शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

तंबाखूला ‘भयंकर व्यसन’ म्हणा तरी!

By admin | Updated: May 31, 2015 01:41 IST

मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित व्यसने, त्यातील दुष्पपरिणाम यांचा ऊहापोह करणारा हा लेख...

मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित व्यसने, त्यातील दुष्पपरिणाम यांचा ऊहापोह करणारा हा लेख...ज जगात आर्थिक उलाढालींची सर्वांत मोठी तीन क्षेत्रे उदयास आली आहेत. ती म्हणजे अश्लील संकेतस्थळे/ चित्रफिती, नशा आणणाऱ्या पदार्थांचे उत्पादन / विक्री उद्योग आणि स्मार्टफोन. या तिन्ही क्षेत्रांत प्रामुख्याने तरुण वर्ग ग्राहक असल्याने तरुणाईला आकृष्ट करण्यात किंबहुना त्याला वेड लावण्यात या क्षेत्रांनी यश प्राप्त केले आहे. भारत हा तर युवकांचा देश असल्यामुळे या उद्योगांनी इथं चांगलंच बस्तान बसवलं आहे. त्यातल्या त्यात व्यसनाधिनतेने युवा पिढीला अनिर्बंधपणे ग्रासले असल्याचे चित्र दिसत आहे. याची गंभीर दखल घेणे आवश्यक वाटते.अमलीपदार्थ, दारू यांना भयंकर व्यसन म्हणून ज्या गांभीर्याने पाहिले जाते तितके तंबाखूच्या व्यसनाकडे पाहिले जात नाही. किंबहुना भारतातील ग्रामीण, निमशहरी भागात तंबाखूसेवन हे व्यसन गंभीर व्यसन आहे हे त्यांच्या गावीही नसतं. स्थावर मालमत्ता जशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपोआप मिळत असते तसे तंबाखू-मशेरीसुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अलगद, विनासायास मिळत असल्यासारखं पिढ्यान्पिढ्या हे सारं सुखेनैव सुरू आहे.तंबाखूतल्या घातक द्रव्यांची जाणीवजागृती मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. तंबाखूत ४ हजारहून अधिक विषारी रसायने आहेत. त्यातील ४३ रसायने तर अतिशय घातक आहेत. त्यात निकोटीन हे नशा आणणारे घातक रसायन तर आहेच, पण हायड्रोजन सायनाईड, नेफ्थेलीन, अ‍ॅसिटोन, कॅडमियम, अर्सेनिक, कार्बन मोनाक्साईड, बुटेन यांसारखी अतिघातक, विषारी रसायने असल्याने तोंडाचा वा अन्य प्रकारचा कॅन्सर होण्याचा संभव असतो.जगात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा फैलाव झाल्यावर माध्यमे रान उठवितात. शासकीय यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण इथे दरवर्षी १० लाख लोक मृत्युमुखी पडतात याचे शासनाला काही सोयरसुतक नाही.१५ वर्षांवरील २० टक्के महिला तंबाखू किंवा मशेरीचा वापर करतात असे संशोधनाअंती निष्पन्न झाले आहे. मानव विकास दराबाबत भारताचा जगात खूप खालचा म्हणजे १३६वा नंबर असला तरी तोंडाच्या कॅन्सरबाबतीत आता भारताने जगात पहिला नंबर मिळवला आहे याला काय म्हणावे.सिगारेटच्या पाकिटावर, तंबाखूच्या पुडीवर वैधानिक इशारा देणारे चित्र पाकिटाच्या आकाराच्या ८५ टक्के असावे अशी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची, तज्ज्ञांची मागणी आहे. पण ते चित्र ४० टक्केच्या वर काही जात नाही असे दिसते. अर्थात याने फार मोठा फरक पडेल असे नव्हे, पण जे शक्य आहे ते करण्याची सरकारची खुलेपणाने तयारी असायला हवी. मध्यंतरी तर काही विद्यमान खासदारांनी तंबाखूसेवनाचं समर्थन केलं. त्यामुळे कॅन्सर होत नाही असा नवा शोध त्यांनी लावला! असो, त्यांची विडी व सिगारेट उत्पादन यांच्याबद्दल किती ‘आस्था’ आहे हे लक्षात आले. सरकारने एक मात्र केले. ते म्हणजे तंबाखूजन्य वस्तूंवरची करवाढ दरवर्षी भरमसाठ करत नेली, पण इथं सरकारचं उत्पन्न वाढणं हे महत्त्वाचं नसून उत्पादनावर आपण काही नियंत्रण आणू शकतो का हे अधिक महत्त्वाचे आहे.अमेरिका व युरोपीय देशातील शासनानी तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पन्नावर टप्प्याटप्प्यांनी नियंत्रण आणून ते आता काही देशात ५० टक्के तर काही देशात त्यातून अधिक प्रमाणात नियंत्रण आणण्यात यश आले आहे. आपल्या देशातही हे उत्पादन दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करत ५ वर्षांत ५० टक्क्यांपर्यंत कमी करता येईल. पण राजकीय इच्छाशक्ती कोणाकडे आहे?एक गमतीदार किस्सा. नवी मुंबईतील खारघर शहर दारूमुक्त शहर असल्याने रायगड विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक यांनी त्यांचा महसूल घटल्याने वरिष्ठांकडून मेमो दिले आहे. याचे कारण त्या अधीक्षक मॅडम सांगायच्या की, खारघर परिसरातील लोक बेलापूरमध्ये जाऊन दारू पितात व बेलापूरचे उत्पन्न त्यामुळे वाढते. बेलापूर हे ठाणे महसूल विभागात येत असल्याने तिथल्या अधीक्षक मॅडम यांची वरिष्ठांकडून तारीफ व्हायची. सरकारला माणसाच्या जीविताशी देणंघेणं असेल तर ज्यांचा याबाबतीतला महसूल कमी झाला किंवा त्यांनी तो कमी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना प्रशस्तिपत्र दिले पाहिजे.सगळ्या गोळ्या, रोगजंतू, विषाणू या सर्वांपेक्षा धूम्रपान हे अधिक हानिकारक आहे. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण ६८ टक्केनी वाढते. एक विडी किंवा सिगारेट माणसाचं आयुष्य ६ मिनिटांनी कमी करते. धूम्रपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. धूम्रपानामुळे हार्मोन्स निर्मितीला इजा पोहोचत असल्याने गर्भधारण क्षमता क्षीण होते. शिवाय इक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे बीजांड गर्भाशयात प्रविष्ट होण्याऐवजी फॅलोपियन ट्युबमध्येच राहण्याचा धोका संभवतो. त्यामुळे ते मातेच्या किंवा अर्भकाच्या जिवावर बेतू शकते. पुरुषांच्या बाबतीतही लिंगताठरता अभावाचे धूम्रपान हे कारण मानले जाते. धूम्रपान वीर्यातल्या डीएनएला इजा करणारे असल्याने नपुंसकत्व येण्याची शक्यता वाढते.जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त शासनव्यवस्था, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विषयातील तज्ज्ञ आदींनी एकत्रित येऊन काही ठोस व धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा भारत तरुणांचा जरी एकमेव देश असला तरी सुदृढ तरुणांचा देश म्हणता येईल अशी परिस्थिती नाही.शासनाला सोयरसुतक आहे का?जगात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात दरवर्षी यामुळे मरणाऱ्यांची संख्या १० लाखांवर आहे. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा फैलाव झाल्यावर माध्यमे रान उठवितात. शासकीय यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण इथे दरवर्षी १० लाख लोक मृत्युमुखी पडतात याचे शासनाला काही सोयरसुतक आहे की नाही?डॉ. अजित मगदुम