शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अमदाबाद गयेच नै.. फिर कलर किसने लगाया?

By सचिन जवळकोटे | Updated: April 1, 2021 04:35 IST

मलिकभाई अन‌् आव्हाडदादा जीव तोडून सांगत होते, ‘बडे साब कभी अमदाबाद गयेच नै!’ पण मग थोरल्या काकांच्या शर्टाला बारीकसा केशरी रंग कसा?

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)इंद्र दरबारात महाराजांनी नारदमुनींना प्रश्न विचारला, ‘बा नारदा.. भूतलावर यंदाची धुळवड कशी झाली’, गालावर उमटू लागलेलं हसू दाबत मुनी उत्तरले, ‘रोजच्यासारखीच.’ महाराज दचकले, ‘तिथं रोजच धुळवड असते की काय’ मुनींनी स्पष्टीकरण दिलं, ‘गेल्या एक वर्षापासून सारंच चक्र बदललंय महाराज. बेफाम मुक्ताफळांची रोजच धुळवड. बेताल आरोपांची रोजच चिखलफेक.’ डोकं खाजवत इंद्रांनी फर्मान सोडलं, ‘असं कसं काय? घडलं.. बघा जरा.  ..वीणा वाजवत नारद भूतलावर पोहोचले. रस्त्यात एक पोलीस स्टेशन लागलं. आपल्या सहकाऱ्यांना ड्यूटी वाटप करण्यात पोलीस अधिकारी मश्गुल होते.. ‘बक्कल नंबर ४२०.. या चौकातला रास्ता रोको कव्हर करा. बक्कल नंबर ३०२.. त्या ऑफिससमोरचं उपोषण बघा. बक्कल नंबर..’ हे सारं ऐकून मुनींना गरगरलं. एकमेकांच्या सरकारविरुद्ध आंदोलन करण्याची स्पर्धा लागलेल्या या नेत्यांना लोकांची कामं करायला वेळ कधी मिळतो, असा प्रश्नही त्यांच्या डोळ्यांसमोर नाचू लागला. फळ्यावरील गुन्ह्यांच्या आकडेवारीचा चार्ट पाहत त्यांनी विचारलं, ‘तुमच्या हद्दीतला क्राइम रेट झिरो कसा काय?’ एका हवालदारानं हळूच कानात सांगितलं, ‘क्राइम घडवून आणणारे आंदोलनात अडकलेत अन् क्राइम शोधून काढणारे आतमध्ये जाऊन बसलेत. त्यामुळेच ठाणे अंमलदारांच्या डायरीत सामसूम आहे ना’ - मुनींनी ‘वाझे’च्या हेडलाइनवर नजर फिरवत तिथून काढता पाय घेतला.  समोरच्या चौकात सार्वजनिक पोलिटिकल रंगपंचमी खेळली जात होती. ‘कृष्णकुंज’वरून भलीमोठी पिचकारी घेऊन आलेले  ‘राज’  गंभीरपणे विचार करत होते,  ‘आता रंग नेमका कुणावर टाकू. कारण, ज्याला म्हणून मी टारगेट करतो, तोच नंतर उलट झळाळून निघतो. आपला रंग वाया जातो. समोरचा मात्र चमकून निघतो. ’ एवढ्यात ढगळं जॅकेट वरखाली करत रौतांचे संजय तिथं पोहोचले,  ‘मी सांगतो तुम्हाला. तुम्ही थोरल्या काकांना रंग पाठवा. ते बरोबर सगळ्यांना लावतील. ’ नेहमीप्रमाणे डावी भुवई वर करत राज उत्तरले, ‘मी काय करावं, हे सांगायचे तुम्हीच बाकी राहिला होतात. तसंच तुमच्याकडून ऐकून घ्यायला मीच उरलो होतो.’ तेव्हा ‘हात’वाले बाळासाहेबही पुढं सरसावत म्हणाले, ‘यांना पक्षाच्या झेंड्यावरचा रंग अन् खिशावरच्या पेनाची शाई या दोन्हींमधला फरकच कळत नसावा. दोन भूमिकांमधला गोंधळ आम्हाला मात्र प्रत्येकवेळी विनाकारण त्रासदायक ठरतो.’  बाजूला मोबाइलवर तावातावात बोलत असलेल्या पटोलेंनी बरोबर ओळखलं की, बाळासाहेब आपल्यासारखी आक्रमक स्टाइल मारण्याच्या बेतात आहेत. तिकडून बोलणाऱ्या कार्यकर्त्याला महिनाभराच्या आंदोलनात टारगेट देऊन नाना आता रंग लावण्यासाठी ‘थोरल्या काकां’ना हुडकू लागले. एवढ्यात उद्धोंना शोधत देवेंद्रपंतही तिथं पोहोचले. ‘सीडीआर’च्या बॉक्समधला छोटासा पेन ड्राइव्ह दाखवत सांगू लागले, ‘यातला काळा रंग आता मी सर्वांना लावणार.’ तेव्हा मोठ्या आवेशात ‘अनिल’भाऊ पुढं सरकले, ‘आजपर्यंत माझ्या कपड्यांना कधीच डाग लागला नाही.’तेवढ्यात त्यांचा बॉडीगार्ड पचकला, ‘साहेब.. तुमचं लक्ष समोरच्या पंतांवर, परंतु मागून तुमचाच ऑफिसर १०० डागांचा रंग लावून गेला की.’ - मग प्रचंड गहजब झाला. ‘१०० आकडा खरा असावा काय?’-  प्रश्नार्थक चेहऱ्यानं जयंतरावांनी विचारलं. कपाळाला आठ्या घालत अजितदादांनी वेगळाच मुद्दा मांडला, ‘पण हा आकडा आपल्याला कसा माहीत नव्हता?’- तेवढ्यात समोरून ‘थोरले काका’ आले. त्यांच्यासोबतचे मलिकभाई अन‌् आव्हाडदादा जीव तोडून प्रत्येकाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, ‘बडे साब कभी अमदाबाद गयेच नै!’.. त्याच वेळी ‘काकां’च्या शर्टाला लागलेला बारीकसा ‘केशरी रंग’ पाहून उद्धोंच्या मनात मात्र उगाच शंकेची पाल चुकचुकली.  नारायण...  नारायण...sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवार