ललहाणपणी आपल्याला अॅनिमेशनपट आणि परिकथा आवडतात.. तरुण वयात आवडी बदलतात. रोमँटिक कथा किंवा मारधाडपट आवडू लागतात. पुढे उतारवयात पौराणिक कथांमध्ये स्वारस्य निर्माण होते. पण वय कोणतेही असो कथा सर्वानाच आवडतात.
आत्मचरित्र वाचणो मला नेहमी आवडते. त्यातही ते क्रीडापटूंचे असेल तर बातच निराळी! त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतार जाणून घेता येतो. माङया दृष्टीने आत्मचरित्र ही निर्भेळ, अस्सल माहितीचे असायला हवे. लेखनाने वाचकाच्या कल्पनांवर ताबा मिळवायला हवा. पुढच्या पानात काय दडलंय, याची उत्सुकता निर्माण व्हायला हवी. आयुष्याची ही गोष्ट अशा प्रकारे सांगितली गेली पाहिजे, की वाचकाला एखादा चित्रपट पाहिल्याची अनुभूती येईल. अशाच एखाद्या पुस्तकाला मी आत्मचरित्र मानतो. एखादे आत्मचरित्र अनेकांसाठी प्रेरणास्नेत ठरू शकते, आयुष्य बदलवून टाकू शकते. त्या लेखकाचा जो पेशा किंवा व्यवसाय आहे, त्याच्या विकासाला हातभार लावू शकते. मी वाचलेले सवरेत्तम आत्मचरित्र म्हणजे आंद्रे आगासीचे ‘ओपन’. तो त्याच्या अनेक कृत्यांविषयी अतिशय प्रमाणिक असल्याचे दिसते. त्या आत्मचरित्रचा माङयावर खूपच प्रभाव पडला.
काही आत्मचरित्रे ही हलक्याफुलक्या किंवा विनोदी शैलीत मांडलेली दिसतात. उदाहरणार्थ जॉन राईटचे ‘ािसमस इन राराटाँगा’. हे आत्मचरित्र त्याने त्याच्या थाय पॅडला समर्पित केले आहे. हे काहीसे विनोदी आणि अजब वाटते. एखादा खेळाडू त्याच्या आयुष्यात कोणत्या आव्हानांचा सामना करतो, हे जाणून घेणो लोकांना आवडते. तो ज्या उंचीवर पोहोचला आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी कोणकोणत्या गोष्टींचा त्याग केला, हे विसरून चालण्यासारखे नसते. हे सगळे प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडून जाणून घेण्याचे कुतूहल सर्वानाच असते. त्यातून कदाचित अगदी वेगळी माहिती पुढे येऊ शकते.
(लेखक मुंबई रणजी संघाचा माजी कर्णधार आणि हॉलंड संघाचा फलंदाज प्रशिक्षक आह़े)
आत्मचरित्रवर बेतलेला मी पाहिलेला शेवटचा उत्तम चित्रपट म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’. एका सजर्नशील दिग्दर्शकाने साकारलेली ती महान कलाकृती होती. त्यात मूळ कथासूत्रशी वा कथा मांडण्याच्या उद्देशाशी कुठेही तडजोड केलेली नव्हती. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा तो चित्रपट होता. वेगवान युगात सगळ्य़ांना सगळे इन्स्टंट हवे असत़े मोबाइल फोन हेच सर्वस्व असत़े त्यातही खिळवून ठेवणा:या उत्तम कथेसाठी प्रत्येकाकडे वेळ आहे. अजूनही आपल्याकडे चहाच्या कपाबरोबर वृत्तपत्रे, पुस्तके वाचण्यासाठी वेळ आहे.
- अमोल मुझुमदार