शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:01 IST

देशातले वारे बदलत आहेत! म्हणजे भाजपचे वैचारिक वर्चस्व कमी झाले आहे का?- ती अतिशयोक्ती होईल! परंतु, तटबंदीला भेग पडली आहे, हे मात्र नक्की!

- योगेंद्र यादव (अध्यक्ष, स्वराज इंडिया, सदस्य, जय किसान आंदोलन)

जनमानसात होत असलेल्या बदलावर जनादेशाची मोहोर उमटेल काय? - नव्या वर्षात राजकारणातला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल. २०२३ हे संक्रमणाचे वर्ष आहे. २०२२ मध्ये उमटलेले ध्वनी आणि २०२४ची चाहूल यामध्ये अडकलेले हे वर्ष. या वर्षात सगळ्यांच्या नजरा एकाच प्रश्नावर खिळलेल्या असतील. २०२२ मध्ये जे राजकीय परिवर्तन सुरू झाले आहे ते २०२४ पर्यंत सत्तापरिवर्तनाचे स्वरूप घेईल काय?

उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपला मिळालेला मोठा विजय आणि पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशात भाजपच्या वाट्याला आलेला पराजय यापैकी कोणतीच घटना सरलेल्या वर्षातली सर्वात मोठी राजकीय घटना नव्हती. २०१४पासून ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये जय पराजय होत आला, त्याच प्रकारे याही निवडणुकांचे निकाल लागले. 

या वर्षातली सर्वात मोठी राजकीय घटना जर कुठली असेल तर ती ‘भारत जोडो’ यात्रा होय! या देशात गेली आठ वर्षे जे चालले आहे त्याला भारत जोडो यात्रेने आव्हान दिले. जनमानस घुसळून काढले. अर्थात, जनता मोदी राजवटीच्या विरोधात उभी ठाकली आहे किंवा भाजपचे वैचारिक वर्चस्व कमी झाले आहे असे इतक्यात म्हणणे अतिशयोक्तीचे होईल; परंतु किल्ल्याच्या तटबंदीला भेग पडली आहे, हे नक्की! ‘पप्पू’ नामक खोटे पोस्टर उखडले गेले असून त्याखाली दडलेले सत्य समोर येते आहे. 

‘भारत जोडो’ यात्रा आता अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे. आतापर्यंत जवळपास २८०० किलोमीटर अंतर पूर्ण केलेली ही पदयात्रा या महिन्याच्या अखेरपर्यंत  श्रीनगरपर्यंत जाईल.  आता उत्तर भारतातील राष्ट्रीय माध्यमांनाही नाइलाजाने या यात्रेच्या बातम्या दाखवाव्या लागत आहेत. राहुल गांधी यांच्याकडे दुर्लक्ष करणे आता पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही.  श्रीनगरमध्ये ही यात्रा पूर्ण तर होईल; पण जनतेशी थेट जोडून घेण्याचा हा सिलसिला त्यानंतरही चालू राहील. या यात्रेला एका सलग मोहिमेचे रूप देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांना गती मिळाली तर येणारे वर्षे भाजपला जड जाईल हे नक्की!

सध्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडे कोणताही उपाय नाही. बेकारी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरतोच आहे. एकीकडे गरिबांना चूल पेटवणे मुश्कील झाले आहे, तर दुसरीकडे ‘हम दो’ सरकारच्या ‘हमारे दो’ उद्योगपतींचे साम्राज्य विस्तारत चालले आहे. चीन आक्रमक पवित्रा घेत आहे. सामरिक आणि विदेश नीतीतील सरकारचे अपयश सैन्यदलाच्या बहादुरीआड लपवणे कठीण होत चालले आहे. या सरकारच्या राजवटीत चीन आपली ९०० किलोमीटर जमीन गिळंकृत करून बसला, हे सत्य लपवणे हर प्रकारे प्रयत्न करूनसुद्धा कठीण होत आहे. 

अगदी बारकाईने पाहाल, तर तुमच्या लक्षात येईल, की बदलाची हवा अतिशय संथपणे वाहू लागली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणाम केवळ काही प्रदेश आणि वर्गापर्यंत मर्यादित आहे, देशाच्या शेवटच्या घरापर्यंत या यात्रेचा संदेश पोहोचलेला नाही; हे तर खरेच! जनमताच्या सर्वेक्षणात भाजपला बहुमत मिळते आहे, असाच निष्कर्ष निघेल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे असेच दिसेल. परंतु आता  इथून पुढचा रस्ता कठीण आहे.  पत्त्यांचा बंगला कधीही कोसळू शकतोच!

या वर्षी होणाऱ्या नऊ विधानसभा निवडणुकांत वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा काहीसा अंदाज लागेल. भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि काँग्रेस व राहुल गांधी यांची बदलती प्रतिमा या समीकरणाचा अंदाज बांधता येईल. पहिली मोठी परीक्षा या वर्षी एप्रिल-मे मध्ये कर्नाटकात होईल. या राज्यात भाजप आजवर संपूर्ण बहुमत मिळवू शकलेला नाही. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने येथे नेहमीच ‘ऑपरेशन कमळ’सारख्या चोर दरवाजाचा आधार घेतला आहे. कर्नाटकातील भाजप सरकारचा निकम्मेपणा  पाहता काँग्रेसला तिथे मोठी संधी आहे. कधी हिजाब तर कधी अजानच्या बहाण्याने भाजपने राज्यात ध्रुवीकरण सुरू केलेच आहे. ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ उघडण्याची राहुल गांधी यांची घोषणा एका प्रभावी राजकीय समीकरणात बदलता येते का, याची परीक्षा कर्नाटकातील निवडणुकीत होईल. 

वर्षअखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणात विधानसभा निवडणुका होतील. काँग्रेसला राजस्थानात किंवा कमीत कमी छत्तीसगढमध्ये आपली सत्ता वाचवावी लागेल आणि मध्य प्रदेशमध्ये जोडतोडीच्या आधारावर आलेले भाजपचे सरकार लोकांना मान्य नाही हे सिद्ध करावे लागेल. तेलंगणात भाजपची परीक्षा असेल; कारण देशातले हे एकमेव राज्य असेल जेथे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ साली मिळालेल्या जागांमध्ये भर पडण्याची उमेद भाजप बाळगू शकतो. 

शेवटी एक इशारा देऊन ठेवतो : जनमतातून जनादेशाची यात्रा सहज, स्वाभाविक आणि लोकशाही पद्धतीने पार पडेल, तेव्हाच उपरोक्त विश्लेषण लागू असेल! राजकीय अभ्यासकांना याची खात्री नाही.  जनमानसाची दिशाभूल करण्याचे किंवा जनादेशाचे थेट अपहरणच करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी बऱ्याच जणांना शंका आहे. आपला देश अशा दुर्घटनेपासून वाचावा!!.. २०२३साठी याहून वेगळी हार्दिक शुभेच्छा कोणती असू शकते?

yyopinion@gmail.com

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी