शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

विद्यार्थ्यांहून सरकार ठरले ‘ढ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:46 IST

विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी शासनाकडून मोठ्या मनाने नियम केले जातात, पण त्याचा अंमल अभ्यासपूर्वक होतो की नाही याकडे कोण लक्ष देणार?

- अजित गोगटेकोणताही कायदा किंवा नियमाची अंमलबजावणी पश्चातलक्षी परिणामाने मानली जाते. मात्र जेव्हा एखाद्या जुन्या कायद्याच्या किंवा नियमाच्या बदल्यात पूर्णपणे नवा कायदा किंवा नवा नियम केला जातो तेव्हा मात्र वरील सर्वमान्य गृहितकास अपवाद ठरतो. याचे कारण जुन्या नियमाचे अस्तित्व संपुष्टात येते आणि नवा नियम लागू होतो. वरकरणी हा फरक लहान वाटत असला तरी त्याचा परिणाम मूलगामी होतो. खास करून शिक्षणाच्या क्षेत्रात तर विद्यार्थ्यांचे मोठे ेनुकसान होऊ शकते. राज्यातील विविध दंतवैद्यक महाविद्यालयांमध्ये ‘बीडीएस’चे शिक्षण घेत असलेल्या पाच विद्यार्थ्यांना याचाच जाचक अनुभव आला. डेंटल कौन्सिल आॅफ इंडिया आणि केंद्र सरकारने चुकीचा अर्र्थ लावल्याने या पाचही विद्यार्थ्यांना ‘बीडीएस’चे शिक्षण सोडून घरी बसण्याची पाळी येणार होती. परंतु उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्याय दिल्याने आता त्यांना बीडीएस पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांची उसंत मिळाली आहे.संजीवनी मोहन राठोड (पुसद, यवतमाळ), योगेश अनिरुद्ध धरपडे (दत्तनगर, परभणी), प्रियंका अशोक पाटील (मेहकर, बुलढाणा) , प्राजक्ता प्रभू सुरवसे (औंधा नागनाथ, हिंगोली) आणि भक्ती मनोजकुमार गग्गड (पूर्णा, परभणी) या विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी विविध दंतमहाविद्यालयांमध्ये बीडीएसला प्रवेश घेतला. त्यावेळी असा नियम होता की, प्रथम वर्ष बीडीएसचे सर्व विषय तीन वर्षांत ‘क्लिअर’ केले नाहीत तर विद्यार्थ्यास अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवता येणार नाही. हे पाचही विद्यार्थी बºयापैकी ‘ढ’ असल्याने सन २०१४ ते २०१७ या तीन शैक्षणिक वर्षांत त्यांना प्रथम वर्ष बीडीएसच्या एकाही विषयात उत्तीर्ण होता आले नाही. दरम्यान, २७ एप्रिल २०१५ पासून डेंटल कौन्सिलने नवा नियम केला आणि तीनऐवजी नऊ वर्षांचा कालावधी ठरविला. परंतु या पाच विद्यार्थ्यांची तीन वर्षांची मुदत आधीच संपली असल्याने नोव्हेंबर २०१७ च्या परीक्षेस त्यांना बसू दिले गेले नाही. मात्र प्रस्तुत प्रकरणात जुन्याच्या बदल्यात पूर्णपणे नवा नियम लागू केला गेला आहे त्यामुळे त्या नियमाच्या तारखेला शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तो लागू होतो, असा निकाल देऊन उच्च न्यायालयाने या पाचही विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा दिलासा दिला.याआधी पशुवैद्यक पदवी अभ्यासक्रमाच्या बाबतीत नवा नियम करून १० वर्षांची मुदत ठरविली गेली तेव्हाही व्हेटर्नरी कौन्सिल व केंद्र सरकारने असाच घोळ घातला होता. थोडक्यात, ‘ढ’ विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी मोठ्या मनाने नियम केले जातात, पण त्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी हे त्याहूनही अधिक ‘ढ’ असावेत, असे दिसते.

टॅग्स :Courtन्यायालयStudentविद्यार्थीGovernmentसरकार