शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

भारतीय स्टार्टअप्स आणि एकशिंग्या ‘युनिकॉर्न’ची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 08:24 IST

गेल्याच आठवड्यात भारतात शंभरावी ‘युनिकॉर्न’ कंपनी उदयाला आली. स्टार्टअप्सच्या दुनियेत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या टप्प्याची चर्चा!

- डॉ. दीपक शिकारपूर, उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक 

स्टार्टअप्सच्या संदर्भात ‘युनिकॉर्न’ हा शब्दप्रयोग बऱ्याचदा वापरलेला आढळतो. युनिकॉर्न (ऊर्फ एकशिंग्या) हा ग्रीक पुराणातील एक प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी भारत, मध्यपूर्व आणि चीनच्या पुराणकथांमध्येही तो दिसतो. घोडा आणि बोकड यांच्या मधल्या आकाराचा आणि साधारण तसाच दिसणारा हा प्राणी प्रसिद्ध आहे, त्याच्या कपाळावर मध्यभागी असलेल्या एकाच शिंगामुळे.  

ज्या खासगी स्टार्टअप्सचे मूल्यांकन (व्हॅल्युएशन) एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे, त्यांना युनिकॉर्न नावाने ओळखण्याची सुरुवात ऐलिन ली यांनी २०१३ मध्ये केली. त्यावर्षी श्री. ली यांना असे ३९ स्टार्टअप्स आढळले. ऐलिन ली स्वतः, ‘काऊबॉय व्हेंचर्स’ या साहसवित्त पुरविणाऱ्या संस्थेचे संस्थापक होते. स्टार्टअप किंवा व्हेंचर कॅपिटलवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांना स्थिरता यायला वेळ लागतो. त्यांचे उत्पन्न किंवा उलाढाल बऱ्याचदा अनिश्चित किंबहुना सहजपणे वर्तवता येण्याजोगी नसते. अशा परिस्थितीत एखाद्या स्टार्टअपने १ अब्ज डॉलर्स उलाढालीचा टप्पा गाठणे, ही दुर्मिळ घटना मानली जाते. हा दुर्मिळपणा अधोरेखित करण्यासाठी ऐलिन ली यांनी युनिकॉर्न हा शब्दप्रयोग वापरला, कारण ते उद्योग, युनिकॉर्नप्रमाणेच -  दर्शन-दुर्लभ ठरले.

भारतात २०२१ हे वर्ष भलतेच क्रांतिकारी ठरले आहे. कारण या वर्षात स्टार्टअप्सच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी झालेली दिसते! २०२१ च्या प्रत्येक महिन्यात ३ किंवा ३ पेक्षा जास्त स्टार्टअप्सनी युनिकॉर्न बनण्याचा मान मिळवला आहे. NASSCOM च्या माहितीनुसार २०२१ हे वर्ष संपण्याआधीच, त्याच्या शेवटच्या तिमाहीत, २८ नवीन युनिकॉर्न्सची भर पडली आहे. आपल्याकडे (१५ डिसेंबर २०२१ पर्यंत) ७९ स्टार्टअपनी युनिकॉर्न ही पदवी मिळवली आहे. त्यांमध्ये झोमॅटो आणि फ्लिपकार्टसारख्या (सर्वपरिचित) नावांपासून स्लाइस (क्रेडिट कार्ड्स) आणि ड्रूम (सेकंडहॅँड गाड्यांची विक्री) सारख्या विशिष्ट लोकांतच माहीत असलेल्या कंपन्यांपर्यंत अक्षरशः सर्व क्षेत्रांतील स्टार्टअप्सचा समावेश आहे.  

अनेक युनिकॉर्न स्टार्टअप्स नवतंत्रज्ञानावर आधारित आहेत किंवा ते जी सेवा पुरवतात, ती नवतंत्रज्ञानाचा(च) वापर करतात. उदा. पेटीएम  – मोबाइल फोन आणि DTHची बिले भरण्याची सुविधा पुरवण्यापासून हिची सुरुवात झाली आणि आज वैयक्तिक आणि व्यवसायिक पातळीवरील ग्राहकांना, सर्वसमावेशक स्वरूपाच्या असंख्य सेवा या मंचावरून मिळत आहेत.बऱ्याचशा युनिकॉर्न स्टार्टअप्सनी संपूर्णपणे नवीनच क्षेत्रांत पहिले पाऊल टाकले  आणि तरीही भरीव कामगिरी करून दाखवली आहे. अधिकांश युनिकॉर्न स्टार्टअप्सनी, सतत नवनवीन प्रयोग आणि सेवेत वा उत्पादनात सुधारणा करून, प्रस्थापित आणि पारंपरिक उद्योगांना  धक्का दिला ! हॉटेलमधील खोली बुक करण्याचे ‘ओयो’ ॲप किंवा पेटीएमचे ‘वॉलेट’ – प्रवासादरम्यान खोली बुक करण्याची पद्धत तसेच कोणत्याही वस्तूची रक्कम (ऑनलाइन किंवा ऑफलाइन) चुकती करण्याचे तंत्र यांमध्ये बदल, सुधारणा घडवून आणण्याबरोबरच ही कामे अतिशय सरळसोपी बनविण्याचे कामही संबंधित स्टार्टअप्सनी केले आहे. 

स्टार्टअपसाठी जगावेगळ्या कल्पनेला व्यावहारिक पातळीवर टिकणारे स्वरूप द्यावे लागते. या प्रक्रियेला ‘मिनिमम व्हाएबल प्रॉडक्ट’ (MVP) असे म्हणतात. ज्यांना हे जमते ते आपल्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या वारंवार चाचण्या घेऊन सुधारणा करतात व परिणामी व्यवसायिकदृष्ट्या अधिक लवकर यशस्वी होतात.साहसवित्त पुरवणाऱ्या संस्था आणि अन्य गुंतवणूकदार भारतीय स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात पैसा पुरवीत आहेत. आवश्यक तितके भांडवल वेळेत मिळाल्याने स्टार्टअप्सना  स्पर्धेत टिकून राहता येते. यामध्ये स्टार्टअप्सचे मालक,  गुंतवणूकदार आणि ग्राहक अशा तिघांचाही लवकर फायदा होऊ शकतो.मोठ्या कंपनीने एखादा स्टार्टअप विकत घेतल्यास त्याचे रूपांतर युनिकॉर्नमध्ये चटकन होते. हा व्यवहार विकत घेणाऱ्या कंपनीलाही सोयीस्कर असतो. कारण संबंधित उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी  ‘R&D’ मध्ये वेगळी गुंतवणूक करावी लागत नाही. 

युनिकॉर्न बनण्याच्या मार्गावर असलेले सर्वच आणि इतरही बहुसंख्य स्टार्टअप्स नवीनतम आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांचे ग्राहक आणि वापरकर्तेही तांत्रिक बाबींना सरावलेले असतात. त्यामुळे स्टार्टअपची वाढ आणि प्रगती अतिशय वेगाने तसेच मोठ्या प्रमाणात होते. नवतंत्रज्ञानाची उपलब्धता आणि त्याचा सर्व पातळीवरील मुबलक (किंबहुना अपरिहार्य) वापर हा घटक, निदान भारतीय युनिकॉर्न्सच्या संदर्भात ठळकपणे दिसतो. अशाप्रकारे स्टार्टअपची प्रगती झाल्यावर त्याला युनिकॉर्न नावाने ओळखले जाते.

 - पण हे इथेच संपत नाही! १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या स्टार्टअपना ‘सुपरयुनिकॉर्न’ किंवा ‘डेकाकॉर्न’ म्हटले जाते (डेका म्हणजे ग्रीक भाषेत १० किंवा १० च्या पटीत). स्पेसएक्स, वुईवर्क, ड्रॉपबॉक्स ही या गटातली उदाहरणे.- तर अशी आहे ही ‘युनिकॉर्न’ कहाणी!