शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

विशेष लेख: कर्नाटकातल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये कोण अडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 08:08 IST

Honey Trap' in Karnataka News: हनी ट्रॅपच्या भानगडी, सनसनीखेज व्हिडीओ, गुप्त फोटो / चित्रे / मजकुराने भरलेले पेन ड्राइव्ह या गोष्टी कर्नाटकला काही नवीन नाहीत. त्यात भर पडली, इतकेच!

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)कर्नाटकने सध्या अवघ्या देशाला गोंधळात टाकले आहे. सहकार खात्याचे मंत्री के. एन. राजण्णा यांनी  केंद्रीय नेत्यांसह (एक मंत्रीसुद्धा) ४८ पुढारी हनी ट्रॅपमध्ये सापडल्याचे जाहीर केले. त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही; पण त्यांच्या दाव्याने सगळे गदळ जणू बाहेर आले. आपल्यावरही या हनी ट्रॅपचा कसा प्रयोग झाला याचे रसभरीत वर्णन मंत्रिमहोदयांनी केले. वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर एक वकील दोनदा आपल्या घरी आले होते, असे ते सांगतात; पण बाकी त्यांना काही आठवत नाही. त्यांच्या घरी सीसीटीव्हीचे फुटेज नाही. तरीही कोणताच  पुरावा नसताना ते एका केंद्रीय मंत्र्यासह ४८ जणांवर हा प्रयोग झाला असा दावा मात्र ठोकत आहेत. पहिल्यांदा हे प्रकरण  भाजपच्या एका आमदाराने उपस्थित केले आणि मंत्र्याचे नाव घेतले. त्यामुळे राजण्णा यांना निवेदन करणे भाग पडले. अर्थातच यात काहीतरी गडबड होती. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी तत्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेपाला नकार दिला.

हनी ट्रॅपच्या भानगडी, सनसनीखेज व्हिडीओ, गुप्त फोटो/चित्रे/मजकुराने भरलेले पेन ड्राइव्ह या गोष्टी कर्नाटकला काही नवीन नाहीत. १९७३ साली देवराज अर्स यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारमधील एक मंत्री आरडी कित्तूर यांच्यावर त्यांनी एका बेपत्ता महिलेला आश्रय दिल्याचा आरोप झाला. अगदी अलीकडेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर ‘पॉक्सो’ कायद्याखाली गुन्ह्याचा आरोप झाला. त्यानंतर एप्रिल २०२४  मध्ये सेक्युलर जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. रेवन्ना यांच्यावर २०१९  पासून तीन वर्षे मोलकरणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.  त्यांचे पुत्र माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप झाले. दोघांवर सध्या कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. 

उशिराचा कायापालटसत्तारूढ पक्षाच्या गोटात इफ्तार पार्ट्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता अलीकडेच भाजपच्या अल्पसंख्य मोर्चाने आयोजित केलेल्या ‘दावत-ए-इफ्तार’ला हजर होत्या. ‘रमझानच्या पवित्र महिन्यात समाजात ऐक्य आणि सलोखा गरजेचा आहे’, असे त्यांनी या पार्टीत सांगितले.  पक्षाच्या धोरणातला हा बदल सुखावणारा आहे. २०१४ मध्ये भाजपने इफ्तार  पार्ट्या बंद केल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मुस्लीम समाजापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसच्या पावलावर पाउल ठेवून असे मार्ग अवलंबले जात. नवा भाजप त्यापासून  दूर गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना कधी इफ्तार पार्टी दिली ना ते अशा प्रसंगी कोठे उपस्थित राहिले. २०१४ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीलाही मोदी गेले नव्हते. 

राजकीय नेते, सरकारी बाबू, सामाजिक कार्यकर्ते आणि इतरांसाठी इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकत्र येण्याची काही दशकांची प्रथाच होती. पंडित नेहरू यांनी हा पायंडा पाडला. दिल्लीत ऑल इंडिया काँग्रेस मुख्यालयात  त्यांनी व्यक्तिशः इफ्तारचा खाना दिला होता. २०१४ साली या प्रथेवर पडदा पडला. यानंतर भाजपच्या गोटात ‘या पार्ट्या म्हणजे मुस्लीम तुष्टीकरणाचे एक साधन’ असे वर्णन केले जात असे. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २०१६ आणि २०१८ मध्ये राजकीय इफ्तार पार्ट्या आयोजित केल्या. जहाल हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्षतावाद्यांनी त्यावर सडकून टीका केली. पुढे अशा पार्ट्या झाल्या नाहीत. परंतु २०२५ साली जणू कायापालट होऊन आता भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि पक्षाचे नेते इफ्तार पार्ट्या भरवतात आणि अशा पार्ट्यांना हजेरीही लावतात असे दिसते. 

बगल द्यावी, तर अशी!‘सरकारने अनेक यू-ट्यूब चॅनल्स रोखली आहेत काय? आणि तसे केले असल्यास तपशील द्यावा’, अशी मागणी काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे राज्यसभेत केली. प्रश्नाला बगल देण्याची कला कोणाला शिकून घ्यायची असेल तर ती या मंत्रिमहोदयांकडून शिकून घ्यावी. त्यांचे उत्तर होते ‘सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०२१ जारी केला आहे. बातम्या आणि चालू घडामोडींवर डिजिटल माध्यमातून तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरून कार्यक्रम करण्याकरिता नीतिसंहिता आखून देण्यात आली आहे.  आचारसंहितेच्या उल्लंघनासंबंधी तक्रारी निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा २०००च्या कलम ६९ अन्वये देशाचे ऐक्य आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी कोणताही  आशय अडविण्याची तरतूद आहे. नियमांच्या तृतीय अनुच्छेदातील तरतुदीनुसार माहिती नभोवाणी खाते असा आशय लोकांपर्यंत जाऊ नये याची व्यवस्था करू शकते.’ - हे उत्तर ऐकून खासदार महोदय अचंबितच झाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकhoneytrapहनीट्रॅप