शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: 'रॉ'वर बंदी घालण्याचा कट, अमेरिकेच्या या आगळिकीचा अर्थ काय?

By विजय दर्डा | Updated: March 31, 2025 08:03 IST

United State Policy: धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'रॉ'वर बंदी घालणे हे मोठे षड्यंत्र आहे! जग जर सीआयएची कुंडली उघडून बसले तर 'अंकल सॅम' आपण कुठे तोंड लपवणार?

- डॉ. विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

अमेरिका मोठा देश असल्याने जगभरातल्या मोठमोठ्या चिंता करत बसतो, असे मला बऱ्याचदा वाटते. इकडे आम्ही विनाकारण चिंतेची चिंता करत फिरतो, म्हणून अशी म्हण तयार झाली की, 'चिंतेने चतुराई कमी होते आणि दुःखाने शरीर.' आपण अमेरिकेला कधी दुर्बल होताना पाहिले आहे? जेव्हा हा देश युद्ध लढत असतो, तेव्हाही त्याचा खजिना भरलेलाच असतो; कारण अमेरिकेच्या चिंता त्याच्या चतुराईमुळे उत्पन्न होतात. आता नव्या विषयाची चिंता करण्याची वेळ आली आहे, असे त्याची चतुराई त्याला सांगते आणि मग तो त्या नव्या विषयाची चिंता करू लागतो.

अमेरिकेची नवी चिंता आपली गुप्तचर संस्था 'रॉ' म्हणजेच रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग ही आहे. जगातील धार्मिक स्वातंत्र्याबद्दल अमेरिकेचा एक संघीय आयोग आहे. या आयोगाने 'जागतिक धार्मिक स्वातंत्र्य अहवाल २०२५' प्रसिद्ध केला असून, भारतात धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती सातत्याने खराब होत आहे, असे त्यात म्हटले आहे. धार्मिक अल्पसंख्याकांना विदेशी भूमीवर लक्ष्य केले जाते. यासाठी 'रॉ'ला जबाबदार धरून निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात आली आहे. फुटीरतावादी खलिस्तानी नेता गुरूपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या असफल कटाचा दाखलाही अहवालाने दिला आहे.

या विषयाशी आमचे काही देणेघेणे नाही, असे भारत वारंवार सांगत आला. परंतु, अमेरिकेच्या गळी ही गोष्ट कोण उतरवणार?, त्या देशाला हे कोण सांगणार की, बाबा रे, तुमच्याकडे काय आहे?, काळे आणि गोरे यांच्यात किती भेदभाव आहे?, कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये किती दरी आहे? आपल्या जखमा तर तुम्हाला दिसत नाहीत आणि ज्यातून वैमनस्य पसरवले जाईल, असे दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचे उद्योग करत राहता. अमेरिकेच्या या खोडसाळपणाकडे पाहून मला पद्मभूषण रघुपती सहाय तथा फिराक गोरखपुरी यांची कविता 'डॉलरदेश'च्या काही ओळी आठवतात.दुनियाभर को बरबाद करे,दुनियाभर का निर्माता भी।दुनियाभर का विद्रोही भी,दुनियाभर का निज भ्राता भी।दुनियाभर को भूखा मारे,दुनियाभर का अन्नदाता भी।दुनियाभर में खैरात करे,दुनियाभर पर ललचाता भी।दुनियाभर का व्यापार मिटाकर,खुद व्यापारी बन बैठा।सच्ची झूठी मूरत गढ़कर,दुनिया का पुजारी बन बैठा।फिराक साहेबांइतक्या कठोर शब्दांचा उपयोग तर मी करणार नाही; परंतु भारतीय समाजाचे विघटन होऊन त्या देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्था पुढे जाऊ नये हा एकमेव उद्देश ठेवून भारताला बदनाम करण्याचे हे प्रयत्न चालवले आहेत, यात तर काहीच शंका नाही. कधी अदानी तर कधी अंबानी यांच्याविषयी वाद उपस्थित करण्यामागे काय इंगित आहे?

एकेकाळी जगाच्या जीडीपीच्या २५ टक्के हिस्सा उचलणाऱ्या भारताला लुटून इंग्रजांनी कंगाल केले; परंतु आपण आपल्या क्षमतेवर पुन्हा उभे राहिलो आणि आज पुन्हा पाचव्या क्रमांकावरची आर्थिक व्यवस्था झालो. आगामी काळात तिसऱ्या क्रमांकावरही जाऊ. कदाचित ही गोष्ट अमेरिकेच्या पचनी पडत नसावी आणि इतरांच्याही. विदेशी शक्तीने आपल्या देशात किती दंगली घडवल्या, आपल्याला त्या कशा विसरता येतील? आणि आजही तशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेने आपल्या छातीवर हात ठेवून सांगावे की पाकिस्तानला त्याने इतकी वर्षे जी आर्थिक मदत केली, त्याच पैशांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवाद पसरवत नव्हता..

कधी ट्रम्प यांची भेट झाली, तर त्यांना मी नक्की हे विचारू इच्छितो की मि. प्रेसिडेंट, अमेरिका तर मानवाधिकाराचा झेंडा घेऊन फिरतो, मग आमच्या लोकांना हातकड्या घालून का पाठवले? आमचे महान वैज्ञानिक आणि पुढे राष्ट्रपती झालेले एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून वाणिज्यमंत्री कमलनाथ, अभिनेता शाहरूख खान यांना अंगावरचे कपडे काढायला का भाग पाडले गेले? आपण काय सिद्ध करू इच्छिता? आपण बॉस, जगाचे 'चौधरी' आहोत हेच ना? परंतु संस्कृती सांगते सांगते, ज्या झाडावर जास्त फळे लागतात ते झाड वाकते. आपण बलवान आहात, तर आपली ही जबाबदारी असली पाहिजे की कमजोर असेल त्याच्याशी आपण सहकार्य कराल. आपला अनुभव त्याला उपलब्ध करून द्याल, जेणेकरून तो आपल्या पायावर उभा राहू शकेल.

आम्ही शांतता आणि अहिंसेच्या मार्गावर चालत असल्याने आमच्याकडे बोट दाखवणे आम्हाला अजिबात मंजूर नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ज्या प्रकारे 'रॉ'ला बळकटी दिली, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही कोणावरही हल्ला केला नाही. ना धार्मिक ना सांस्कृतिक, याला आमची हजारो वर्षाची संस्कृती साक्ष आहे. नद्यांपासून झाडे, वनस्पती आणि प्राण्यांपर्यंत सर्वांची पूजा करणारा आमचा देश आहे. वसुधैव कुटुंबकम हा आमच्या जीवनाचा मूळ मंत्र आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की, कोणी आमच्यावर डोळे वटारावेत किंवा आम्हाला टपली मारून पळून जावे. हा नव्या युगाचा भारत आहे महाराज!

मात्र, मला शंका आहे की, या कारवाया म्हणजे ट्रम्प यांच्याविरुद्धचा कट आहे का? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात इतके सौहार्दपूर्ण संबंध आहेत की, ट्रम्प असे काही करू शकत नाहीत. असे होऊ शकते की, ट्रम्प यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती (अमेरिकेत अशा संस्थांची कमतरता नाही) अशा समस्यांना खतपाणी घालत आहेत. पण खरे म्हटले, तर यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. हा नव्या युगाचा भारत आहे.

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय