शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आडात आहे, पण पोहरा रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 11:23 IST

मिलिंद कुलकर्णी  माणूस निसर्गावर सातत्याने अत्याचार करीत असला तरी निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. त्याचा प्रत्यय यंदाही आला. सप्टेबरमध्येच ...

मिलिंद कुलकर्णी माणूस निसर्गावर सातत्याने अत्याचार करीत असला तरी निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. त्याचा प्रत्यय यंदाही आला. सप्टेबरमध्येच पावसाने वार्षिक सरासरी गाठली. बहुसंख्य धरणे तुडुंब भरली. अतिवृष्टीने झालेले उडीद, मूग आणि काही प्रमाणात कापसाचे नुकसान वेदनादायक आहे. मात्र रब्बी हंगाम चांगला जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. माणसाचा करंटेपणा पुन्हा ठळकपणे समोर आला, धरणे तुडुंब आहे, पण आमची नियोजनशून्यता, दूरदर्शीपणाचा अभाव, भ्रष्टाचाराची कीड यामुळे धरणे उशाला असून घसा कोरडा आहे. आडात आहे, पण पोहरा कोरडा राहिला आहे. शेती आणि नळपाणी योजनांना धरणातील पाणी पुरविण्यामध्ये जलसंपदा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठे अपयश आले आहे. निसर्ग देतोय, पण आमची झोळी तोकडी आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.  विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पर्जन्यमानाची अचूक नोंद आणि माहिती मिळत आहे. पावसाचे अंदाज देखील बहुतांश खरे ठरले. वादळ, अतिवृष्टीची शक्यता वास्तवात उतरली. बिहार, आसाम आणि महाराष्टÑातील पूर्व विदर्भात महापुराने थैमान घातले. जीवित व वित्त हानी झाली. कोरोनाच्या संकटात पूरग्रस्तांचे दु:ख देशवासीयांना फारसे कळले नाही. मदतीचे हात तिथपर्यंत पोहोचले नाही. गेल्यावर्षी पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने हाहाकार उडविला होता. आपत्ती व्यवस्थापन, नदी जोड असे विषय अशा प्रसंगात पुन्हा ऐरणीवर येतात. चर्चा होते, मात्र कार्यवाही होत नाही, हे मोठे दुखणे आहे. पर्जन्यमानाचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भडगाव (९४ टक्के) वगळता सर्व १४ तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाची तुलना केली तर अमळनेर, चोपडा, पारोळा व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये अधिक पाऊस झाला आहे. तर जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव व बोदवड तालुक्यात गेल्या वर्षापेक्षा थोडा कमी पाऊस नोंदविला गेला आहे. अर्थात अर्धा सप्टेबर महिना बाकी असून परतीचा पाऊस चांगला होतो, असा अनुभव आहे. खान्देशातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा विचार केला तर १६ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर १५ प्रकल्प ८० टक्कयाहून अधिक भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण १०० टक्के भरले आहे, तर नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणदेखील भरले आहे. हतूनर धरणात ६५ टक्के साठा असला तरी त्याचा विसर्ग करण्यात येत असतो. मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, बोरी व मन्याड पूर्ण भरले आहेत. मोर व बहुळात ९० टक्कयापेक्षा अधिक साठा आहे. गुळ आणि अंजनी ७५ टक्कयापेक्षा अधिक भरली आहेत. भोकरबारी मात्र २१ टक्कयावर अडले आहे. धुळे जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी वाडीशेवाडी, सोनवद हे ९० टक्कयापेक्षा अधिक तर करवंद, अनेर ही ८० टक्के, अमरावती ७८ टक्के भरले आहेत. सुलवाडे बॅरेज ५० टक्के भरले असून सारंगखेडा, अक्कलपाडा ५० टक्कयापेक्षा कमी आहेत. पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात रंगावली प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकाशा बॅरेज ४४ टक्के, शिवण ९१ टक्के तर दरा ७२ टक्के भरले आहे. आबादानी स्थिती असताना प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे पाणी उपसा करुन बांधापर्यंत नेण्यासाठी असलेल्या उपसा सिंचन योजनांचे भिजत घोंगडे कायम आहे. बोदवडबाबतदेखील तीच स्थिती आहे. धरणे भरली आहेत, पण बांध कोरडे राहणार आहेत. ही स्थिती जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्यतेने आणि राजकीय मंडळींच्या भ्रष्ट कारभारामुळे उद्भवली आहे. धरणात पाणी असले तरी शहरांना रोज पाणीपुरवठा करणारी शहरे मोजकी आहेत. शहादा आणि नवापूरला रोज पाणीपुरवठा होतो. नंदुरबारला पाणीपुरवठा करणाºया विचरक धरणात ९० टक्के तर आंबेपारा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे, पण साठवण क्षमतेअभावी एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. धुळ्याला नकाणे तलावावरुन पाणी दिले जाते, तलाव पूर्ण भरलाय पण शहरात दोन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. वाघूर धरण १०० टक्के भरले आहे, पण जळगावला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. साक्रीमध्ये चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. केंद्र सरकारची अमृत पाणी योजना धुळे, जळगाव व भुसावळात सुरु आहे, पण त्यात अडथळे कायम आहे. शिरपुरात मात्र मुबलक पाणी पुरवठा होत आहे. निसर्गाचे देणे आम्ही कसे स्विकारतो, यावर बरेच अवलंबून आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव