शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म - क्षणोक्षणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:25 IST

पाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो.

-  डॉ. गोविंद काळेपाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो. काल मात्र चिमण्यांच्या चिवचिवटापेक्षा कावळ्यांची काव काव अधिक तीव्रपणे ऐकायला येत होती. १०-२० कावळे एका ठिकाणी दिसत होते. काही चोचा मारत होते तर काही उडून पुन्हा पुन्हा येत होते. माझ्या काठीच्या आवाजाने कावळे पळाले. पाहतो तर काय? गतप्राण झालेले चिमणीचे पिलू. बाजूची माती काढून लहानसा खळगा तयार केला. पिलाला पुरले. वरती एक दगड ठेवला आणि रस्त्याला लागलो. रे.ना.वा. टिळकांची कविता आठवली ‘क्षणोक्षणी पडे उठे परि बळे’‘क्षणोक्षणी’ शब्दाने मला जागे केले. फुकट गेलेल्या क्षणांचा हिशेब मांडू लागलो तेव्हा लक्षात आले- सारे आयुष्यच फुकट गेले. प्रत्येक क्षण मातिमोलच झाला. ही निराशा नव्हे; पण खरेच, सांगावे असे काय आहे आपुल्या आयुष्यात. ‘क्षणत्यागे कुतो विद्या?’ डिग्री म्हणजे विद्या नव्हे याचा साक्षात्कार झाला. माणसाचा जन्म मिळूनही जिणे मात्र कवडीमोलाचे आपण जगतो. जीवनाचा अर्थ कळत नाही. तरुण वयात गीता, भागवत हातात घेण्याची बुद्धी झाली नाही. आता भागवत रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ‘सोन्यापेक्षाही क्षण अधिक मूल्यवान समजेल तो साधू. ज्याला वेळेची किंमत नसते त्याला अंतकाळी खूप पश्चात्ताप होतो.’ एका मेलेल्या चिमणीच्या पिलाने मला स्वप्नातून जागे केले होते. मानवी जीवनातील क्षणाचे महत्त्व कळून आले. सावंतांचा पांडुरंग सांगत नव्हता का, बोलता बोलता त्याच्या बाबांनी क्षणात प्राण सोडले. ना आजारपण ना डॉक्टर. क्षणार्धात खेळ खलास. हा क्षण जीवनाच्या अनेक कंगोºयांचे दर्शन घडवितो. तोच तर साक्षीभूत होऊन राहतो. क्षणाचे महत्त्व ओळखता आले पाहिजे. ‘‘क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणाचा’’ प्रेमाचा एक क्षण अनुभवण्यासाठी मरणाचा वर्षाव पत्करणा-या त्या प्रेमिकालाही क्षणाचे महत्त्व जाणवते हे विशेष. संत तुकोबांनी क्षणाची महती सांगून सर्वांनाच सावधान केले आहे.क्षणाक्षणा हाचि करावा विचारतरावया पार भवसिंधुनाशिवंत देव जाणार सकळआयुष्य खातो काळ सावधानक्षणाक्षणाचा विचार म्हणजेचतर अध्यात्म.

टॅग्स :Natureनिसर्ग