शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूबर्स, इन्फ्लूएन्सर्सना ‘भरपूर’ पैसे मिळतात; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 05:18 IST

यूट्यूबर, इन्फ्लूएन्सर म्हणून करिअर करावं असं अनेक तरुणांना वाटतं, त्यातून पैसे मिळतात; पण किती, केव्हा? कष्ट, मेहनतीला कुठेच पर्याय नाही..

मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासक, संस्थापक - सायबर मैत्र

आजकाल अनेक तरुणांचं इन्फ्लूएन्सर्स बनण्याचं स्वप्न असतं. त्यातल्या काही तरुणांना यूट्यूबर्स व्हायचं असतं तर काही जणांना डिजिटल कंटेन्ट क्रिएटर्स बनून करिअर उभं करायचं असतं. या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत का? - तर मुळीच नाही! पण, त्याचबरोबर उत्साहात सुरू केलेले यूट्यूब चॅनल्स आणि पॉडकास्ट बंद पडण्याचं प्रमाणही जगभर प्रचंड आहे. डिजिटल स्पेसमध्ये कंटेन्ट क्रिएट करणाऱ्या प्रत्येकाचं करिअर होऊ शकतं असा जर समज असेल तर चॅनल्स, पॉडकास्ट बंद का पडतात? किंवा सुरुवातीचा उत्साह टिकत का नाही?

डिजिटल २०२४ ग्लोबल ओव्हरव्यू रिपोर्टनुसार जगभर ५.०४ अब्ज लोक यूट्यूब बघतात. जगात यूट्यूब बघणारे सर्वाधिक प्रेक्षक भारतात आहेत. सगळ्यात मोठा प्रेक्षक वर्ग २५ ते ३४ वयोगटातला आहे. डिजिटल माध्यमांत कंटेन्ट क्रिएटर बनून प्रसिद्धी आणि विनाकष्ट सहज पैसा कमावणं अगदी सोपं आहे असा अनेकांचा समज आहे; पण, इथेही विनाकष्ट पैसा मिळत नाही हे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक १००० व्ह्यूजला यूट्यूब अंदाजे ५३.४६ रुपये देतं. म्हणजे प्रत्येकालाच ५३ रुपये मिळतील असं नाही. आपलं चॅनल किती लोक बघताहेत, त्यावर जाहिराती कुठल्या ब्रँड्सच्या येतात, प्रेक्षकवर्ग कोण आहे.. या सगळ्यावर १००० व्ह्यूजमागे किती रुपये मिळतील हे ठरतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा.. पैसे मिळविण्यासाठी म्हणजे यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्रॅममध्ये मान्यता मिळण्यासाठी १००० सबस्क्राइबर्सचा टप्पा पार व्हावा लागतो, ४००० पब्लिक व्ह्यूज मिळवावे लागतात. त्यानंतर यूट्यूबवरून पैसे मिळायला सुरुवात होते. चॅनल काढला आहे, एखाद-दोन शॉट्स टाकले आहेत, त्यांना भरपूर व्ह्यूज मिळाले म्हणजे लगेच पैसे मिळतील असे नसते. ही सगळी गणितं यूट्यूबर म्हणून करिअर सुरू करण्याआधी माहीत असली पाहिजेत. एक आकडेवारी असं सांगते की, फक्त १० टक्के यूट्यूब चॅनल्स यशस्वी होतात. म्हणजे त्यातून क्रिएटरना पैसे मिळतात. बाकीचे चॅनल्स यशस्वी होत नाहीत; कारण यूट्यूबकडे किंवा डिजिटल कंटेन्ट क्रिएशनकडे झटपट पैसे कमावण्याचं आणि प्रसिद्ध होण्याचं माध्यम म्हणून बघितलं जातं. त्याचं व्यावसायिक गणित आणि माध्यम समजून घेऊन डिजिटल कंटेन्ट क्रिएटर म्हणून प्रयत्न करणं हे अनेकांच्या बाबतीत होताना दिसत नाही.

हातात मोबाइल आहे, त्यात इंटरनेट आहे, अनेक फिल्टर्स आणि एडिटिंग टूल्स सहज उपलब्ध आहेत म्हणून आपणही कंटेन्ट क्रिएटर व्हावं, यूट्यूबर व्हावं असं वाटूच शकतं. डिजिटल कंटेन्ट क्रिएटर म्हणून करिअर करायचं असेल तर मग त्यात यूट्यूब चॅनल्स आले, पॉडकास्ट आले, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स आले.. या सगळ्यासाठी काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे.

हा बिनभांडवली धंदा नाही. इथेही पैशांची गुंतवणूक करावी लागते. मग ती शूटिंग, एडिटिंगसाठी असेल नाहीतर, आपल्या चॅनलची जाहिरात करण्यासाठी असेल किंवा चॅनलच्या निमित्ताने प्रवास असेल. पैसे लागतात हे लक्षात घेतलं पाहिजे. सातत्य हा डिजिटल स्पेसमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. सातत्याने कंटेन्ट तयार झाला पाहिजे. अपलोड झाला पाहिजे. कंटेन्ट रंजक, वेगळा असेल, मांडणी अनोखी असेल तर चॅनल बघितला जातो.

यूट्यूब हा महासागर आहे, इथे प्रत्येक विषयावर हजारो चॅनल्स निरनिराळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. अशावेळी आपला चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हे मोठं चॅलेंज आहे. आज चॅनल चालू केला आणि उद्या पैसे मिळाले असं होत नाही. पेशन्स ठेवून सतत उत्तम काम करीत राहावं लागतं. तरच पैसे मिळतात, नाही तर नाही.

गृहपाठ न करता, प्री-प्रॉडक्शनवर लक्ष न देता काम करणाऱ्यांचे चॅनल्स टिकत नाहीत. त्यामुळे कष्टाला, अभ्यासाला, गृहपाठाला इथेही पर्याय नाही. 

टॅग्स :YouTubeयु ट्यूब