शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

सांगा... काका कुणाचे?

By सचिन जवळकोटे | Updated: March 22, 2018 19:25 IST

मनोहरपंतांच्या पुस्तक सोहळ्यात म्हणे थोरले काका बारामतीकर चक्क मिलिंदरावांच्या कानात काहीतरी कुजबुजले. तेव्हापासून मिलिंदरावांचे पाय ‘मातोश्री’वर हवेतच. आता ‘सरकारमधील कट्टर विरोधक’ असलेल्या पक्षाचे सचिव झाल्यापासून मिलिंदाला आम्ही पामर राव म्हणून संबोधू लागलेलो.

मनोहरपंतांच्या पुस्तक सोहळ्यात म्हणे थोरले काका बारामतीकर चक्क मिलिंदरावांच्या कानात काहीतरी कुजबुजले. तेव्हापासून मिलिंदरावांचे पाय ‘मातोश्री’वर हवेतच. आता ‘सरकारमधील कट्टर विरोधक’ असलेल्या पक्षाचे सचिव झाल्यापासून मिलिंदाला आम्ही पामर राव म्हणून संबोधू लागलेलो. असो... ‘बारामतीचे काका आपल्याशी किती जवळीक साधू पाहतात,’ याचा किस्सा मिलिंदरावांनी रंगवून सांगताच मनोहरपंतांनाही उचंबळून आलं, ‘काकांचं भलंही सध्याच्या नवीन पंतांशी जमलं नसेल; परंतु माझ्यासारख्या जुन्या पंतांशी त्यांचं नातं नेहमीच आपुलकीचं राहिलेलं,’ हे सांगताना त्यांनी आधुनिक काळातही ‘पहिले पंत... सवाई पंत’ ही पेशवाई परंपरा सुरूच असल्याची आठवण करून दिली.‘पूर्वीही मनोहरपंत बाळासाहेबांच्या निकट होते, यापेक्षा ते सध्याही काकांच्या जवळ आहेत,’ या जाणिवेनं मिलिंदराव खट्टू झाले. याचवेळी तिथं आलेल्या देवेंद्रपंतांनी विचारलं, ‘मिलिंदा... खूप दिवस झालं, काही वैयक्तिक काम घेऊन आला नाहीत माझ्याकडं? असो... आम्ही ज्यांच्या भरजरी जाकिटाचं चकाकतं बटण धरून सत्ताकारण करतोय, ते आमचे ‘नमो’सुद्धा काकांचंच बोट धरून राजकारणात आलेत बरं का?’हे ऐकताच ‘उद्धो’ खवळून म्हणाले, ‘भाषणात जरी आम्ही काकांवर टीका करत असलो तरी आतून आम्हीही असतोच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये.’ तेव्हा ‘कृष्णकुंज’च्या दिशेनं व्यंगात्मक हसण्याचा आवाज आला. काकांच्या महामुलाखतीचा व्हिडीओ किती हिट झाला, हे यू ट्यूबवर पाहत ‘राज’ यांनी डायलॉग टाकला, ‘मी कॉन्टॅक्ट-बिन्टॅक्टमध्ये नसतो. डायरेक्ट भेटत असतो. आता या आठवड्यातही आम्ही तिसऱ्यांदा का चौथ्यांदा भेटतोय.’हे ऐकून रामदासांना नवे काव्य आठवले, ‘पुढच्या वर्षी ठाकणार, माझ्यासमोर प्रसंग बाका... एकीकडे नमो अन् पंत, दुसरीकडं लाडकेकाका...’ तेव्हा हातातल्या उसाला सदाभाऊ समजत शेट्टींनीही काडकन्ऽऽ कांडकं मोडलं, ‘मीही काकांसोबत राजकारण करणार. आमचीही सलगी वाढलीय बरं का.’‘आपलीच कशी काकांशी जवळीक,’ हे दाखविण्याची अहमहमिका हळूहळू सर्वपक्षीय नेत्यांमध्ये वाढत चालली. राहुल बाबांचा आदेश असल्यानं इच्छा नसूनही पृथ्वीबाबा कºहाडकर काकांच्या जिव्हाळ्याच्या आठवणी सांगू लागले. सोलापूरच्या सुपुत्रानं तर थेट अनेक दशकांचा इतिहासच उलगडला. ‘बुढ्ढी के बाल विकत मी ज्या गावात मोठा झालो, तिथं काकांचं अन् माझं नातं खूप जवळचं होतं,’ हे ऐकताना विजयदादांनाही अक्षरश: गहिवरून आलं. (...म्हणजे भरून आलं होऽऽ)सातारा अन् फलटणचे दोन्ही राजेही काकांशी आपली जवळीक दाखविताना त्यांच्या गाडीत सर्वाधिक मिनिटं कोण बसलं, याचा दाखला देऊ लागले. याचवेळी ‘हल्लाबोल’ करून दमलेले अजितदादा समोरून आले. तेव्हा साºयांनीच त्यांना विचारलं, ‘दादाऽऽ दादाऽऽ सांगा काका कुणाचे?’ बहुतांश मंडळींना वाटलं, दादा म्हणतील, ‘माझेच!’... पण हाय, लाडक्या तार्इंकडं तिरका कटाक्ष टाकत दादा ठसक्यात म्हणाले, ‘गेल्या पन्नास वर्षांत मलाच उमजलं नाही, काका नेमके कुणाचे... तिथं तुम्ही सारे किस झाड की पत्ती? चला, लागा कामाला..’(तिरकस)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार