शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टार्ट अप’च्या शर्यतीत छोटी शहरे आघाडीवर, वार्षिक ३५ टक्के वाढ, महानगरांना टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:55 IST

नव्याने उद्योग सुरू करण्याच्या शर्यतीत देशातील द्वितीय श्रेणी शहरांनी बाजी मारली आहे. वार्षिक ३५ टक्के वाढीसह या शहरांनी महानगरांना मागे टाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नव्याने उद्योग सुरू करण्याच्या शर्यतीत देशातील द्वितीय श्रेणी शहरांनी बाजी मारली आहे. वार्षिक ३५ टक्के वाढीसह या शहरांनी महानगरांना मागे टाकले आहे.सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना नॅसकॉम आणि झिनोव्हा यांनी अलीकडेच देशातील स्टार्ट अप्सचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये देशातील स्टार्ट अप्समध्ये द्वितीय व तृतीय शहरांनी आघाडी घेतल्याचे समोर आले.देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या तरुणांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने स्टँड अप, स्टार्ट अप, मुद्रा यासारख्या योजना आणल्या आहेत. यापैकी स्टार्ट अप योजनेला तरुणांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. मात्र, छोट्या शहरांमधील उद्योजक यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.स्टार्ट अप्सना उद्योजकता वाढीसाठी सहकार्य करण्यात भारतीय उद्योजकता विकास संस्था कार्यरत आहे. त्याचे संचालक डॉ. सुनील शुक्ला यांनी यासंबंधी सांगितले की, भारतीय इंक्युबेटर हे भागीदारी स्वरूपात अथवा विशिष्ट क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक इंक्युबेटर हे प्रामुख्याने खासगी क्षेत्रात आहेत. द्वितीय श्रेणी शहरे आधीपासून शैक्षणिक हब राहिल्याने, अशा द्वितीय श्रेणी शहरांमध्येच हे स्टार्ट अप्स मोठ्या प्रमाणात उभे राहात आहेत. हे एक अत्यंत सकारात्मक चित्र आहे.नेमका काय आहे सर्व्हे ?नॅसकॉम-झिनोव्हाच्या सर्व्हेनुसार, देशातील सर्वाधिक स्टार्ट अप निमशहरी भागात आहे. एकूण स्टार्ट अपपैकी असे २० टक्के नवोदित उद्योग हे द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये आहेत. स्टार्ट अपसोबतच इंक्युबेटर व अ‍ॅक्सिलेटर अशा उद्योगांच्या दोन नवीन श्रेणीदेखील भारतात झपाट्याने उभ्या होत आहेत. एखाद्या मोठ्या उद्योगाच्या सहकार्याने छोटा उद्योग सुरू करण्याचा समावेश या श्रेणीत केला जातो.असे ४० टक्के उद्योग आज प्रथम वर्ग व महानगरांपेक्षा द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये आहेत. अहमदाबाद, पुणे, नागपूर, जयपूर, लखनऊ, चंदिगड यांचा त्यात समावेश आहे. असे देशात सध्या १९० सक्रीय उद्योग असून, त्यापैकी ९० हे शैक्षणिक क्षेत्रातील आहेत. उर्वरित उद्योग कॉर्पोरेट, सरकार पुरस्कृत अथवा खासगी आहेत.

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था