शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

आजचा अग्रलेख - रक्तरंजित प्रयागराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 10:52 IST

Atiq Ahmad News: बाहुबली कायदा हातात घेणार असतील तर 'मिट्टी में मिला देंगे,' असा दम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आणि उमेश पाल नावाचा वकील व त्याच्या दोन अंगरक्षकांच्या हत्येच्या तपासादरम्यान चौघे जण पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले गेले.

बाहुबली कायदा हातात घेणार असतील तर 'मिट्टी में मिला देंगे,' असा दम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आणि उमेश पाल नावाचा वकील व त्याच्या दोन अंगरक्षकांच्या हत्येच्या तपासादरम्यान चौघे जण पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले गेले. माजी आमदार, खासदार राहिलेला गैंगस्टर अतिक अहमद हा त्यांचा प्रमुख. तोदेखील भाऊ अशरफसह प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री इस्पितळाच्या आवारात पोलिस बंदोबस्तात वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर मारला गेला. आता हे राज्य बुलडोझर संस्कृतीच्याही पुढे गेले, असे म्हणावे लागेल. अर्थात, अतिक अहमद किंवा त्याचा भाऊ, मुलगा यांच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही. तलवारीच्या जिवावर जे राज्य करतात त्यांचा अंत तलवारीनेच होतो' या उक्तीनुसारच हे घडले आहे. पं. जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित, विश्वनाथ प्रताप सिंग अशा दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलेल्या फुलपूरमधून हा गैंगस्टर लोकसभेवर निवडून जाईल, याची त्या थोर मंडळींनी कल्पनाही केली नसेल. परंतु, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाने ते दिवसही दाखवले. शिवाय अतिक पाचवेळा आमदार, भाऊ अशरफ हादेखील एकदा आमदार हे राजकीय वैभव अलौकिक समाजसेवा करून त्यांनी नक्कीच मिळविले नव्हते.

उमर अली, असद, आझम, अबन ही अतिकची पाच मुले, पत्नी शाहिस्ता परवीन, बहीण आयेशा, भाऊ अशरफ या सगळ्यांना दहशतीमधून मिळालेल्या वर्चस्वाची नशा चढली होती.. अवघ्या १९ वर्षाच्या असदला इतका संताप कशाचा तर उमेश पाल हा यः कश्चित वकील आपल्या पित्याच्या साम्राज्याला आव्हान देतो, याचा! बसप आमदार राजू पाल हत्येचा उमेश पाल हा महत्त्वाचा साक्षीदार होता. म्हणून असदने साथीदारांसह भर बाजारात वकिलाची व त्याच्या दोन पोलिस अंगरक्षकांची २४ फेब्रुवारीला पिस्तुलाच्या गोळ्यांनी चाळण केली. त्यानंतर गेल्या ५२ दिवसांत असदसह चौघांचा पोलिसांशी कथित चकमकीत मृत्यू झाला. अतिक व अशरफ हे दोघेही काल मारले गेले. उत्तर प्रदेशात चाललेली ही खुनांची मालिका कधी थांबेल सांगता येत नाही. प्रश्न हा आहे की, शंभरावर गंभीर गुन्हे दाखल असलेला हा राक्षस मोठा कुणी केला? आता उत्तर प्रदेशातील कायदा, सुव्यवस्था कोलमडल्याचा गळा काढणारे, तिथे रामराज्य नव्हे तर जंगलराज आल्याचा आक्रोश करणारे त्यासाठी जबाबदार नाहीत का? मतदारांना भीती दाखवून तो निवडणूक जिंकू शकतो म्हणून उमेदवारी देणारे, त्याच्या पापावर लोकप्रतिनिधित्वाचे पांघरुण घालणारे आता कुठल्या तोंडाने बोलत आहेत? लोकलाजेस्तवच त्यानी अतिकला नंतर दूर केले, मग आता नक्राश्रू कशासाठी?

त्याचप्रमाणे अतिक अहमद साम्राज्य मोडीत निघाल्याने ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत, तेदेखील स्वत:ची फसवणूकच करत आहेत ज्या तीन- किशोरवयीन हल्लेखोरांनी अतिक व अशरफतर बेछूट गोळीबार केला त्यांचा अतिकच्या कार्याशी थेट संबंध होताच असे नाही. गुन्हेगारी जगात नाव होईल एवढा तिने तिघांनी गोळ्या झाडल्याचे पुढे येत आहे. कप्रकारे हा उन्मादातून दिला जाणारा न्याय आहे. त्यावर टाळ्या जविणारेही कमी नसतात. हैदराबादच्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी चकमकीत मारले किंवा भोपाळच्या तुरुंगातून कथितरित्या सुटलेल्या सिमीच्या सदस्यांना कंठस्नान घातले गेले तेव्हा ल-ताशे वाजवत मिठाई वाटणाऱ्या झुंडीला भान नसते की, मुंबईवरील हशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडला गेलेला अतिरेकी अजमल कसाबला न्यायालयात बचावाची पूर्ण संधी देणारा, त्याच्यावरील आरोपांवर सुनावणी घेऊन नंतर शिक्षा करणारा हा देश आहे.

स्पृहतेबद्दल आपल्या न्यायव्यवस्थेचा जगात आगळा लौकिक आहे. तो कक्षात न घेता धर्म व राजकारणासाठी अपराध्यांना मोकळे रान दिले जात असेल तर उद्भवणाऱ्या समस्या गंभीर व किचकट असतात. पोलिस तपास, यायालयात सुनावणी आरोपींना बचावाची संधी व त्यानंतर निकाल त्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्याची संधी अशा एका व्यवस्थेला गुंगारा दिल्याने न्यायव्यवस्थेला गालबोट लागते. अपराध्यांना न्याय ही बाब धार्मिक उन्माद व सुडाच्या राजकारणाचे बाहुले बनले की, मिट्टी में मिला देंगे' ही कर्तव्यकठोर प्रशासकाने कायदा मोडणाऱ्यांना दिलेली तंबी राहत नाही. हत्येच्या बदल्यात हत्या या मालिकेला कधी अंत उरत नाही. न्यायनिवाडा झुंडीच्या हाती गेला की, न्यायव्यवस्थेची मुलतत्त्वेही धुळीस मिळतात.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण