शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

संघशिस्तीची लिटमस टेस्ट

By admin | Updated: December 22, 2015 02:17 IST

भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्तीची नवी व्याख्या तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील बौद्धिक वर्गात गैरहजर राहिलेल्या भाजपाच्या २२ आमदारांना परवा शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली.

भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्तीची नवी व्याख्या तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील बौद्धिक वर्गात गैरहजर राहिलेल्या भाजपाच्या २२ आमदारांना परवा शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली. तिच्यामुळे हे आमदार हादरले आहेत. साधनशुचिता मानणाऱ्या भाजपाची पक्षशिस्तीची व्याख्या पूर्वी थोडी वेगळी होती. चारित्र्यसंपन्नता, निर्व्यसन, राष्ट्रभक्ती ही मूल्ये पक्षशिस्तीत गणली जायची. सत्तेत आल्यानंतर मात्र पक्षशिस्तीचे नवे मापदंड आकारात आले. भाजपाचा नेता-कार्यकर्ता चारित्र्यसंपन्न व निर्व्यसनी असावा हा आग्रह आता राहिलेला नाही. त्याच्या राष्ट्रभक्तीचा पुरावाही कुणी मागत नाही. भाजपाची संघ पुरस्कृत संस्कृतीरक्षणाची मूल्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वाहत गेली. सत्तेत येण्यासाठी भाजपाने संघाच्या मूल्यांना जाणीवपूर्वक मूठमाती देत सत्तेच्या सोयीची नवी व्याख्या निर्माण केली. संघाला आता ती बदलवायची आहे आणि त्यातूनच स्वत:ची पक्षावरील पकड आणखी घट्ट करायची आहे. बौद्धिक वर्गाला गैरहजर राहिल्याचे निमित्त साधून भाजपाच्या २२ आमदारांना मिळालेली ‘पक्षशिस्तभंगाची’ नोटीस हा त्याचाच एक भाग आहे. भाजपात असलेल्या पण संघाच्या असहिष्णू सावलीपासून दूर राहू पाहणाऱ्या मंत्री-आमदारांना दिलेला तो इशाराही आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या पक्षावरील वर्चस्व कधी नव्हे तेवढे वाढलेले आहे. मंत्री-आमदारांचा स्वीय सचिव कोण असावा हेदेखील संघच ठरवितो. संघ पदाधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी भाजपा आमदारांना कसोशीने घ्यावी लागते. परवा संघाच्या बौद्धिक वर्गात भाजपाचे १३९ पैकी ११७ आमदार हजर होते. उर्वरित २२ आमदारांना या वर्गाचे महत्त्व कळले नसावे. कित्येकदा पक्षाच्या बैठकांना आमदार उपस्थित राहात नाहीत. पण त्यांना कधी शिस्तभंगाची नोटीस दिली जात नाही. भाजपाच्या मंत्री-आमदारांसाठी सर्वात अपमानास्पद बाब म्हणजे या बौद्धिक वर्गात उपस्थितांची हजेरी घेण्यात आली. यातून संघाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? भाजपाच्या मंत्री-आमदारांमध्ये आपल्याबद्दल भय आणि दहशत निर्माण व्हावी यासाठी संघ अधूनमधून अशा ‘लिटमस टेस्ट’ करीत असतो. संघाच्या बौद्धिक वर्गाला गैरहजर राहणे हा पक्षशिस्तभंग होत असेल, तर भाजपा लोकप्रतिनिधींच्या इतर गंभीर चुका मग फारच क्षम्य आणि सौम्य ठरतात. यातील विनोद असा की, ज्यांच्या सहीने ही नोटीस काढण्यात आली ते पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित हे अलीकडच्या काळातील शिस्तभंगाचे ‘मेरूमणी’ आहेत. हेच पुरोहित आपल्याच नेत्यांबद्दल गरळ ओकत असल्याचे काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यांत बंद झाले होते. भाजपाचे एक मंत्री कंबरेला पिस्तूल लावून मतिमंद मुलांच्या शाळेत जातात. पण या ‘पिस्तुल्या’ मंत्र्याला नोटीस देण्याचे आदेश संघाने दिल्याचे ऐकिवात नाही. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याला या वयातही ‘हिरव्या देठा’चे आकर्षण असते आणि ते तसे जाहीरपणे मोकळेही होतात. त्यावेळी संघ त्यांना खडसावत नाही. पूर्व विदर्भातील एक आमदार सार्वजनिक कार्यक्रमात दारू पिऊन असतात पण या दारुबाज आमदाराच्या मर्कटलीलांना वेसण घालण्याची हिंमत संघ कधीही दाखवत नाही. संघाच्या बौद्धिकाला दांडी मारणाऱ्यांना दिलेली नोटीस हे संघाने शोधलेले एक निमित्त आहे. या आडून संघाला भाजपा आमदारांचे कान पिळायचे आहेत. संघाच्या विजयादशमी सोहळ्यासाठी नागपुरातील सर्व भाजपा आमदारांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. सोहळ्याच्या आदल्या दिवशी संघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ आमदारांकडे खाकी चड्डी, पांढरा शर्ट, काळी टोपी, काठी, मोजे घेऊन गेले होते. विजयादशमी सोहळ्यात या गणवेशात तुम्हाला यायचे आहे, असा संघश्रेष्ठींचा निरोप असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र काहींनी गणवेशाची सक्ती झिडकारून लावली. हा अपमान संघ पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला. त्याचाच हा प्रतिशोध म्हणायचा. पण प्रतिशोधाची ही मालिका पुढेही सुरूच राहणार आहे. भाजपा आणि संघ यांच्यातील हे नवे द्वंद्व आहे.- गजानन जानभोर