रिल रोजी जगातील अनेक देशांवर टेरिफ लावले होते. या टेरिफला आव्हान देणाऱ्या सात याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होईलच शिवाय, अमेरिकेकडून कमी खरेदी करणाऱ्या देशांना धडा शिकवता येईल, असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र, चीन सोडून त्यांनी अन्य देशांवर ९० दिवसांसाठी टेरिफवर स्थगिती दिली. ट्रम्प यांनी चीनवर १४५ टक्के टेरिफ लावले होते. उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर टेरिफ लावले. नंतर चर्चेअंती दोन्ही देशांनी टेरिफ कमी केले.

ट्रम्प यांच्या टेरिफमुळे जागतिक व्यापारात ८१ टक्के घट होऊ शकते, असे जागतिक व्यापार संघटनेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही ट्रम्प कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आता ट्रम्प यांच्या मनाप्रमाणे घडले असले तरी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप यायचा आहे. जुलै महिन्यात अंतिम सुनावणी आहे. तोवर ट्रम्प यांनी काही मोठा निर्णय घेतला तर काय होणार, असा प्रश्न आहे. तो निकाल विरोधात गेला तरी आम्ही त्याचीही तयारी केली आहे, असे ‘व्हाइट हाऊस’ने आधीच स्पष्ट केले आहे. आपल्याला इतर कोणत्याही देशाची गरज नाही, असा पवित्रा ट्रम्प यांचा आहे. मात्र, ‘We  have shared destiny’ अर्थात आपले प्राक्तन समान आहे, याचा विसर पडला तर जागतिकीकरणाच्या कोलाहलात अनर्थ अटळ आहे!

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका