शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अद्भुत..! न खाता-पिता, न थांबता सहा दिवस सलग ६,१०० किमी उड्डाण, निसर्गाचा असाही एक चमत्कार

By shrimant mane | Updated: November 29, 2025 08:47 IST

अमूर फाल्कन प्रजातीच्या तीन शिकारी पक्ष्यांचा प्रवास नुकताच ट्रॅक करण्यात आला. त्यांनी दिवसाला सरासरी हजार किलोमीटर प्रवास केला!

श्रीमंत मानेसपादक, लोकमत, नागपूर

परवा निसर्गाचा एक चमत्कार नोंदविला गेला. तो घडत आधीपासूनच होता. नोंदविला पहिल्यांदा. अमूर फाल्कन प्रजातीच्या तीन शिकारी पक्ष्यांच्या पाठीवर तीन-चार ग्रॅम वजनाचे चिमुकले ट्रान्समीटर्स बसवून माग काढण्यात आला. मणिपूरमधील नामेंगलोंग येथून ते आकाशात उडाले आणि दररोज साधारणपणे एक हजार किलोमीटर प्रवास करून आफ्रिकेत पोहोचले. कुठेही न थांबता. अविश्रांत. जमिनीवर न उतरता. अपापांग या प्रौढ नराने सहा दिवस आठ तासात ६,१०० किलोमीटर, तर अलंग या तरुण मादीने आणखी सहा तास जास्तीचा वेळ घेत ५,६०० किलोमीटर आणि काहीवेळ बांगलादेशात थांबलेल्या अहू या मादीने पाच दिवस १४ तासात ५,१०० किलोमीटर अंतर पार केले. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांचे सॅटेलाइट ट्रॅकिंग केले. हा प्रवास अन्न-पाण्याशिवाय. असेच स्थलांतर करणारे ड्रॅगनफ्लाय म्हणजे चतूर कीटकांचा थवा वगैरे वाटेत सापडला असेल तर ठीक. पण, खात्री नाही.

आपल्याकडे हिवाळा सुरू झाला आहे. सैबेरिया, मंगोलिया व युरोपमधून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या नयनरम्य दर्शनाचा हा काळ. हिमालयापेक्षाही उंचीवरून उडणारी पाणबदके, समुद्राच्या खाडीत थव्याने विहार करणारे फ्लेमिंगो, टोळधाड रोखणाऱ्या रोझी स्टर्लिंग किंवा गुलाबी मैना, नॉर्दर्न शोव्हलर म्हणजे चोचीची बदके, नामशेष होऊ पाहणारे सैबेरियन क्रौंच, हॅरिअर म्हणजे 'भोवत्या' वगैरे पक्ष्यांच्या दर्शनाचा हा हंगाम. अमूर ससाणा थोडा वेगळा आहे. आपल्याकडील बहिरी ससाणा वेगळा व हा वेगळा. महापुराण हा जैन ग्रंथ, बौद्ध जातक कथा किंवा महाभारतामधील कबुतराचा जीव वाचविण्यासाठी आधी स्वतःचे मांस व शेवटी स्वतःला ससाण्याच्या हवाली करणाऱ्या शिबी राजाची गोष्ट आपल्या मोठ्या ससाण्याची. अमूर ससाणा आकाराने खूप लहान. कबुतरापेक्षाही लहान. सफरचंदाएवढा. त्याचे मूळ आग्नेय रशियातील अमूर नदीखोऱ्यात. दरवर्षी तो २२-२५ हजार किमी प्रवास करतो. दोन खंडांमधील चौदा देश, एक महासागर पार करतो. त्याच्यापेक्षा उंचावरून उडणारा पक्षी म्हणजे बार हेडेड गूज. अंतराच्या बाबतीत आर्क्टिक टर्न त्याच्या पुढे. तो आर्क्टिकपासून अंटार्क्टिकापर्यंत दरवर्षी ७० हजार किमीपेक्षा अधिक अंतर कापतो.

लाखो अमूर फाल्कन पक्ष्यांचे थवे प्रजनन काळ संपल्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत सैबेरिया, रशिया, चीनमधून दक्षिणेकडे निघतात. नागालँडमधील डोयांग हा त्यांचा ३ ते ५ आठवड्यांचा मोठा व महत्त्वाचा थांबा. तिथल्या जलाशयाशेजारी त्यांना कृमी-कीटक, टोळ, पंख फुटलेली वाळवी असे भरपूर खाद्य मिळते. हिंदी महासागर पार करण्यासाठी आवश्यक असलेली चरबी तयार होते. वजन दुपटीने वाढते आणि मग ते नैऋत्येकडे झेप घेतात. आसाम, नागालँड, मणिपूरच्या सीमावर्ती प्रदेशातून पाच-सहा हजार किलोमीटर दूर आफ्रिकेत पोहोचायला त्यांना जेमतेम आठवडा पुरतो. सगळा हिवाळा लाखो अमूर फाल्कन आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत नामिबिया, बोटस्वाना, झिम्बाब्वे, तसेच दक्षिण आफ्रिकेत घालवतात. एप्रिल-मे महिन्यात अरबी समुद्र ओलांडून नागालैंड-आसाममध्ये थोडा वेळ थांबून पुन्हा प्रजननासाठी सैबेरियात पोहोचतात.

राखाडी व काळ्या रंगाची नर-मादी, तपकिरी व लाल मांड्या, डोळ्यांभोवती नारिंगी कडा आणि अत्यंत भेदक नजर असलेला अमूर फाल्कन किंवा ससाणा किंवा बाज पक्षी सैबेरियाच्या लोकसंस्कृतीत वसंत ऋतूचा दूत, मृतात्म्याचा दूत किंवा पूर्वजांचा संदेशवाहक, शिकार व यशाचा शुभशकुन आणि आकाश देवतेचा प्रतिनिधी मानला जातो. फाल्कनचे पंख किंवा प्रतिकृती वापरून आकाशातील देवतेशी संवाद साधला जातो. आजी-आजोबा लहान मुलांना फाल्कनच्या गोष्टी सांगतात. सैबेरियात हिवाळा अतिशय कडक असतो. जगभ्रमण करून फाल्कनचे थवे उन्हाळ्याचा सांगावा घेऊन परत येतात.

मुळात शिकारी पक्षी असल्यामुळे माणसे सोडली तर या अमूर ससाण्याच्या जिवाला इतर धोके नाहीत. सैबेरियातून निघालेले ९० टक्क्यांहून अधिक पक्षी अर्ध्याहून जगाला वळसा घालून पुन्हा त्यांच्या मूळ निवासाला परत येतात. मधल्या काळात किमान ईशान्य भारतात या पक्ष्यांना माणसांकडून मोठा धोका निर्माण झाला होता. डोयांग धरणाच्या परिसरात जिथे हे थवे काही आठवडे विश्रांतीसाठी थांबतात तिथे अमूर फाल्कनची शिकार इतकी वाढली होती की, २०१२ च्या सुमारास सव्वा लाखाच्या आसपास पक्षी एकतर मारले किंवा पकडले जात होते. मांसासाठी त्यांची शिकार आणि धनवंतांच्या दर्शनी भागात पिंजरे सजविण्यासाठी धरपकड असे हे संकट होते. तिथल्या खेड्यांमध्ये मग निसर्गप्रेमींनी जनजागृती घडविली. शिकार थांबली. आकाश देवतेचा प्रतिनिधी पुन्हा दिमाखात विहार करू लागला.shrimant.mane@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Amazing! Amur Falcon flies 6,100 km non-stop for six days.

Web Summary : Amur falcons migrate from Russia to Africa, flying 6,100 km in six days without stopping. These birds face threats in India, but conservation efforts are helping protect them, ensuring their safe return each year.