शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

थोरांचा ‘बालहट्ट’

By admin | Updated: September 30, 2015 22:36 IST

वय अवघे सहा महिने आणि चौदा महिने, पण ही बालके आज सर्वोच्च न्यायालयाच्या दारात न्यायासाठी उभी आहेत (की रांगत आहेत?). सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार अज्ञान बालकेदेखील

वय अवघे सहा महिने आणि चौदा महिने, पण ही बालके आज सर्वोच्च न्यायालयाच्या दारात न्यायासाठी उभी आहेत (की रांगत आहेत?). सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार अज्ञान बालकेदेखील त्यांच्या पालकांच्या मार्फत आपल्यावरील होत असलेल्या वा होऊ घातलेल्या अन्यायाची दाद मागू शकतात. याच नियमाचा आधार घेऊन अर्जुन गोपाळ (वय सहा महिने) आणि अर्णव भंडारी (वय १४ महिने) ही बालके त्यांच्या वकील पित्यांच्या मार्फत एक याचना घेऊन उभे राहिले आहेत. त्यांची याचना काय, तर येत्या दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात फटाके म्हणजे शोभेच्या दारुवर संपूर्ण बंदी लागू केली जावी. त्याचे कारण, या बालकांच्या (म्हणजे त्यांच्या पित्यांच्या) मते, त्यांची फुफ्फुसे अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने फटाक्यांमुळे जे हवा प्रदूषण होते, त्याचा या अविकसित फुफ्फुसांवर अनिष्ट परिणाम घडून येऊ शकतो. मुद्दा तथ्यहीन आहे, असे कोणीच म्हणणार नाही. पण अशी याचिका सादर करण्यामागे संबंधित पालकांचा पब्लिसिटी स्टंट असणार वा आहे, या विधानातील तथ्यही कोणी नाकारु शकणार नाही. मुळात ध्वनी प्रदूषणामुळे आवाजी फटाक्यांवर अगोदरपासून बंदी आहेच. चिनी फटाके धोकादायक असल्याने त्यांच्या तर विक्रीवरही बंदी आहे. या दोन्ही निर्बन्धांचे उघडउघड उल्लंघनदेखील प्रत्यही होतच असते. पण त्याहून महत्वाचा भाग म्हणजे शोभेची दारु आणि फटाके निर्मिती हा एक फार मोठा उद्योग आहे आणि त्यावर काही कोटींची उपजीविका अवलंबून आहे. शिवकाशीसारखे गाव तर केवळ याच उद्योगासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्याच गावात फटाक्यांची वेष्टने तयार करणारा मुद्रण व्यवसायदेखील अनेकांच्या रोजीरोटीचे साधन आहे. स्वाभाविकच उद्या सर्वोच्च न्यायालयाने संबंधित बालकांची याचिका स्वीकारुन सरसगट फटाकेबंदी लागू केली तर जे आज या व्यवसायावर पोट भरतात त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोणाची? दसरा, दिवाळी आणि पाठोपाठ येणारा नाताळ धरुन कमाल दोन-अडीच महिने फटाक्यांचा धुमाकूळ सुरु असतो असे गृहीत धरले आणि त्यापासून निघणाऱ्या धुराने हवा प्रदूषित होते, हे मान्य केले तरी वर्षभरातील उरलेल्या कमाल तीन महिन्यांमधील प्रदूषकांचे काय करायचे? खरे तर आता अशा बंदी मानसिकतेवरच बंदी आणणे गरजेचे ठरु लागले आहे.