शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आभार प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 02:41 IST

एखादे कार्य पार पडले की संबंधितांचे आभार मानावे असा एक संकेत आहे. या संकेताची नंतर पद्धत झाली, पद्धतीची फॅशन झाली आणि आता तर त्याकडे केवळ उपचाराचा भाग म्हणून

- प्रल्हाद जाधवएखादे कार्य पार पडले की संबंधितांचे आभार मानावे असा एक संकेत आहे. या संकेताची नंतर पद्धत झाली, पद्धतीची फॅशन झाली आणि आता तर त्याकडे केवळ उपचाराचा भाग म्हणून पाहिले जाते. आभार प्रदर्शनाचा कार्यक्र म जाहीर झाला की लगेच उठून बाहेर पडण्याची पद्धतही आहे, इतकी की एखादा माणूस कार्यक्रम स्थळी शिल्लक राहिला तर तो अडाणी आहे की काय अशी शंका यावी. इतक्या घाईघाईने उठून ही माणसे जातात कुठे आणि पुढे काय करतात असा प्रश्न मला नेहमी पडतो. विमान लॅण्ड झाले की इतका वेळ गुपचूप बसलेले प्रवासी विमानात बॉम्ब ठेवल्याची बातमी मिळाल्याप्रमाणे खाडखाड धाडधाड उठून उभे राहतात. त्यांनी पंधरा मिनिटे उभे राहिलेले चालेल पण बसून राहणे हे जणू अडाणीपणाचे लक्षण मानले जाते. सिनेमा संपल्यावर श्रेयनामावली सुरू होते, ज्यांनी ती कलाकृती निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले ते कलावंत, तंत्रज्ञ कोण हे समजून घेणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपल्या आधुनिक जीवनमूल्यांत जणू बसतच नाही, श्रेय नामावली सुरू झाली की लगेच सारे उठून थिएटरच्या बाहेर पडू लागलात...असे का?इतकी कसली घाई झाली आहे आपल्याला? हे आपल्या बधीर मानसिकतेचे आणि कृतघ्नपणाचे लक्षण तर नाही!थांबताच येत नाही अशा अवस्थेतील माणूस शौचालयाकडे जसा धावत सुटतो तसा सामान्यपणे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो. आपण कुणाचे आभार मानतोय, कशासाठी मानतोय, नाव बरोबर आहे का, नावांची क्रमवारी योग्य आहे का या कशाचाही विचार न करता केलेले आभार प्रदर्शन हे एका अर्थी आभार विडंबन ठरते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्या सर्व ज्ञात अज्ञात मित्रांचे आभार, असे एक वाक्य शेवटी म्हणण्याची पद्धत आहे. ज्ञात आणि अज्ञात या दोन शब्दांत साऱ्यांचीच बोळवण करण्याची ही हिंसक वृत्ती आयोजकांमध्ये का आली, याचा अभ्यास होण्याची गरज आहे. एवढा मोठा कार्यक्रम करताय ना, मग नीट आभार माना की सगळ्यांचे आणि अज्ञात अशी वेगळी पंगत कशाला उठवताय, ते अज्ञात कोण आहेत ते आधी शोधून काढा, तेथेच तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या श्रेयाचे खरे मानकरी सापडण्याची शक्यता आहे. विमान अपघातातून बचावलेल्या एका वैमानिकाने परमेश्वरापासून त्या अज्ञात शक्तीपर्यंत सर्वांचे पुन:पुन्हा आभार मानले पण ज्याने त्याचे पॅराशूट नीट गुंडाळून ठेवले होते, त्याचे आभार मानायला मात्र तो विसरला होता!