शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

काळ तर मोठा कठीण आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 03:48 IST

शोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.

- रविप्रकाश कुलकर्णीशोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.लोकही पूर्वीच्याच तन्मयतेने ते ऐकतात. त्याचीच थोडी उजळणी करू या -‘शोले’ पूर्वीचा सिनेमा आणि ‘शोले’ नंतरचा सिनेमा असे म्हणण्याइतके परिवर्तन- बदल सिनेमाचा होत गेला. ‘शोले’मुळे खलनायकदेखील नायक झाला. त्याला तेवढे ग्लॅमर आले. परिणामी, बिस्किटासारख्या बाळाच्या जाहिरातीतदेखील ‘गब्बर की असली पसंद’ आले!शोलेचे संवाद इतके लोकप्रिय झाले की, कालपर्यंत असल्या रेकार्ड्स निघत होत्या. तिथे ‘शोले’ या रेकॉर्ड्सवर निघाल्या आणि नाक्यानाक्याच्या सार्वजनिक कार्यक्रमातून त्या वाजविल्या जाऊ लागल्या!पुढच्या चित्रपटात ‘शोले’ च्या कॉप्य दिसायला लागल्याच, पण नाटकातसुद्धा ‘शोले’ची बाधा दिसायला लागली. ‘शोले’चे लेखक सलीम जावेदचे हुजरे तर म्हणायला लागले की, ज्याच्या साम्राज्यावरचा सूर्य-लोकप्रतिनिधीचा सूर्य कधीच मावळणार नाही. आणि ते खरेच माणूस खुद्द सलीम जावेद उद्दामपणे वागू लागले म्हणे.हे असे सगळे वातावरण हे अभूतपूर्व असेच होते. त्यामुळेच अनुपमा चोप्रा यांनी ‘मेकिंग आॅफ शोले’ हे सांगणारे पुस्तक लिहिले. हिंदी सिनेमावरचे हे इंग्रजी पुस्तक, त्याला राष्टÑीय पुरस्कार मिळाला!हे फॅड इतके पसरत गेले की, मग हृषिकेश गुप्तेला हजार वेळा शोले पाहणाºयांची गोष्ट अशी कथा लिहावीशी वाटली.तेव्हा मग वाटले, आता शोले आणि त्यासंबंधात कुणाला काही सांगायचे राहिले असे वाटत नाही. सांगितले गेले, तर जुन्याचीच ती पुनरावृत्तीच असेल, पण नाही तसे नाही, अजूनही ‘शोले’ पिच्छा सोडायला तयार नाही, असे वाटायला लागलेय. बघा-इतना सन्नाटा क्यों है भाईहंगल विचारतोय कधीपासून,गब्बर झाडतोय कधीपासूनप्रार्थनासभेत प्रार्थना करणाºयांवरप्रभातकाळी मार्निंग वॉक करणाºयांवरतुम्ही गप्प आणिम्हातारा हंगल विचारतोयइतना सन्नाटा क्यों है भाईत्याला माहीत आहेसमीर अहमद मरून पडलाय गोळा लागून, पण तुम्ही ते सांगावे ही इच्छा नाही त्याची आणि ‘बोलणं’ हे जीवंतपणाचे लक्षण आहे म्हणून.तो सारखा विचारतोय.इतना सन्नाटा क्यों है भाईहं दिशादिग्दर्शन आहे ‘शोलेच्या कविता’मधून आणि त्याचे कवी आहेत किरण येले.आपले वाङ्मयवृत्त (जुलै २०१७) अंकात किरण येले यांच्या शोलेच्या कविता आलेल्या आहेत.किरण यांनी जणू कॅमेरा लावावा, असे चित्रण केले. सद्यस्थितीत किरणसारख्या कवीची घुसमट किती होत असेल आणि म्हणून त्याला ‘शोले’तदेखील स्वत:चा हुंकार दिसतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.दिवसेंदिवस झुंडशाहीचे प्राबल्य वाढत चालले आहे. आमच्या मनासारखे तुम्ही वागत नाही, बोलत नाही. मग आम्ही तुमचा आवाज घोटणार ही वृत्ती वाढत चालले आहे. सहिष्णुता ही गोष्ट म्हणजे आदर्शवाद आहे. जो गोष्ट कधीच अस्तित्वात नसते, त्याचा काहीच उपयोग नसतो, असे म्हणून गळा घोटण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. मग कधी नाटक बंद पाडण्याचे प्रकार होतात. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आतच अंदाजानेच तो आपल्या विरुद्ध आहे, असे वाटून त्याचे खेळच होऊ नये, याचा प्रयत्न सुरू होतो.ही समांतर स्वयंघोषित सेन्सॉरशिप त्यापुढे एकटा दुकटा हतबल होतोय...म्हणून तर म्हणतोय काळ तर मोठा कठीण आलाय हे खरेय.पण म्हणून भले आपला आवाज क्षीण असला, म्हणून काय झाले आपले मत व्यक्त करायला काय हरकत आहे? शोलेच्या कविता असाच एक उद्गार आहे.म्हणूनच त्याचे स्वागत करायचे.