शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

शांत, संयमी अमिताभ बच्चन यांच्यातला 'टायगर' जागा होतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 05:53 IST

सध्या बॉलिवूडमध्ये ‘घराणेशाही विरुद्ध स्ट्रगलर्स’ यांच्यात सोशल मीडियावर वाक्युद्ध सुरू आहे. कंगना राणावतपासून शेखर कपूरपर्यंत अनेकजण यामध्ये सहभागी झाले आहेत. कारण त्यांच्याही हाताला काम नाही. यानिमित्ताने स्टार्स भूमिका घेत आहेत, हीच त्यामधील जमेची बाजू आहे.

'हम' चित्रपटात एक दृश्य आहे. ‘टायगर’च्या गुंडागर्दीच्या पूर्वायुष्याला पाठी टाकून ‘शेखर’ या नावाने जीवन जगणारा अमिताभ आपल्या भावाच्या हरवलेल्या पत्नीला शोधत असताना एक बसचालक शेलकी प्रतिक्रिया देताच खवळून उठतो आणि पुन्हा ‘टायगर’च्या देमार अवताराकडे वळतो. ही आठवण होण्याचे निमित्त ठरले ते बच्चन यांनी आपल्या ट्रोलरची अक्षरश: धुलाई करणारा ब्लॉग लिहिल्याचे.

बच्चन हे गेली १८ दिवस कोरोनावरील उपचाराकरिता एका खासगी इस्पितळात दाखल आहेत. त्याचवेळी त्यांचे पुत्र अभिषेक, स्नुषा ऐश्वर्या व नात आराध्या हेही कोरोनावरील उपचाराकरिता मागे-पुढे त्याच इस्पितळात दाखल झाले. घरातील एका व्यक्तीला कोरोना झाला तर संपूर्ण घर अस्वस्थ होते. येथे तर घरातील चौघेजण उपचार घेत असल्याने बच्चन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. त्यातच बच्चन ज्या इस्पितळात दाखल झाले त्या इस्पितळावर रुग्णांकडून महागडी बिले वसूल केल्याबद्दल बडगा उगारला गेला असल्याने आपली गेलेली पत सावरण्याकरिता बच्चन यांच्या प्रतिमेचा हे इस्पितळ वापर करत असल्याची टीका सोशल मीडियावर केली गेली. बच्चन इस्पितळात दाखल होण्याच्या वेळीच अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना झाल्याने बंगला सील केला गेला. त्यावरुन सोशल मीडियावर बरीच राळ उठली. ऐश्वर्या यांना कोरोना झाल्यावर त्यांनाही हिणकस विनोदांनी लक्ष्य केले गेले. तात्पर्य हेच की, बच्चन कुटुंब कोरोनाशी लढत असताना लॉकडाऊनमुळे सध्या रिकामटेकड्या असलेल्या लक्षावधी लोकांनी सोशल मीडियावर बरीच हेटाळणी सुरू ठेवली.

बच्चन असो किंवा अन्य कुणीही सेलिब्रिटी त्यांच्यावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक असतात. ते त्यांना प्रेम संदेश, शुभेच्छा संदेश देत असतात. पण हे संदेश त्यांच्या खिजगणतीत नसतात. सेलिब्रिटींना फॉलो करणाऱ्यांनाही त्याची माहिती झाली आहे. त्यामुळे एका फॉलोअरने कोट्यवधींच्या गर्दीत बच्चन यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याकरिता ‘बच्चन यांचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा’, अशी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली. पोस्ट करणाऱ्याचा हेतू जरी यशस्वी झाला असला तरी त्यामुळे शांत, संयमी, धीरगंभीर स्वरात जगाला पोलिओ डोस देण्यापासून ‘स्वच्छ भारत मिशन’पर्यंत अनेक सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या अमिताभ यांच्यातील ‘टायगर’ चवताळून उठला. या ‘मिस्टर अज्ञात’ याला उद्देशून लिहिताना बच्चन यांनी ‘कदाचित तुला तुझे वडील कोण हे ठाऊक नसावे.’ ‘माझे नऊ कोटी फॉलोअर्स तुझ्यावर तुटून पडतील. समजा मी जर त्यांना सांगितले, ठोक दो साले को, तर तुझी काय गत होईल, याची कल्पना कर’ वगैरे बरेच काही सुनावले. त्याची संभावना मारीच, अहिरावण, महिषासुर वगैरे राक्षसांसोबत केली. बच्चन यांनी पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ रंगवून सत्तर, ऐंशीच्या दशकात बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुंडगिरी या विरोधात लढणारा हिरो साकार करून प्रेक्षकांची मने आपल्या ‘जंजिर’मध्ये घट्ट जखडून ठेवली. ‘अमिताभ’ या नावाचे गारूड आजही लोकांवर कायम आहे. खासगी आयुष्यात बच्चन हे अत्यंत सालस व सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यामुळे बच्चन यांनी त्या अज्ञात ट्रोलरला इतक्या कठोर भाषेत का खडसावले? ही खरोखरंच त्यांची भाषा आहे की, त्यांच्यावतीने ब्लॉग लिहिणाऱ्याने इतके कठोर शब्द वापरले? उद्या कदाचित खुद्द बच्चन यांनाच आपण इतकी कडक भाषा वापरायला नको होती, असे वाटले तर कदाचित तेच आपले ‘शब्द’ मागे घेतील का? अशा अनेक प्रश्नांची मालिका या निमित्ताने बच्चन यांच्या चाहत्यांच्या मनात फेर धरून नाचू लागली आहे.

गेल्या चार महिन्यांत केवळ बच्चन हेच नव्हेतर अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती सर्वसामान्यांच्या ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत. कोरोनामुळे बहुतांश लोक घरी आहेत. काहींच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद पडले आहेत. आर्थिक चणचण आणि पर्यायाने व्यसनाधीनताही वाढली आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमध्ये वादळ उभे केले आहे. अनेक स्टार्स मनोरंजन क्षेत्रातील फोफावलेल्या अपप्रवृत्तींबाबत बोलत आहेत.त्याची झळ बच्चन यांनाही अशाप्रकारे बसलेली असू शकते. हरिवंशराय बच्चन यांची एक काव्यपंक्ती समर्पक आहे. ‘रास्ते का एक काँटा, पाँव का दिल चीर देता, रक्त की दो बूंद गिरती, एक दुनिया डूब जाती, आँख में हो स्वर्ग लेकिन, पाँव पृथ्वी पर टिके हो, कंटकों की इस अनोखी सीख का सम्मान कर ले.’

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनAbhishek Bacchanअभिषेक बच्चन