शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

अनंत अंबानी आणि एका पोपटाची 'ती' कहाणी; ब्राझीलच्या जंगलात...

By विजय दर्डा | Updated: February 24, 2025 08:43 IST

मुकेशभाई आणि नीताभाभी यांनी अनंतला संस्कार आणि संस्कृतीच्या रसात न्हाऊ घातले आहे. या अस्वस्थ जगात अनंत अंबानी हे मानवतेची दूरदर्शी खूण आहे !

- डॉ. विजय दर्डा

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

माझे जीवन आणि माझा व्यवसायच असा की, मला खूप लोक भेटत असतात. या गर्दीत काही मोजक्या व्यक्तींना भेटून वाटायला लागते, हे जग इतके सुंदर कसे? जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी त्यातले एक! सहज, साधे; परंतु स्पष्टवक्ते, दृढनिश्चयी आणि मानवतेने ओतप्रोत भरलेले! गेल्या आठवड्यात मी दोन तास त्यांच्याबरोबर होतो. पुष्कळ गप्पा झाल्या.

अनंत यांना आजोबा धीरूभाई अंबानी, वडील मुकेश आणि आई नीता यांचा वारसा लाभला, हे उघडच आहे. परंतु, केवळ वारशाने एखादी व्यक्ती उद्योगक्षेत्रातील नेता होत नाही. स्वतःचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे असते. अनंत हे सगळ्यात वेगळे व्यक्तिमत्त्व आहे, ते त्या अर्थाने ! केवळ धन कमावणे हा त्यांचा उद्देश नाही. ते जगणे सुंदर करण्याच्या मागे लागले आहेत. एकच उदाहरण पुरेसे आहे:ब्राझीलच्या कटिंगा जंगलात विहार करणारा स्पीक मॅके प्रजातीचा पोपट जंगलात दिसेनासा झाला आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, हे त्यांना समजले. परदेशात एका राजपुत्राच्या व्यक्तिगत संग्रहालयात या नष्ट होत चाललेल्या पक्षी प्रजातीला नवे जीवन देण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. आज ब्राझीलच्या जंगलात स्पीक मॅके जातीचे ९० पेक्षा जास्त पोपट उडत आहेत. नैसर्गिक घरट्यात त्यांचे प्रजनन होते. अनंत हे गणपतीचे भक्त आहेत, त्यांच्या 'वनतारा' या प्रकल्पात हत्तींसाठी सर्वात मोठे पुनर्वसन केंद्र तयार झाले आहे. वनतारामध्ये ८० बिबटेही जन्माला आले असून, लवकरच त्यांना जंगलात सोडण्यात येईल.

मुंबईच्या सनफ्लॉवर नर्सरी स्कूलपासून अमेरिकेतील महाविद्यालयापर्यंत एकमेकांबरोबर राहण्यासाठी ज्यांनी सतत धडपड केली, असे १२ मित्र त्यांच्याबरोबर आहेत. विश्वविख्यात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत अनंत यांना प्रवेश मिळाला होता. काही मित्रांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. या विद्यापीठात प्रवेश हे मोठमोठ्या कुटुंबांचे स्वप्न असते, परंतु 'एकत्रच शिकायचे' या हट्टावर हे सर्व मित्र हटून बसले. शेवटी सगळ्यांनी ब्राऊन विद्यापीठात एकत्र प्रवेश घेतला. इतकेच नव्हे, आजारपणामुळे अनंत एक वर्षभर कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत, तेव्हा बाकीच्या मित्रांनीही १ वर्ष थांबून घेतले. आजसुद्धा हे सगळे मित्र आठवड्यातून एकदा न चुकता भेटतात.

अनंत लहान असताना तृतीयपंथी समुदाय करत असलेली देवीची आरती त्यांना आवडली. अनंत आजही आरतीसाठी तिथे जातात. मालाडमध्ये १८ हजार तृतीयपंथियांची देखभाल करतात. त्यांच्यावर किमान खर्चात उपचार व्हावेत म्हणून ते देशभरात २०० हॉस्पिटल उघडणार आहेत. त्यातील दोन विदर्भात असणार आहेत. यासाठी तीन लाख कोटी देण्यात आले आहेत. दीड लाख कोटी रुपयात इस्पितळे उभी राहतील आणि उर्वरित निधीच्या व्याजात या इस्पितळांचे संचालन होईल. आजोबा धीरूभाई अंबानी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते देशभर शेकडो मंदिरे उभी करू इच्छितात. या मंदिरांमध्ये गुरुकुल, वाजवी दरात निवास आणि भोजनाच्या व्यवस्थेबरोबरच लग्नासाठी सभागृहही असेल.

अनंत हे उत्तम दूरदृष्टी असलेले उद्योग क्षेत्रातील अग्रणी नेते आहेत. त्यांना नवनवे तंत्रज्ञान अवगत आहे. व्यवहार-व्यवसाय आणि जीवनाचे बारकावे शिकण्यासाठी ते मुकेश अंबानी यांच्याबरोबर दररोज दोन तास घालवतात. आपल्या भावंडांशी त्यांचे अत्यंत दृढ अनुबंध आहेत. 'मी त्यांचा हनुमान आहे', असे ते स्वतःचे वर्णन करतात. देशातील कोट्यवधी लोकांना रोजगार पुरवणे हे मुकेशभाईचे स्वप्न आहे. रिलायन्स उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांची विद्यमान संख्या २५ लाख असून, ती १ कोटीपर्यंत नेण्यासाठी अनंत संपूर्ण क्षमता वापरून काम करत आहेत. 'कर्मचारी संख्येच्या बाबतीत रिलायन्सला जगातील अव्वल कंपनी बनविणे हे त्यांचे स्वप्न आहे. आपल्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसाला ते ही भेट त्यांना देऊ इच्छितात. 

महाराष्ट्रात यवतमाळ, विदर्भ भागात उद्योग सुरु करण्याचा आग्रह मी त्यांच्याकडे धरला. ते क्षणात म्हणाले, '१०-१२ एकरांचा एक भूखंड मला द्या. तिथे उभ्या राहणाऱ्या उद्योगातून हजारो लोकांना काम मिळेल.'

लोकमत समूह सिंगापूरनंतर लंडनमध्ये जागतिक आर्थिक परिषद आयोजित करणार असल्याचे समजल्यावर त्यांना विशेष आनंद झाला. या परिषदेला येण्याचे त्यांनी सहर्ष मान्य केले. 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार समारंभ'लोकमत'ने जामनगरमध्ये आयोजित केल्यास महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. जवळपास दोन तास चाललेल्या या चैतन्यदायी बैठकीत लोकमत माध्यमसमूहाचे संयुक्त प्रबंध संचालक, तसेच संपादकीय संचालक ऋषी दर्डा हेही उपस्थित होते. अनंत यांची स्मरणशक्ती अफाट आहे. गप्पांच्या ओघात त्यांनी मला एक आठवण करून दिली. ते जेव्हा सातव्या इयत्तेत होते, तेव्हा एका प्रदर्शनाच्या निमित्ताने मी त्यांच्या शाळेतील त्यांच्या स्टॉलवर गेलो होतो; तिथे त्यांनी मला एक अक्वेरियम दाखवले आणि मी त्याची प्रशंसाही केली होती; हे त्यांनी मला उत्साहाने सांगितले. त्याच शाळेत माझा नातू यशोवर्धनही शिकत होता. अनंत यांच्याशी झालेली ही भेट विशेष संस्मरणीय होती. मुकेशभाई, नीताभाभी यांनी अनंत यांना संस्कार आणि संस्कृती रसात न्हाऊ घातले आहे, हे नक्की. अनंत यांच्या रूपाने मानवतेने ओतप्रोत भरलेला, उत्तम दूरदृष्टी असलेला आणि सक्षम असा उद्योग क्षेत्रातील नेता त्यांनी देशाला दिला आहे. अनंत यांच्यासाठी मला मोहम्मद अली असार यांचा एक शेर आठवतो....

नई मंजिल, नया जादू, उजालाही उजालादूर तक इंसानियत का बोलबाला...

vijaydarda@lokmat.com  

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीRelianceरिलायन्स