शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

वाघांचे अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 23:15 IST

हल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात.

- नंदकिशोर पाटीलहल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात. मायानगरी मुंबापुरीत तर त्यांचं येणं-जाणं नित्याचंच झालं आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीपासून बालघाटाच्या डोंगरदऱ्यांपर्यंत कधीकाळी वाघांचा खूप दरारा होता. पण हल्ली जंगलात त्यांचं मन रमत नाही. शहरांतील ‘हायफाय’ जीवनशैलीची त्यांना भुरळ पडली असावी. शहरांतली माणसं जसं ‘वीकएन्ड’ला जंगलाकडे धाव घेतात, तसं आपणही शहरांत येऊन वीकएन्ड साजरा करावा असंही कदाचित त्यांना वाटत असावं. परवा मालाडच्या एका मल्टीप्लेक्समध्ये बिबट्या आढळला म्हणे. शहरी माणसांना बिबट्या आणि वाघातला फरकही धड कळत नाही. तो बिबट्या नव्हे, तर बिबट्याचा वेष धारण केलेला वाघ असण्याची शक्यता अधिक. सध्या वांद्रेतील सेनेतही बिबट्याची चलती असल्यामुळे आला असेल बिचारा वेषांतर करून! वाघांना शहराचं आकर्षण असण्यामागे तशी अनेक कारणं आहेत. शहरांत रस्तोरस्ती लागलेल्या होर्डिंग्ज्वरील ‘वाघां’ची चित्रे बघून खरेखुरे वाघही मनोमन सुखावत असतील. शहरात तसेही पोट भरण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. जर तुम्ही वाघकुळातील असाल, तर बसल्याजागी काम फत्ते होऊन जाते. फक्त गुरगुरता आलं पाहिजे! मागच्या आठवड्यात एक वाघोबा पाय मोकळे करायला म्हणून गिरगावात आलेले. समोरच्या गल्लीत शर्टावर ‘वाघसेने’चा बिल्ला लावलेला एक गल्लीदादा तिथल्या व्यापाºयांना जाम घाम फोडत होता. ते दृश्य बघून खºयाखुºया वाघाला हसू आवरेना. पण हसरा वाघ म्हणून लहान मुलांनी आपणास गुदगुल्या करायला नकोत, म्हणून त्यानं हसू आवरतं घेतलं. शहरातली पॉश रेस्टॉरंट्स, बार, पब्स बघून वाघांनाही ‘बसण्याचा’ मूड होत असेल का, ही शंका मनात यायला उशीर की, पिझ्झा, बर्गरवर ताव मारणारी माणसं बघून वाघांच्या तोंडाला पाणी सुटल्याचं मी पाहिलं आहे. उद्या कदाचित ‘मॅक्डोनॉल्ड’ किंवा ‘केएफसी’च्या काऊंटरवर केंटुकी चिकनची आॅर्डर देणारा एखादा वाघ दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, हल्ली जंगलातील शिकारीला वाघ मंडळी जाम वैतागली आहे. दिवसरात्र धावपळ केल्यानंतर कुठे एखादी शिकार हाती लागते. त्यातही वाटेकरी अधिक. त्यापेक्षा शहरातली खंडणी परवडली. नुसतं धमकावलं, तरी बिल्डर मंडळी खोकीभर ‘माल’ पाठवतात! फेरीवाल्यांकडून मिळणाºया चिरीमिरीवर पॉकेटमनी सहज निघून जातो. वाघ म्हटलं की, सहसा कुणी रिकाम्या हातांनी परत पाठवणार नाही. सत्ताधाºयांनाही व्याघ्रकोप परवडणारा नसतो. नाणारच्या नावानं नुस्ती डरकाळी फोडली तरी ‘लादणार नाही’ असा खुलासा मुख्यमंत्र्यांना करावा लागतो आणि ‘बाहेर पडणार’ अशी नुसती धमकी दिली तर शहेन‘शाहां’ना वांद्रेत येऊन पायधूळ झाडून जावी लागते. आपले वनमंत्री तर सतत कागदीवाघ नाचवित असतात.गतवर्षी तर त्यांनी चक्क भुसा भरलेला एक वाघ ‘मातोश्री’वर पाठवला होता. त्यातून त्यांना नेमकं काय सूचित करायचं होतं, याचा खुलासा अद्याप केलेला नाही. वनमंत्र्यांवर आता सेनेचे वाघ सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. शहरी वाघांचे चाललेले हे लांगुलचालन बघून जंगली वाघांची पावलं शहरांकडे पडली नाहीत तरच नवल!

टॅग्स :Tigerवाघ