शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

Gujarat Assembly elections: गुजरातमध्ये भाजप नाही, ‘आप’च सत्तेवर येणार! CM पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 09:34 IST

गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निवडणूक रणनीतीविषयी इसुदान गढवी यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचित.

पत्रकारिता सोडून आपण राजकारणात कसे आणि का आलात?मी मुळात शेतकरी कुटुंबातला, देवी मातेला वाटले म्हणून पत्रकार झालो. जे वाईट आहे ते मी लोकांसमोर आणत होतो, पण गरजूंना मदत करू शकत नव्हतो. म्हणून देवी मातेच्या प्रेरणेनेच मी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.आम आदमी पक्षच का? काँग्रेस किंवा भाजप का नाही?या दोन पक्षांमुळेच तर गुजरातची आजची हलाखीची परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनामुळे लोक मरत असताना लक्ष देणारे कोणी नव्हते. संपूर्ण देशात जे गुजरात मॉडेल विकले जात आहे, त्याचे वास्तव गुजराती लोकांना ठाऊक आहे. बेरोजगारी वाढत आहे. काँग्रेसने तर भाजपपुढे गुडघेच टेकले आहेत. हळूहळू आम आदमी पक्षच देशातला मुख्य विरोधी पक्ष होत चालला आहे.

आपल्या पक्षाचे गुजरातमध्ये काय भविष्य दिसते? मागच्या निवडणुकीनंतर भाजप मोठ्या मुश्किलीने सरकार स्थापन करू शकले. काँग्रेसची इच्छा असती तर मागच्या वेळीच सरकार स्थापन झाले असते. पण आता काँग्रेस पक्ष इतका कमजोर झाला आहे की गेल्या वर्षी जिल्हा पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत ३१ पैकी एकही जागा या पक्षाला मिळविता आली नाही. आता हे दोन्ही पक्ष लोकप्रियतेपासून खूप लांब गेले असल्याने लोक आम आदमी पक्षाकडे आशेने पाहत आहेत. 

निवडणूक सर्वेक्षणांचे निकाल तसे सांगत नाहीत..मी स्वतः माध्यमांमध्ये होतो.. सर्वेक्षणे कशी केली जातात हे मला ठाऊक आहे. गुजरातच्या शहरी भागातील ६६ जागांपैकी किमान अर्ध्या जागांवर भाजप अडचणीत आहे. आम्हाला फक्त सुरतमधल्याच आठ किंवा नऊ जागा मिळतील. ग्रामीण भागातल्या २५ ते ३०  जागांवर भाजपला अतिशय कठीण लढत द्यावी लागत आहे. आत्ता लोक भाजपच्या भीतीने गप्प आहेत, पण मतदान करताना ते नक्कीच घाबरणार नाहीत.

आपले मुद्दे काय आहेत?  ‘महामंथन’ या नावाने चालणारा माझा एक तासाचा कार्यक्रम टीव्हीवर फार प्रसिद्ध होता. त्यात प्रत्येक गावातले प्रश्न मी मांडलेले आहेत. लोकांच्या प्रश्नांचे मला जेवढे आकलन आहे तेवढे गुजरातेत कोणाला असेल असे मला वाटत नाही. राज्यात ५० लाख बेकार युवक आहेत. ६७ लाख शेतकरी आहेत. सगळे हैराण आहेत. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे इथेही आम्हाला लोकांना मोफत वीज आणि पाणी द्यायचे आहे. राजकारणात आपल्याला अनुभव नाही, त्याचे काय?मी सोळा वर्षे राजकीय पत्रकारिता केली. अनेक राजकीय पक्ष धोरण ठरवण्यासाठी माझ्या संपर्कात असत. कोणते मुद्दे उपस्थित करावेत, निवडणूक कशी जिंकावी आणि सरकार कसे चालविले पाहिजे हे सगळे मी सांगत असे. तेव्हा या सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव माझ्याकडेच आहे.

गुजरातमध्ये यावेळी भाजप नव्हे तर मोदीजी निवडणूक लढत आहेत. आपण त्यांचा सामना कसा करणार?उलटे आहे, यावेळी मोदीजी नव्हे भाजप निवडणूक लढवत आहे. हळूहळू भाजपला हे समजून चुकले आहे की आपल्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. भ्रष्टाचार प्रशासनामध्ये खोलवर रुजला आहे. विषारी दारूने ७५ लोकांचा जीव जातो. कोणालाही शिक्षा होत नाही. पूल तुटून कित्येक लोक मरण पावतात, पण कोणालाही दोषी ठरवले जात नाही. जनता खूप शहाणी असते. गुजरातमध्ये लोकसभेसाठी मोदींना मते पडतील आणि विधानसभेसाठी ‘आप’ला !मागच्या निवडणुकीत अल्पेश ठाकूर,  हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण नेते काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपत आहेत. काँग्रेस भाजपची बी टीम झाली आहे, हेच तर मी म्हणतोय.­ मागच्या आठ वर्षांत काँग्रेसचे ६५ मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले. मागच्या पाच वर्षांत काँग्रेसचे १५ आमदार भाजपत गेले. आज काँग्रेसजवळ नेता नाही. कार्यकर्ते नाहीत आणि मुद्देही नाहीत. जर भाजप इतका बळकट आहे, तर पाच वर्षांत त्यांना तीन मुख्यमंत्री का बदलावे लागले? आपल्या एका उमेदवाराने अर्ज मागे का घेतला? दुसऱ्या पक्षाच्या लोकांना धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावणे हे भाजपनेच केले आहे.. एका जागेवर त्यांनी केले; परंतु उरलेल्या १८१ जागांवर काय करणार?

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Aam Admi partyआम आदमी पार्टीElectionनिवडणूक