शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मसापचे आश्वासक परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:33 IST

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही

- विजय बाविस्करमहाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही. ही मंडळी केवळ सभागृहाचे नूतनीकरण किंवा इमारतीला बाहेरून रंगकाम करून थांबली नाहीत. परिषद आतून-बाहेरून बदलावी यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, ते अभिनंदनास पात्र ठरावेत.कार्यक्रमांचे बदललेले रूप, मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवयित्री, एक कवी, लेखक तुमच्या भेटीला यासारखे सुरू झालेले नवे उपक्रम, त्यामुळे लोकांचा वाढलेला राबता, साहित्यविषयक काम करणाºया संस्थांना बरोबर घेऊन जाण्याची दाखविलेली तयारी, साहित्यातील सर्व प्रवाहांसाठी असलेली स्वागतशील भूमिका यामुळे परिषदेविषयी पूर्वी सर्वसामान्यांना वाटणारी तिरस्काराची भावना आणि हितचिंतकांना तिथे जाताना येणारे दडपण आता अनुभवायला येत नाही, अशी चर्चा साहित्यिक आणि साहित्यरसिक करतात तेव्हा परिषद योग्य मार्गाने चालली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .विद्यमान पदाधिकाºयांनी परिषदेचे पुणे शहर परिसरापुरते मर्यादित असलेले काम ग्रामीण भागापर्यंत पोहचवून ग्रामीण भागातील वाङ्मयीन कार्यकर्ते आणि साहित्यिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले. संमेलनापर्यंत रसिकांना पोहचणे शक्य नसेल तर रसिकांपर्यंत संमेलनांनी पोहचले पाहिजे, या भूमिकेतून साहित्य परिषदेने अजनुज (ता. खंडाळा जि. सातारा ) येथे घेतलेले परिषदेच्या इतिहासातले पहिले शिवार साहित्य संमेलन लक्षणीय ठरले.न्या. रानडे यांनी पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे महात्मा फुले यांना निमंत्रण पाठविले होते, ते त्यांनी नाकारताना या संमेलनात शेतकरी, शेतमजुरांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अपेक्षेची पूर्तता १११ वर्षांनंतर होताना दिसते आहे, हे शुभचिन्ह आहे. कारण याच शिवारातल्या माणसांनी मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम ग्रामीण भागात घेण्याचा परिषदेचा निर्णयही स्वागतार्ह आहे. आजच्या बालकुमारांची साहित्याशी असलेली नाळ तुटत चालली आहे. जिल्हावार एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. पदाधिकाºयांनी अल्पावधीतच लोणावळ्यात धुंवाधार पाऊस असतानाही मनशक्ती केंद्राच्या सहकार्याने अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली जे बालकुमार साहित्य संमेलन घेतले, ते कमालीचे यशस्वी झाले. अंदरमावळातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. आता परिषदेने ग्रंथालयाचा कायापालट करण्याची गरज आहे. दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत. समृद्ध परंपरा असलेल्या म. सा. पत्रिका या मुखपत्राकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. ही पत्रिका त्याच त्या लेखकांना सतत लिहिण्याची संधी देते किंवा त्याच त्या लेखकांवर पुन्हा पुन्हा लिहून येते, अशी चर्चा साहित्य वर्तुळात आहे. संपादकांनी कल्पकता दाखवून पत्रिकेचे संदर्भमूल्य कसे वाढेल, याकडे लक्ष द्यावे. परिषदेच्या तरुण नेतृत्वाची कार्यतत्परता, उत्साह भविष्यातही टिकायला हवा.

टॅग्स :Puneपुणे