शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या तंबूतून.. !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 08:06 IST

एकीकडे भाजप व दुसरीकडे काँग्रेस यांना दूर ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार सरसावले आहेत, असे चित्र निर्माण झाले

देशातील विरोधकांना किमान चर्चेसाठी का होईना, एकत्र आणण्यासाठी आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा पुढाकार घेताना दिसत  आहेत. भाजपने अलगदपणे दूर केलेले सिन्हा सध्या तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांना राज्यसभेवर पाठवतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे ते सक्रिय झाले आहेत. शिवाय ममता बॅनर्जी यांनाही राष्ट्रीय राजकारणात महत्त्व हवे आहे. अशा स्थितीत विस्मरणात गेलेल्या आपल्याच राष्ट्र मंच संस्थेद्वारे यशवंत सिन्हा यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी  भाजपविरोधक व समविचारी मंडळींची बैठक बोलावली. पण तिचा आधीच इतका गवगवा झाला की, आता राष्ट्रीय राजकारणात आमूलाग्र बदल होणार,  असेच सर्वांना वाटावे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेले, अशी चर्चा आधी मुंबईत आणि मग दिल्लीत सुरू झाली.

एकीकडे भाजप व दुसरीकडे काँग्रेस यांना दूर ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार सरसावले आहेत, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे हा तिसरा पर्याय कसा असेल, काँग्रेसची त्याविषयी काय भूमिका असेल, यावर दिल्लीत अपेक्षेप्रमाणे चर्वितचर्वण सुरू झाले. दिल्लीला गप्पा आणि अफवा यांसाठी असे विषय सतत हवेच असतात. त्यामुळे शरद पवार यांच्या निवासस्थानी काल दिवसभर पत्रकार, कॅमेरामन तळ ठोकूनच होते. कोणकोण बैठकीसाठी येत आहे, कोण मध्येच बाहेर पडले, याचे वर्णन सुरू होते.  बैठक संपवून पवार कधी एकदा बाहेर येतात आणि कोणती मोठी घोषणा करतात, याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते. पण पवार फार काही न बोलताच, केवळ प्रास्ताविक करून परत निघून गेले.

बैठकीची जी माहिती दिली गेली, त्यातून माध्यमांच्या हाती काहीच सनसनाटी वा मसालेदार लागले नाही. त्यामुळे विरोधकांची बैठक फसली, तो फ्लॉप शो ठरला, अशा बातम्या पसरल्या. बैठकीत काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे मुद्दाम त्या पक्षाला निमंत्रण नव्हते, अशीही चर्चा झाली. पण काँग्रेसच्या तीन नेत्यांना निमंत्रण दिले होते, काही कारणास्तव ते आले नाहीत, असेही स्पष्ट झाले. अर्थात बैठकीचा अजेंडा स्पष्ट नसल्याने आणि शरद पवार नव्हे, तर यशवंत सिन्हा यांनी पुढाकार घेतला असल्याने काँग्रेसने आपल्या नेत्यांना बैठकीला न जाण्याच्या सूचना दिल्या असू  शकतील. ही बैठक फसली की यशस्वी झाली, हे आयोजक असलेल्या सिन्हा यांनाही आताच सांगता येणार नाही, कारण ही पहिलीच बैठक होती. तिचा स्पष्ट अजेंडा नव्हता. शिवाय बैठकीचे आमंत्रण राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर माजी न्यायाधीश, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, विचारवंत, अन्य मान्यवर, शेतकरी प्रतिनिधी यांनाही होते.

कोणत्याच राजकीय पक्षाशी थेट संबंध नसलेल्या या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या  पहिल्याच बैठकीत तिसरी, चौथी वा कोणतीही आघाडी होणे वा त्याबाबत चर्चा  होणेही शक्यच नव्हते. त्यामुळे बैठकीत या मंडळींनी देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती, सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर लावली जाणारी देशद्रोहाच्या गुन्ह्यांची कलमे, कोरोना मृतांचे आकडे लपविण्याचा कथित प्रयत्न, लसीकरणास होणारा विलंब, पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीतील भरमसाठ वाढ, खाद्यतेले व अन्नधान्यांची दरवाढ आणि एकूणच महागाई आदी विषयांचा आढावा घेतला. या सर्व मुद्द्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे आणि सरकारला व्हिजन नाही, यावर सर्वांचे एकमत होते. पण कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या काळात सरकारविरोधात रस्त्यांवर उतरणे शक्य नाही, आंदोलनांसाठी हा काळ योग्य नाही, असेच विरोधकांना वाटत आहे. अशा स्थितीत वेळोवेळी आपण भेटावे, परिस्थितीचा आढावा घ्यावा,  दबाव गट बनवून सरकारला वळणावर आणण्याचा प्रयत्न करावा, अशी तिथे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा यासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी त्यांना रणनीती ठरवायची आहे. पण पहिल्याच बैठकीत ती ठरू शकत नाही आणि काँग्रेसला दूर ठेवून भाजपविरोधात लढणे शक्य नाही, हेही सर्वांना माहीत आहे. आपण एकत्र आलो तर काँग्रेस काहीसे नमते घेईल, असेही काही विरोधकांना वाटत आहे. अशा विविध अंगांनी चर्चा झाली. लगेच निष्पन्न काहीच झाले नाही तरी त्यामुळे ही बैठक फसली असे म्हणता येणार नाही. विरोधकांच्या तंबूत अद्याप बरेच काही घडू शकेल. या तंबूत शिरून काँग्रेस तंबूचा ताबा घेते की यातील काही जणच या तंबूतून बाहेर पडतात, हे कळायला सहा महिने तरी लागतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा