सचिनने आत्मचरित्रत ग्रेग चॅपल यांच्या 2क्क्5-2क्क्7 मधील कारकिर्दीवर आसूड ओढले. या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाने भारतातील प्रशिक्षणाची सूत्रे हाती घेण्याआधी, सुनील गावसकर यांच्या नजरेतून त्यांच्याकडे कटाक्ष टाकू या, बघू या.
एका सेमिनारमध्ये चॅपल यांचे सादरीकरण प्रभावी होतं, या ऐकीव माहितीच्या आधारावर गावसकर लिहितात (जाता जाता सांगावंसं वाटतं की गावसकर किती तोलून-मापून लिहू शकतात व माहिती ऐकीव असल्याचा सावध उल्लेख करतात!) मुख्यत: ज्युनिअर खेळाडूंना शिकवणा:या प्रशिक्षकांशी ग्रेग चॅपल बोलत होते. युवा खेळाडूंच्या तंत्रत सुधारणा वा बदल करण्यास थोडा अधिक वाव असतो. पण अठरा वर्षावरील खेळाडूस फलंदाजीत वा गोलंदाजीत तांत्रिक फेरबदल करणो जवळपास अशक्यप्राय असतं! पण युवा खेळाडूंना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात ग्रेग चॅपल वा जेफ बॉयकॉट अमूल्य ठरतील.
ग्रेग यांना सुसंवाद साधता आला नाही तो वयाच्या तिशीतील भारतीय सुपरस्टार्सशी, तारे-सितारे यांच्याशी. त्याबाबतचा संभाव्य धोका दुरान्वयाने सूचित केला होता सुनील गावसकर यांच्या स्तंभलेखनानं वा ग्रंथानं!
ग्रेग कडक, तर त्यांच्या आधीचे प्रशिक्षक व न्यूझीलंडचे माजी संघनायक जॉन राईट मनमिळाऊ, पण सौम्य. तरी त्यांची कारकिर्द कोणत्या प्रकारे संपुष्टात आली?
बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनी आत्मचरित्रत त्याबाबत केलेली नोंद बघा, ‘जॉन राईट यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने कांगारूंना भारतात व पाकला पाकमध्ये नमवले. तसेच 2क्क्3 च्या विश्वचषकात अंतिम फेरीर्पयत धडक मारली. पण त्यांच्या कारकिर्दीचा समारोप काही सुखद वातावरणात झाला नाही. भारतीय संघातील बेशिस्तीचा कहर माजवला होता. दोन-तीन बुजुर्ग खेळाडूंनी राईट यांना चक्क धक्काबुक्की केली होती!
सचिनप्रमाणो भारतीय क्रिकेटचं सत्यचित्र सुनील व लेले हेही आपापल्या परीने उलगडून दाखवत आहेत.