शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

करनीती ! जीएसटीवर टीसीएस?...ये तो बहोत नाइन्साफी है, सरकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 01:36 IST

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, वस्तूच्या विक्रीवरील आयकर कायद्याअंतर्गत टीसीएसच्या नवीन कोणती तरतूद आली आहे?

उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, वस्तूच्या विक्रीवरील आयकर कायद्याअंतर्गत टीसीएसच्या नवीन कोणती तरतूद आली आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, प्राप्तिकर कलम २०६ सी (१एच)मध्ये नवीन तरतूद करण्यात आली आहे, ती खालीलप्रमाणे : प्रत्येक विक्रेत्यास ज्याची उलाढाल मागील वित्तीय वर्षात जर १० कोटींहून अधिक झाली असेल तर तो टीसीएस ०.१ टक्के (०.०७५ टक्के ३१ मार्च २०२०पर्यंत) जमा करण्यास जबाबदार आहे़ ५० लाखांहून अधिक किमतीच्या विक्रींवरील खरेदीदारांकडून टीसीएस हे विक्रेत्याकडून इनव्हॉइसच्या आधारे देय आहे हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. करदात्यांसाठी खूप परेशानी होणार आहे़ ‘बडी ना इनसाफी है सरकार’ असेच करदाता म्हणेल.अर्जुन : कृष्णा, आयकर कायद्यांंतर्गत टीसीएस काढण्यासाठी बिलात लावलेल्या जीएसटीच्या रकमेचा समावेश केला जाईल का?कृष्ण : अर्जुना, टीसीएस लावताना जीएसटी त्यात समाविष्ट करावा लागेल़ परंतु आतापर्यंत सीबीडीटीकडून याबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. कायद्याअंतर्गत उलाढाल आणि विक्रीची कोणतीही व्याख्या नाही़उदा. जर ‘अ’ची वस्तूंची विक्री किंमतरु. २० लाख आहे, जीएसटीचा दर २८ टक्के आहे, ते होते रु. ५६ लाख़ एकूण किंमत रु़ २५.६ लाखांवर टीसीएस ०.०७५ टक्के काढण्यात येईल जे होते रु १९२०; परंतु आयकर रकमेची मोजणी करण्यासाठी जीएसटी कर समाविष्ट करणे हे कायदेशीररीत्या योग्य आहे; परंतु तसे व्यावहारिक कारणांवर मोठा प्रश्न आहे. ज्यास आयकर विभागाने लवकरात लवकर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. कारण जीएसटीवर आयकर लागत आहे टीसीएसद्वारे़अर्जुन : कृष्णा, जीएसटी काढण्यासाठी बिलात लावलेल्या टीसीएसच्या रकमेचा समावेश केला जाईल का?कृष्ण : अर्जुना, जीएसटी करदेयतेची मोजणी करण्यासाठी आयकर कायद्यातील टीसीएस रक्कम विक्रीच्या रकमेमध्ये समाविष्ट केली जाणार नाही. जीएसटी विभागाने हे स्पष्ट केले आहे़ (परिपत्रक क्रमांक ७६/५०/२०१८ जीएसटी दि़ ०७ मार्च २०१९)१़ उदा. जर ‘अ’ची वस्तू विक्री किंमत रु. २० लाख आहे, तर जीएसटी २८ टक्के असेल तर फक्त २० लाखांवर मोजण्यात येईल, जे होते ५.६ लाख रुपये़ अशाप्रकारे आयकरअंतर्गत टीसीएस हे जीएसटीचा भाग होणार नाही. जीएसटी विभागाचे हे स्पष्टीकरण आहे़ राज्यांतर्गत शाखा व्यवहारांवर टीसीएस नाही लागत; परंतु जीएसटी लागतो असे बरेच अडथळे रिकन्सिलेशन करताना येतील़ तसेच स्पष्टीकरण आयकर विभागाने देणे गरजेचे आहे़अर्जुन : कृष्णा, या मागचा उद्देश काय आहे?कृष्ण : अर्जुना, टीसीएस तरतुदींचा उद्देश व करदात्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. विक्रीची माहिती गोळा करणे किंवा आयकर आधी जमा करण्याचा आयकर विभागाचा हेतू काय आहे? जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे, ई-वे बिल पोर्टल, जीएसटीएन प्!ा विक्रीची सर्व माहिती असून, जीएसटी आणि प्राप्तिकर विभाग दोन्हीकडे उपलब्ध आहेत़ मग सर्व वस्तूच्या विक्रीवर असे टीसीएस का? ई-इनव्हासिंग १ आॅक्टोबर २०२० पासून येत आहे, ज्यामुळे वस्तूंच्या विक्रीवरील मजबूत माहिती सरकाराकडे असेल, तर अशा व्यवहारांवर आयकर अंतर्गत पुढील टीसीएस कशासाठी?जर सर्व बी २ बी आणि बी २ सी व्यवहार जीएसटीमध्ये समाविष्ट आहे, तर बी २ सी व्यवहार म्हणजेच कर चुकवणारे किंवा नवीन करदाते टीसीएसव्दारे पकडणे खूपच कठीण होणार आहे. कारण ५० लाखांच्या वर टीसीएस आहे़ त्यामुळे छोटे मासे कसे आयकराच्या जाळ्यात येतील?अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची तरतूद आहे, मग आगाऊ आयकर वसूल करण्यासाठी सर्व प्रकारच्या वस्तूंवर टीडीएस घेण्याची अजिबात गरज काय?संगणकच्या युगात अशी तरतूद शासनाने आणली आहे, बॅँक, जीएसटी, ई-वे बिल, एआयआर, टीडीएस इ़ द्वारे करदात्याच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती शासन घेऊ शकते मग अशा जाचक तरतुदीचे काय काम ?अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, करदात्यांना पालन करण्यासाठी ही एक अत्यंत अवघड तरतूद आहे़ त्यासंबंधीचा अप टू डेट रेकॉर्ड ठेवणे़, टीसीएस किती आयकर वसूल करेल आणि त्यासाठी किती डोकेदुखी होईल हा वादाचा मुद्दा आहे़ हे ईज आॅफ डुइंग बिजनेसच्या विरुद्ध आहे असे वाटते़.. ‘चार आणे की मुर्गी और बारा आणेका मसाला’ 

टॅग्स :GSTजीएसटी