शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राजा बदललाय- १० लाख मधमाश्यांना संदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:56 IST

शाही राजघराण्यात पाळली जाणारी ही परंपरा आताही इमानेइतबारे पाळली गेली. त्यासाठी या मधमाश्यांचे पालक (रॉयल बी कीपर) ७९ वर्षीय जॉन चॅपल आणि त्यांची पत्नी कॅथ यांच्यावर यावेळी ही जबाबदारी सोपवण्यात आली.

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स आता राजे झाले आहेत. यामुळे अनेक संदर्भ बदलतील. प्रिन्स चार्ल्स यांच्यावर आता नव्या जबाबदाऱ्या येतील. प्रिन्स चार्ल्स हे राजे झाल्याचा संदेश आता सगळ्या जगापर्यंत गेला आहे; पण एवढंच नाही. बकिंगहॅम पॅलेसमध्ये असलेल्या लाखो मधमाश्यांचा मालकही आता बदलला आहे. अगोदर त्यांच्या मालकीणबाई महाराणी एलिझाबेथ होत्या, आता प्रिन्स चार्ल्स त्यांचा राजा बनला आहे; पण ही बाब त्यांना कोण सांगणार की त्यांचा राजा आता बदलला आहे? आणि त्यांना जर हे सांगितलं नाही तर त्यांना कळणार तरी कसं की आपला मालक आता बदलला आहे?

ब्रिटनमध्ये अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे की शाही राजघराण्यात काही बदल झाला, राजघराण्यात कोणाचं लग्न झालं, कोणाचं निधन झालं, कोणाचा जन्म झाला, राजा बदलला, राजघराण्यात लग्न होऊन कोणी नवीन सदस्य आला, तर त्याची माहिती या मधमाश्यांनाही सांगावी लागते. राजघराण्यात मधमाश्या पाळण्याची परंपरा फार पुरातन आहे. सध्याच्या घडीला राजघराण्यात दहा लाख मधमाश्या पाळण्यात आल्या आहेत. त्यांची अनेक पोळी बकिंगहॅम पॅलेस आणि क्लॅरेन्स हाऊस येथे आहेत. 

ब्रिटनमध्ये असं मानण्यात येतं की राजघराण्यात घडलेली कोणतीही नवी आणि महत्त्वाची गोष्ट येथील मधमाश्यांनाही सांगावी लागते, नाही तर या मधमाश्या रागावतात. आपल्याला महत्त्व दिलं नाही म्हणून त्या चिडतात. असं झाल्यास काही वेळा आपलं पोळं सोडून त्या निघून जातात, काही वेळा मध तयार करणंच बंद करतात, तर काही वेळा या अपमानाचं दु:ख असह्य होऊन त्या प्राणत्याग करतात. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स आता त्यांचे मालक, राजे बनले आहेत. त्यामुळे या लाखो मधमाश्यांपर्यंत हा संदेश देण्यात आला की, तुमचा राजा आता बदलला आहे. पण तो महाराणी एलिझाबेथ यांच्याइतकाच दयाळू आणि प्रेमळ आहे. तो आता तुमची काळजी घेईल! तुमचं पालन, संगोपन करील. त्यामुळे तुम्हीही आता तुमच्या नव्या राजाशी चांगले संबंध ठेवा आणि मध बनवणं सोडू नका. राजघराण्याशी एकनिष्ठ राहा आणि तुम्हीही आपली परंपरा पाळा.

शाही राजघराण्यात पाळली जाणारी ही परंपरा आताही इमानेइतबारे पाळली गेली. त्यासाठी या मधमाश्यांचे पालक (रॉयल बी कीपर) ७९ वर्षीय जॉन चॅपल आणि त्यांची पत्नी कॅथ यांच्यावर यावेळी ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी राजघराण्यात असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यांना काळी रिबिन बांधली आणि पोळ्यांच्या प्रत्येक बॉक्सजवळ जाऊन त्यांच्या कानात सांगितलं, मधमाश्यांनो, तुमचा राजा आता बदलला आहे. त्याच्या प्रजेप्रमाणे तुमचीही तो अगदी मनापासून काळजी घेईल. तुमच्यावर प्रेम करील. जॉन चॅपेल हे गेल्या तीस वर्षांपासून राजघराण्यात मधमाश्यांचं पालन करताहेत. त्यांची काळजी घेताहेत. सगळ्या मधमाश्यांशी त्यांची चांगली दोस्ती आहे. त्यांनी सांगितलं, राजघराण्यातील मुख्य माळ्याचा काही दिवसांपूर्वीच मला मेल आला होता आणि मला तातडीनं तिथं बोलवून घेण्यात आलं. रिवाजाप्रमाणे सगळ्या मधमाश्यांच्या कानात मी ही नवी बातमी सांगितली आहे. योग्य वेळी त्यांना संदेश पोहोचल्यामुळे त्या आता नाराज होणार नाहीत आणि मध तयार करणंही सोडणार नाहीत. राजघराण्याचीही त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. अर्थात राजघराणंही परंपरेप्रमाणे त्यांची काळजी घेईलच आणि त्यांच्या देखभालीत कोणतीही कसूर ठेवणार नाही.  

असं म्हटलं जातं की, ज्या ज्यावेळी अनवधानानं कुठली महत्त्वाची घडामोड या मधमाश्यांना सांगितली गेली नाही, सांगायची राहून गेली किंवा त्यांना पुरेसं महत्त्व दिलं गेलं नाही, त्या त्यावेळी या मधमाश्यांनी आपली नाराजी प्रकट केली आहे आणि मूक आक्रोश करीत आपल्या पद्धतीनं त्यांनी राजघराण्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवला आहे. असं घडू नये म्हणून राजघराण्यातर्फेी प्रत्येकवेळी कटाक्षानं काळजी घेतली जाते.  

संपूर्ण युरोपातच परंपरेचं पालन!संपूर्ण युरोपात अनेक शतकांपासून ही परंपरा पाळण्यात येते. आयर्लंड, वेल्स, जर्मनी, नेदरलॅण्डस्, फ्रान्स, स्वीत्झर्लंड, बोहेमिया याशिवाय अमेरिका आणि इतरही काही देशांत ही प्रथा पाळली जात होती. आजही या प्रथेचं तिथे पालन केलं जातं, पण इंग्लंडमध्ये ही परंपरा जास्त लोकप्रिय आहे. जनताही या प्रथांचा आदर आणि सन्मान करते.

टॅग्स :Queen Elizabeth IIमहाराणी एलिझाबेथ द्वितीय