शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म -हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:58 IST

जगात दिशाहीन माणसं किती आहेत? भरपूर. प्रत्येकाला वाटतं माझी दिशा बरोबर. अगदी लहानपणापासून हे दिशाप्रकरण प्रत्येकाची डोकेदुखीच असते. सध्या तर चांगली दिशा मिळणं म्हणजे शिक्षणाची हवी ती शाखा मिळणं हेच आहे.

- किशोर पाठकजगात दिशाहीन माणसं किती आहेत? भरपूर. प्रत्येकाला वाटतं माझी दिशा बरोबर. अगदी लहानपणापासून हे दिशाप्रकरण प्रत्येकाची डोकेदुखीच असते. सध्या तर चांगली दिशा मिळणं म्हणजे शिक्षणाची हवी ती शाखा मिळणं हेच आहे. माझ्या मुलाला इंजिनिअर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय पण त्याला हवी ती ब्रँच मिळालीच नाही किंवा मिळाली ह्यातच आपलं सुख-दु:ख सामावलं आहे. त्याहीपेक्षा एखाद्याचं पूर्वायुष्य खूपच सरळ, संथ, नेमाने चालू असतं. पुढे असा एखादा धक्का बसतो, वळण येतं की, जगण्याची दिशाच बदलते.एखादी शाळेत जाणारी मुलगी प्रचंड उलथापालथ होऊन शरीरविक्रय करू लागते. एखादा चांगला नोकरी असलेला माणूस धंद्याचे डोहाळे लागून रस्त्यावर येतो. भोंगळा होतो. एखादा घरदार साºयांपासून वंचित होतो. एखाद्याला नवीन आईबाबा भेटून तो परदेशात मजा मारतो.एखाद्याला आईच्या रूपात बाई भेटते, एखाद्याला असलेली आई गमवावी लागते. हे गमवणं फार वाईट. माणसाला मिळालेल्यापेक्षा गमवणं फार लागतं. म्हणूनच आयुष्यात किती माणसं जोडली ह्यापेक्षा किती गमावली हा हिशेब महत्त्वाचा असतो.संपूर्ण आयुष्यात किमान दोन चार वेळा हा हिशेब करावाच लागतो. प्रथम शिक्षण मग नोकरी व्यवसाय मग लग्न, मुलं, प्रतिष्ठा, स्टेटस हे सगळं बघता बघता सांभाळतांनाच म्हातारपण येतं आणि कळतं की आत्ता काय कमावलं आणि काय गमावलं. काहींना हा हिशेब करणं आवडत नाही. मिळालं ते आपलं, गेलं ते गेलं ह्या वृत्तीने माणसं राहतात. त्यांना देण्याघेण्याचे प्रश्न पडत नाहीत. पण पडतात तेव्हा ते मुळातून उखडतात किंवा ताठ उभे राहतात. माणसांच्या ह्या विविध रूपांना पाहताना मन थक्क होतं.अगदी एकाच वेळेस जन्माला आलेल्या मुलांची कुंडली, भविष्य वेगळंच असतं. ते कसं काय? आपण प्रश्न विचारायचे, उत्तरे शोधायची आणि ह्या जाळ्यात भिरभिरत राहायचं. कारण माणूस एक भुईचक्र आहे, ते जमिनीवरच घिरट्या घालत राहतं. ते विमानही आहे जे वर जाऊन राख होऊन खाली पडतं. हा हिशेब कठीण आहे. म्हणूनच नकळत केलेला आणि झालेला हिशेब फलदायी!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र